स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत चिमुकल्यांनी सादर केले पथनाट्य !मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून बक्षीसे दिली ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत चिमुकल्यांनी सादर केले पथनाट्य ! मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून बक्षीसे दिली ! नाशिक – केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हयात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत असून यानिमित्ताने विविध जनजागृतीपर उपक्रमांव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. आज देवळा तालुकयातील जिल्हा परिषदेच्या खालप फाटा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद आवारात पथनाटयाचे सादरीकरण केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व चिमुकल्यांचे कौतूक करुन जिल्हयातील सर्व शाळांमध्ये अशाप्रकारचे उपक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले. केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हयात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत असून जिल्हयातील ग्रामपंचायतींमध्ये याबाबत विशेष ग्रामसभा घेवून या मोहिमेचा शुभारंभ तसेच प्लास्टिक बंदीबाबत ठराव करण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत प्लॉस्टिक श्रमदान, स्वच्छताफेरी, शपथ, गृहभेटी आदि प्रकारचे उपक्रम ग्रामपातळीवर राबविण्य