मराठा विद्यार्थ्यांच्या करिअरचा छळवाद मांडणाऱ्या शासन प्रशासनातील शुक्राचार्यांवर  कारवाई करून न्याय मिळणे बाबत….. ! छावा क़ांतीवीर सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले ! सदर पत्र जसेच्या तसे प्रकाशित करून दिले आहे, सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

जा.क्.१०४७/२०१९    दि.११/०९/२०१९
प्रति
मा.मुख्यमंत्री साहेब
महाराष्ट्र राज्य
मुंबई
विषयः- मराठा विद्यार्थ्यांच्या करिअरचा छळवाद मांडणाऱ्या शासन प्रशासनातील शुक्राचार्यांवर  कारवाई करून न्याय मिळणे बाबत…..
महोदय,
चला घेऊ शिवरायांचा आशीर्वाद ..अशी भावनिक साद घालून आपण महाराष्ट्रातच नव्हे तर देशापातळीवर सत्ता प्रस्थापीत केली.तथापी सत्तेचे इप्सीत साध्य झाल्यानंतर देश घडविणाऱ्या छञपतींच्या तरूण वारसादारांचे हक्क पायदळी तुडविण्याचा विडा आपले शासन आणि प्रशासनाने उचलला असल्याचे प्रकर्षाने निदर्शनास येत आहे.विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्यांचे  हक्क देतांना आपले शासन आणि प्रशासन आकस बुध्दीने सुडाची भावना बाळगत आहे आसा आमचा ठाम समज झाला आहे.हा समज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियुक्त्या देतांना घेतलेल्या भुमिकेमुळे आपणच अधोरेखीत केला आहे.
महोदय,  गेली चाळीस मराठा समाज आपल्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करीत आहे.  दोन वर्षापुर्वी हा संघर्ष शिगेला पोहचल्यानंतर ५८मोर्च आणि ४३ समाजबांधवांनी आत्मबलिदान आणि  ८० वकीलांची फौज मराठा समाजाने उभी केल्यानंतर आरक्षण पदरात पडले.शासन प्रशासनाला ही बाब सलत असल्याचे त्यानंतरच्या अनेक निर्णयांमधून समाजाच्या लक्षात आले आहे.त्याच आकसातून
मराठा समाजापोटी असलेल्या आकस भावनेतून आपण मराठा समाजाच्या तरुणांना वेठीस धरत आहात सामान्य प्रशासनाच्या माध्यमातून आणि उपसमितीच्या गोंधळात आपण आणि आपले सहकारी मंञी यांनी मराठा समाजावर शक्य तेवढा आन्याय करण्याचा  कारस्थानी कृष्ण कृत्य  करण्याचा डाव खेळत आहात.आपण घेतलेल्या अनेक निर्णयांमधून  मराठा समाजाची जाणीवपुर्व  दिशाभूल केली आहे.असा आमचा स्पष्ट आरोप असून त्याचा आम्ही सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्च्याचे वतीने निषेध करतो.  महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि तत्सम शासकीय निवड मंडळांकडून मराठा समाजाच्या उमेदवारांना नियुक्त्या देतांना सातत्याने होणारा अन्याय दुर करून विधानसभेची आचार संहिता जाहीर होण्यापुर्वी अन्याय करणाऱ्या प्रवृत्तींना शासन व्हावे म्हणून या निवेदनाद्वारे आपणाकडे खालील मागण्या करीत आहोत.
१)भेट घेण्यासाठी  आलेल्या तरुणांना पोलीस प्रशासनाच्या मदतीने खोट्या गुह्यात अडकवून आंदोलनात  
    फुट पाडणे,त्यांचे आयुष्य उध्वस्त करू पाहणाऱ्या  प्रशासनाची चौकशी  सर्वपक्षीय चौकशी समिती नेमून 
    निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी    व्हावी.
२) बेकायदेशीरपणे आणि असंवैधानिक मार्गाने रद्द केलेली भर्ती प्रक्रिया पूर्ववत करुन मराठा तरुण-
     तरुणीना नियुक्तीपत्र देण्यात यावे.
३) शासनाने नव्याने जाहीर केलेली यादी रद्द करण्यात यावी.
४) मराठा विरोधी इतर समाज वाद निर्माण करण्याचा सुरु असलेला प्रयत्न थांबवावा.
५) मराठा समाजातील तरुणाना आंदोलन करता येऊ नये म्हणून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करुन
    त्यांचे आयुष्य उध्वस्त करू पाहणाऱ्या पोलीस अधिकारी यांना त्वरीत निलंबित करा.
६) मराठा समाजातील हक्क आणि न्याय मागण्यासाठी आलेल्या मराठा तरुण तरूणींवर  राजकीय
   दबावात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत.
७) महाराष्ट्राचे महाधिवक्ता मा आशुतोष कुंभकोनी यांना निलंबित करुन या भर्तीबाबत भ्रष्टाचार आणि
    जातिवादी हेतूची चौकशी करण्यात यावी.
  यासंदर्भात आपण त्वरीत आदेशपारीत करुन  विधानसभेची आचारसंहीता जाहीर होण्यापुर्वी योग्य तो न्याय मराठा समाजातील तरुण, तरुणीना द्यावा .आमच्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर केलेला अन्याय त्वरित दूर करावा .अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल आणि आत्ताचे आंदोलन सरकारला न झेपणारे असेल असा इशारा वजा विनंती .
                            -कळावे-
करण गायकर -संस्थापक अध्यक्ष ,उमेश शिंदे- प्रदेश अध्यक्ष - विद्यार्थी सेना ,संतोष माळोदे -प्रदेश उपाध्यक्ष ,नवनाथ शिंदे ,यवक प्रदेश कार्याध्यक्ष ,विजय खर्जुल जिल्हा अध्यक्ष ,तानाजी गायकर - सरपंच परिषद अध्यक्ष महाराष्ट्र, शरद तुंगार-अध्यक्ष छत्रपती शासन, दत्ता हरळे, ज्ञानेश्वर कवडे, उत्तम कापसे , सागर पवार , रवी भांभरगे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!