स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत चिमुकल्यांनी सादर केले पथनाट्य !मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून बक्षीसे दिली ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

    स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत चिमुकल्यांनी सादर केले पथनाट्य !
मुख्य कार्यकारी अधिकारी एस भुवनेश्वरी यांनी चिमुकल्यांचे कौतुक करून बक्षीसे दिली !
       नाशिक – केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हयात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत असून यानिमित्ताने विविध जनजागृतीपर उपक्रमांव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. आज देवळा तालुकयातील जिल्हा परिषदेच्या खालप फाटा येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद आवारात पथनाटयाचे सादरीकरण केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व चिमुकल्यांचे कौतूक करुन जिल्हयातील सर्व शाळांमध्ये अशाप्रकारचे उपक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले.

केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने जिल्हयात स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत असून जिल्हयातील ग्रामपंचायतींमध्ये याबाबत विशेष ग्रामसभा घेवून या मोहिमेचा शुभारंभ तसेच प्लास्टिक बंदीबाबत ठराव करण्यात आले आहेत. या अभियानांतर्गत प्लॉस्टिक श्रमदान, स्वच्छताफेरी, शपथ, गृहभेटी आदि प्रकारचे उपक्रम ग्रामपातळीवर राबविण्यात येत आहेत. प्लॉस्टिकच्या वापराबाबत जनजागृती व्हावी, लोकांचा या मोहिमेत सहभाग वाढावा, गाव प्लॉस्टिकमुक्त व्हावीत हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत्‍ देवळा तालुक्यातील खालप फाटा येथील प्राथमिक शाळेने नदीप्रदुषण व स्वच्छता याबाबत पथनाटय तयार केले असून त्याव्दारे गावपातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. आज जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांच्या उपस्थितीत या पथनाटयांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर, मुख्याध्यापिका पुष्पा गुंजाळ, शिक्षिका वैशाली सुर्यवंशी आदि उपस्थित होते. पथनाटयातील सर्व मुल ही शेतमजुर कुटुंबातील असून दुसरी आणि तिसरीमधील आहे. त्यांच्या सादरीकरणाचे कौतूक करत मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांनी त्यांना स्वत:च्या दालनात बोलावून बक्षिस देवून त्यांचा तसेच शिक्षकांचा गौरव केला. दरम्यान, नाशिक जिल्हयात स्वच्छता ही सेवा मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिका-यांना देण्यात आले असून प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी तालुकास्तरावरुन संपर्क अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपातळीवर विविध प्रकारचे उपक्रम सुरु असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी दिली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!