जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून अज्ञात आरोपीकडून बनावट धनादेशाद्वारे दोन कोटी ष्याऐशी लाख गायब ! ऐतिहासिक भास्कर वाघ प्रकरणाला उजाळा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून अज्ञात आरोपीकडून बनावट धनादेशाद्वारे दोन कोटी ष्याऐशी लाख गायब !
                      जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून आजही अशी अफरातफर होते व प्रशासनाला उशिराने जाग येते, काही वर्षांपूर्वी धुळे जिल्हा परिषदेच्या बॅंक खात्यातून कोट्यावधी रुपयांची अफरातफर केली गेली होती, सदर प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली होती, "भास्कर वाघ" हे नाव न राहता एक वाक्प्रचार रूढ झाला होता, आजही आहे. फरक इतकाच आहे की तेव्हा धनादेशावर शून्य वाढविला जात असे आता सरळ धनादेश व त्यावरील स्वाक्षऱ्याच बनावट करून तब्बल दोन कोटी ष्याऐशी लाख रुपये गडचिरोली जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे युनियन बँक खात्यातून काढून नेल्याची घटना घडली आहे. मात्र मुळ धनादेश आजही जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडे असताना बनावट धनादेश आरोपीने बनवलाच कसा, त्याला सदर माहिती कशी मिळाली, कव्हरींग नोट व सह्यांचा नमुना कसा प्राप्त झाला असे प्रश्र्न उपस्थित होत आहेत.
     राज्यात सर्वाधिक माजी मालगुजारी तलाव पूर्व विदर्भात आहेत. गोंडराजे आणि इंग्रजांच्या कालावधीत सिंचनासाठी या तलावांची निर्मिती करण्यात आली होती. स्वातंत्र्योत्तर काळात या तलावांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या तलावांची सिंचनक्षमता घटली. तसेच देखभालीवरचा खर्च वाढला. सध्या प्रशासनाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात एकूण ५९५७ माजी मालगुजारी तलाव आहेत. पैकी गडचिरोली जिल्ह्यातील १६४५ तलाव आणि चाळीस अन्य तलावांचा समावेश आहे. या सर्व तलावांची एकूण सिंचनक्षमता १,१३,५१८ हेक्‍टर आहे. सध्या या सर्व तलावांची देखभाल जिल्हा परिषदांकडून केली जात आहे.
          गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मामा अर्थात माजी मालगुजारी तलाव पुनर्बांधणी व बळकटीकरण लेखाशिर्षकाखाली असलेल्या युनियन बँक खात्यातून आरटीजीएस च्या माध्यमातून रक्कम लंपास केली आहे. बॅंक खात्यात साडेसहा कोटी रुपये शिल्लक असताना १८ सप्टेबर रोजी जिल्हा जलसंधारण अधिकारी भूपेश दमाहे यांनी चौकशी केली असता बॅंक अहवालानुसार ही बाब लक्षात आली. अज्ञात आरोपीचा जलसंधारण विभागाशी कोणताही संबंध नसताना व देणे घेणे नसताना मुळ धनादेशाचा बनावट धनादेश तयार करून संबंधित अधिकाऱ्यांच्या सह्या स्कॅन करून जलसंधारण विभागाचे बनावट पत्र तयार केले.  ३ जून २०१९ रोजी सदर पत्र युनियन बँकेत टाकून ६ जूनला बनावट पत्र व ७ जूनला धनादेश सादर केला व १० जूनला पत्रात नमूद असलेल्या खात्यावर आरटीजीएस च्या माध्यमातून तब्बल २,८६,१३,८५१ रुपये इतकी रक्कम काढून नेल्याची तक्रार अज्ञात आरोपी विरोधात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फनिंद्र कुटीरकर यांच्या मार्फत जिल्हा जलसंधारण अधिकारी भूपेश दमाहे यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!