स्वॅग माझ्या फाट्यावर ! आईच्या गावात बाराच्या भावात ! मती,रूमी, मॅगी या गर्ल्स येताहेत गाणी गात आपल्या भेटीस ! आपली आपल्याच आई वडीलांशी नव्याने ओळख निर्माण होणार काय ? तर २९ नोव्हेंबर ला भेटणार गर्ल्स ना !!!
२९ नोव्हेंबरला 'गर्ल्स' येताहेत भेटीला ! 'बॉईज' आणि 'बॉईज 2' या दोन्ही चित्रपटांच्या भरघोस यशानंतर विशाल सखाराम देवरुखकर आता घेऊन येत आहेत, मुलींच्या अजब आणि हटके विश्वाची धमाकेदार सफर 'गर्ल्स'च्या रूपात. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि कायरा कुमार क्रिएशन प्रस्तुत 'गर्ल्स' हा चित्रपट तरुणींच्या एका अनोख्या जगाची सफर घडवणार आहे. मती, रुमी, मॅगी या तीन वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या मुली त्यांचे दैनंदिन आयुष्य जगत असताना एका वळणावर जेव्हा त्या एकत्र येतात तेव्हा, त्या तिघींची एकमेकींशी होणारी ओळख, आयुष्याकडे बघण्याची नव्याने मिळालेली नजर, नवीन विचार, नातेसंबंध आणि मुख्य म्हणजे त्यांची होणारी घट्ट मैत्री. या गोष्टीवर भाष्य करणारा हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा आहे. 'दोस्तीत कधी मतलबी व्हायचे नसते, तर त्या दोस्तीचा मतलब शोधायचा असतो'. या संवादातूनच मैत्रीचा खरा अर्थ सांगणाऱ्या या चित्रपटातून माणसाच्या जीवनात असणाऱ्या प्रत्येक नातेसंबंधावर प्रकाश टाकण्यात आला आहे.