शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेली उत्तर महाराष्ट्रातील एकमेव बॅंक ! २२ सप्टेबरला समाज प्रबोधन शोभायात्रा व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन !! कार्यक्रम उदय निरगुडकर व चिन्मय उदगीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत !!! नासिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित नासिक !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

नासिक जिल्हा सहकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित, नासिक चे शंभराव्या वर्षात पदार्पण !
     नासिक (२०)::- नासिक जिल्हा सहकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक २२ सप्टेंबर २०१९ ला ९९ वर्ष पूर्ण करून शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे यानिमित्ताने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत स्वच्छ व सुंदर नासिक, प्लॅस्टिकमुक्त नासिक, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षण जनजागृती करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या शतक महोत्सवी वर्षात पदार्पण कार्यक्रमास जेष्ठ लेखक व व्याख्याते उदय निरगुडकर, सिने व नाट्य अभिनेता चिन्मय उदगीरकर प्रमुख पाहुणे असून सभासद पाल्यांचा गुणगौरव सोहळ्यासह शोभायात्रेचे आयोजन केले आहे.
         शतक महोत्सवी वर्ष लोगोचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, नोव्हेंबर २०१९ पासून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे साहित्य संमेलन, माजी संचालक-पदाधिकारी सन्मान सोहळा, जिल्ह्यातील बॅंक व नोकरदार पतसंस्थांची परिषद भरविणे, सभासद पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्याख्यानांचे आयोजन, अभ्यासिकेची-वाचनालयाची उभारणी यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
           शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सभासद पाल्यांच्या गुणगौरव तसेच नासिक अमरधाम मधील अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी संगीता पाटील या धाडसाने पार पाडीत आहेत त्यांना आर्थिक मदतीसह मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
             सामाजिक जाणीवेतून कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी बॅंकेकडून एक लाखाची मदत देण्यात आली.
           उत्तर महाराष्ट्रातील ही ९९ वर्ष यशस्वी व ग्राहकाभिमुख पहिलीच बॅंक आहे. बॅंकेचे ग्राहक अर्थात सभासद हे सर्व सरकारी व परिषद कर्मचारी आहेत. बॅंकेच्या रविवार कारंजा व भाभा नगर येथील स्वमालकीच्या जागेत शाखा असून, मालेगाव, कळवण, येवला अशा पाच शाखा कार्यरत आहेत, भाभा नगर येथील भव्य प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री तथा नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले होते, आज तेथून नवनिर्वाचित संचालक मंडळाकडून कामकाज केले जात आहे. बॅंकेस राज्यस्तरीय बॅंक्स असोसिएशन व फेडरेशन यांचे सतत "सर्वोत्कृष्ट बॅंक" पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. बॅंकेच्या २१० कोटींच्या पुढे ठेवी असून १५१ कोटी च्या आसपास कर्ज वाटप करून बॅंकेचा एनपीए शून्य टक्के राखत "अ" ऑडिट वर्ग कायम ठेवला आहे, आकर्षक व्याजदर देत जेष्ठ सभासदांना (५८  वर्ष) जेष्ठ नागरिक लाभास बॅंकेच्या नियमानुसार पात्र आहेत,
         बॅंकेने तत्काळ कर्जप्रस्तावास मंजूरी, विना डिपाॅझीट लाॅकर्स सुविधा, सौरऊर्जा प्रकल्प राबविणारी नासिक मधील पहीलीच बॅंक, संपूर्ण कर्जरकमेचा विमा काढण्याची सुविधा, सोनेतारण कर्ज योजना, बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये आरटीजीएस व एनईएफटी ची मोफत सुविधेसह अनेक नवीन उद्दीष्टे समोर ठेवली आहेत, त्यानुसार कामकाज सुरळीत सुरू आहे.
       बॅंक शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे त्यानिमित्त सकाळी आठ वाजता सभासद व कर्मचारी यांची संयुक्त शोभायात्रा काढण्यात येणार आहे, रविवार कारंजा-मेनरोड-शालीमार-नेहरु गार्डन-मेहेर सिग्नल-अशोक स्तंभ -रविवार कारंजा येथे समारोप होईल. सामाजिक संदेश देणे हा मुख्य उद्देश या यात्रेचा आहे, या यात्रेला व तद्नंतर सायंकाळी पाच वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात असलेल्या कार्यक्रमाला सर्व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे.
        बॅंकेचे अध्यक्ष विजयकुमार हळदे, उपाध्यक्ष प्रविण भाबड, संचालक भाऊसाहेब खातळे, सुधीर पगार, सुनील बच्छाव, दिलीप थेटे, बाळासाहेब ठाकरेपाटील, शिरीष भालेराव, दीपक आहिरे, प्रशांत कवडे, सुनील गिते, प्रशांत गोवर्धने, संदीप पाटील, महेश मुळे, अशोक शिंदे, मंगेश पवार, दिलीप सलादे, सुभाष पगारे, अजित आव्हाड, मंदाकिनी पवार, धनश्री कापडणीस, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश क्षीरसागर, प्रशासकीय व्यवस्थापक अण्णासाहेब बडाख यांच्याकडून सर्व सभासद व मान्यवरांनी उपस्थित रहावे असे कळविण्यात आले असल्याची माहिती दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक