महाराष्ट्रातील जाणकार मान्यवरांच्या उपस्थितीत सुतार जनजागृती सेवा संस्थेची स्थापना ! विश्वकर्मा पूजन दिनी तमाम समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षांनी केले आहे !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

सुतार जनजागृती सेवा संस्थेची स्थापना !

       नासिक::- काळ बदलला तशी सामाजिक परिस्थिती बदलत गेली, बारा बलुतेदारांच्या व्यवसायात ही स्थित्यंतरे झाली, शिक्षणाचं विकेंद्रीकरण झाले परंतु सर्वांना वेळीच हा बदल आत्मसात करता आला नाही याचा परिणाम समाजावर कालानुरूप होत गेला. समाजातील अनेक जातीधर्माच्या कुटुंबांना पिछाडीवर टाकत असताना काही जाणकारांनी वेळीच लक्ष देऊन समाज संघटित करून भविष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला. तसाच सुतार समाज यांत्रिकीकरणाचा बळी पडून पारंपरिक व्यवसायासही मुकत चालला असून त्याला भेडसावणाऱ्या समस्यांपासून मुक्त करण्यासाठी नासिक मध्ये सुतार जनजागृती सेवा संस्थेची स्थापना सुतार समाजातील जाणकारांकडून करण्यात आली आहे. १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजन दिनी या संस्थेची स्थापना झाल्याचे जाहीर करण्यात येणार आहे,  मे. धर्मादाय आयुक्त, नासिक येथे नोंदणी  केली असून राजे छत्रपती संभाजी स्टेडियमजवळील मायको फोरम हाॅल येथे विश्वकर्मा पूजन दिनी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याप्रसंगी सुतार समाजातील सर्वांना निमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली, यावेळी संस्थेचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते.
        संस्थेच्या वतीने समाजात शिक्षण जागृती, आरोग्य, व्यसनमुक्ती, लग्न समारंभातील अनाठायी खर्च न करणे, हुंडा विरोधी अभियान, झाडे लावून पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे याबाबत जनजागृती करणे.
        समाजातील कुशल कारागिरांना तांत्रिक शिक्षणाची गरज कशी याबाबत मार्गदर्शन व प्रोत्साहन उपलब्ध करून देणे, समाजाला एकसंघ राखण्यासाठी वधू-वर मेळावा आयोजित करणे, रक्तदान शिबीर आयोजित करणे, व गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण, तांत्रिक शिक्षण यांचे मार्गदर्शन करणे अशी ध्येय व उद्दिष्टे समोर ठेवून संस्था कार्य करणार आहे.
          संस्थेच्या स्थापना समारोहात समाजातील महाराष्ट्र राज्यभरातील मान्यवर-जाणकार यांची उपस्थिती लाभणार आहे, यावेळी काही समाजबांधवांचा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, सदर कार्यक्रमास नियोजनानुसार सुतार समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे यासाठी कार्यक्रम वेळेवर सुरू करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।