शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेली उत्तर महाराष्ट्रातील एकमेव बॅंक ! २२ सप्टेबरला समाज प्रबोधन शोभायात्रा व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन !! कार्यक्रम उदय निरगुडकर व चिन्मय उदगीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत !!! नासिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित नासिक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नासिक जिल्हा सहकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नासिक चे शंभराव्या वर्षात पदार्पण ! नासिक (२०)::- नासिक जिल्हा सहकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक २२ सप्टेंबर २०१९ ला ९९ वर्ष पूर्ण करून शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे यानिमित्ताने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत स्वच्छ व सुंदर नासिक, प्लॅस्टिकमुक्त नासिक, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण जनजागृती करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या शतक महोत्सवी वर्षात पदार्पण कार्यक्रमास जेष्ठ लेखक व व्याख्याते उदय निरगुडकर, सिने व नाट्य अभिनेता चिन्मय उदगीरकर प्रमुख पाहुणे असून सभासद पाल्यांचा गुणगौरव सोहळ्यासह शोभायात्रेचे आयोजन केले आहे. शतक महोत्सवी वर्ष लोगोचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले , नोव्हेंबर २०१९ पासून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे साहित्य संमेलन, माजी संचालक-पदाधिकारी सन्मान सोहळा, जिल्ह्यातील बॅंक व नोकरदार पतसंस्थांची परिषद भरविणे, सभासद पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्याख्यानांचे