लोकराजा स राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर ! कोल्हापूर चे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शारदापीठ द्वारकाचे शंकराचार्य श्री स्वरुपानंद यांच्या शुभेच्छा मिळालेला एकमेव दिवाळी विशेषांक लोकराजा ला पुरस्कार म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिकांचा गौरव- संपादक नरेंद्र पाटील !! न्यूज मसाला गौरवाच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


"लोकराजा" दिवाळी विशेषांक २०१८ ला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!
            नासिक::-न्यूज मसाला च्या " लोकराजा" दिवाळी विशेषांक २०१८ ला नक्षत्रांचं देणं काव्यमंचचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्काराने लवकरच पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते लोकराजा दिवाळी अंकास गौरविण्यात येणार आहे.
         नक्षत्राचं देणं काव्यमंच ची १३ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०१८ चा निकाल दि. १ सप्टें. २०१९ रोजी जाहीर करण्यात आला, संपूर्ण महाराष्ट्रातील व राज्याबाहेरील मराठी दिवाळी अंकांच्या स्पर्धेत  नासिक मधून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक न्यूज मसाला च्या दिवाळी विशेषांक "लोकराजा" ची यावर्षीच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
       पुरस्कार प्रदान सोहळा वित्त गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, जेष्ठ कवी, कायदेतज्ज्ञ बाळासाहेब तोरस्कर, जेष्ठ साहित्यिक, कवी, पत्रकार विलास शिंदे, शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, आम. महेश लांडगे, आम. शरद सोनवणे, आम. सुरेश गोरे, महापौर राहुल जाधव, प्रा. राजेंद्र सोनवणे या मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होत आहे.
              नासिक मधून प्रकाशित होत असलेल्या साप्ताहिक न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांकास कोल्हापूर चे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज , शारदा पीठ द्वारकाचे शंकराचार्य श्री स्वरुपानंद तसेच अनेक मान्यवरांनकडून शुभेच्छा मिळालेला एकमेव दिवाळी विशेषांक आहे. मराठी दिवाळी विशेषांकाच्या १२५ वर्षांच्या दिर्घ परंपरेत छत्रपती शाहू महाराज व शंकराचार्य यांच्या शुभेच्छा आजपर्यंत आमच्या माहिती नुसार कोणत्याही दिवाळी विशेषांकास मिळून गौरविण्यात आलेले नाही ही विशेष  व ऐतिहासिक बाब असून याचा न्यूज मसाला परिवारास अभिमान आहे.
        या पुस्काराने लोकराजा दिवाळी विशेषांकाची राज्यस्तरीय घोडदौड अधोरेखित होते, याबद्दल न्यूज मसालाच्या सर्व वाचकांचे धन्यवाद, न्यूज मसाला वर प्रेम करणारे जाहीरातदार, लेखक, कवी, सदैव पाठीशी खंबीरपणे उभे असणारे हितचिंतक यांचे संपादक नरेंद्र पाटील व न्यूज मसाला परिवारातर्फे धन्यवाद !टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक