छावा क़ांतीवीर सेनेचा झंझावात ! इगतपुरी तालुक्याची कार्यकारिणी गठित ! नियोजित नाशिक येथील केंद्रीय कार्यालयात बहुसंख्येने कार्यकर्त्यांचा उत्साहात प्रवेश सोहळा पार पडला !!! उत्तर महाराष्ट्रातील बातमी मागच्या बातमीसाठीचे एकमेव न्यूज पोर्टल www.newsmasala.in सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इगतपुरी तालुका कार्यकारणी निवड, छावा क्रांतीवीर सेनेत शेकडो तरुणांचा प्रवेश.
       नासिक (१५)::- छावा क्रांतीवीर सेना नाशिक यांच्यावतीने काल इगतपुरी तालुक्यातील नवीन पदाधिकारी नियुक्ती, संघटनेच्या नियोजित नाशिक येथील केंद्रीय कार्यालयात संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या उपस्थितीत नियुक्त्या देण्यात आल्या, यावेळी उमेश शिंदे यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी व नवनियुक्त प्रवेश घेणाऱ्यांना संघटनेच्या ध्येय धोरणांची, संघटनेच्या वाटचालीचा सविस्तरपणे आढावा मांडून छत्रपती शिवराय यांच्या आचार, विचारांवर प्रेरित होऊन करण गायकर यांच्या सह प्रदेश कार्यकारणी यांनी वाढवलेल्या या संघटनेच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले तर आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून चागले काम उभे करू शकतो, असा संदेश देऊन सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, कामगारांना, महिलांना, बेरोजगार युवकांना दिलासा देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला गेला पाहिले असे आपल्या मनोगतात भावना व्यक्त केल्या.
यावेळी संस्थापक करण गायकर,  युवक प्रदेश अध्यक्ष युवक शिवा तेलंग, विद्यार्थी सेना प्रदेश अध्यक्ष उमेश शिंदे, प्रदेश महासचिव शिवाजी मोरे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष माळोदे, युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, जिल्हा अध्यक्ष विजय खर्जुल, सागर पवार, आकाश हिरे, विकास गुळवे विकास, रविभाऊ भांभरगे पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकारी खालील प्रमाणे:-
विजय भोर -जिल्हा उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा ग्रामीण,
गोकुळ धोंगडे -तालुका अध्यक्ष इगतपुरी,
गोकुळ राव -शेतकरी आघाडी तालुका प्रमुख इगतपुरी,
विलास धोंगडे - कामगार आघाडी तालुका अध्यक्ष,
गोरख मुर्तडक -जिल्हा संपर्क प्रमुख,
योगेश भगूरे -युवा शहर अध्यक्ष ,नवीन नाशिक,
हर्षल भदाणे - वि आ.शहर कार्याध्यक्ष,
रोहिदास काळे -युवा तालुका अध्यक्ष,
ठकुनाथ भोसले -वाहतूक सेना,
संतोष काकडे -मध्य नाशिक विभाग प्रमुख,
संतोष धनगे -वाहतूक आघाडी शहर संघटक नाशिक,
सौ विजया मोरे -महिला आघाडी जिल्हा संघटक,
सौ वैशाली काळे - महिला आघाडी सातपूर विभाग प्रमुख,
सौ रजनी मराठे -महिला आघाडी मध्य नाशिक प्रमुख,
सौ रुपाली काकडे -महिला आघाडी मध्य नाशिक संघटक,
आदी नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ईगतपुरीसह जिल्ह्यातील बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

जागतिक फार्मासिस्ट दिवस विशेष एसएमबीटी फार्मसीच्या विद्यार्थ्यांची ‘अशीही’ सामाजिक बांधिलकी !

विजयादशमीला शिवप्रताप गरूडझेप ! ‘पहिले ते हरिकथा निरुपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी’ !!