महाराष्ट राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या राज्य अध्यक्षपदी मविप्रचे डॉ.एस.के. शिंदे यांची बिनविरोध निवड !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

महाराष्ट राज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या राज्य अध्यक्षपदी डॉ.एस.के. शिंदे
  मुंबई::- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची कार्यकारिणीची सभा मुंबई येथे आमदार निवास येथे कार्याध्यक्ष प्रा.अविनाश तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
                यावेळी कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, त्यात राज्य अद्यक्षपदी संघाचे माजी राज्य सरचिटणीस व मविप्र शिक्षण संस्थेचे शिक्षणाधिकारी, अष्टपैलू नेतृत्व असलेले डॉ.एस के शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
             महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ या संघटनेवर सरचिटणीस म्हणून डॉ.एस.के. शिंदे कार्यरत होते,  महासंघाच्या सर्व पदाधिका-यांच्या एकमताने त्यांची राज्य अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्याला हा मान मिळाला असून राज्य सरचिटणीस असताना फार मोठी मोलाची कामगिरी त्यांनी केली आहे. त्यांनी "कायम विनाअनुदानित" या शब्दातील 'कायम' शब्द काढण्यात विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्र राज्यात म.वि.प्र.ही एकमेव अशी संस्था आहे, नोकरभरतीवर स्थगिती असतांना माध्यमिक व उच्च माध्यमिक मधील शून्य टक्के अनुदानावर असलेले शिक्षक शंभर टक्के अनुदानित महाविद्यालयावर शिक्षकांची नेमणूक केली. त्यांचे वेतन सुरू केले, त्यासाठी न्यायालयाचे दरवाजे झिजवले, मंत्रालयात चकरा मारल्या, गणित या विषयासाठी प्रात्यक्षिक तासिका शासनाकडून मंजूर करून घेतल्या  त्यामुळे गणित विषयाचे अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ झाले. बी.एड. श्रेणीतील लोकांना एम.एड. श्रेणी देण्यासाठी प्रयत्न करून यशस्वी झाले. ज्युनिअर कॉलेज मध्ये पूर्णवेळ पदांची निर्मिती केली, आणि सर्वात महत्वाचे काम म्हणजे विनाअनुदानित कॉलेज ला २०% अनुदान मिळवून देऊन तसा शासकीय आदेश काढण्यासाठी शासनाला भाग पाडले, .२०% मागणीसाठी राज्य सरचिटणीस असल्यापासून सतत कार्य करत आहेत, यामुळे हजारो शिक्षकांना २०℅ व ४०% वेतन मिळणार आहे. प्राध्यापकांच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी डॉ. एस.के.शिंदे यांनी आंदोलन करून जेलभरो आंदोलन केले आहे. त्यांच्या या अष्टपैलू कार्याची दखल घेऊन राज्य पदाधिकारी यांनी राज्य अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली आहे.
             त्यांच्या निवडीबद्दल शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस श्रीम. नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, सर्व पदाधिकारी, कार्यकारी संचालक, सेवक संचालक, शिक्षणाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध संघटना, प्राध्यापक, शिक्षक यांनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!