पोस्ट्स

कोविड रुग्ण तात्काळ शोधणे व उपचार होणेकामी "सच प्रणाली" नामक ऑनलाईन ऍपचे उदघाटन ! सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक - बाळासाहेब क्षीरसागर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
"सच प्रणाली" ऍपचे उदघाटन संपन्न ! ******************************        नासिक::-कोरोना प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका आढावा सभेप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सभापती सौ.शोभाताई बरके, उपसभापती संग्राम कातकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड, ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड, पंचायत समिती सदस्य जगन भाबड, सौ.संगीता पावसे, भगवान पथवे, सौ. सुमन बर्डे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.          कोरोना प्रादुर्भाव या संदर्भात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या समस्या व त्यावर करावयाची उपाययोजना या संदर्भात समन्वयाने चर्चा करण्यात आली. कोरोना हे देशावरील संकट असल्याने सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याची भूमि

न्यूज मसालाचा अंक दि. ३० जुलै २०२०. संपादकीय-मुलाखतीचा सोस !! दीपक दंडवतेंच्या लेखणीतून-सारस्वतांच्या नगरीतील संतोष !!! रासाका-निसाका सहकार विशेषांक !!! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!

इमेज
संपादकीय                      मुलाखतींचा सोस !! मुलाखतीला जायचं म्हणजे तयारी करावी लागते पण कितीही अभ्यास करून जा, जर मुलाखत घेणाऱ्यांनी आधीच ठरवलेले असेल तर काय कुणाची बिशाद की तुमची निवड होईल ? बरं मुलाखत कोणी कोणाची घ्यावी याचे काही संकेत असतात, अनेक ठिकाणी स्पष्ट लिहीलेले असते की परीक्षार्थी ने जर कुणाची ओळख दाखविली, मुलाखत घेणाऱ्यावर दबाव आणला किंवा अनैतिक मार्गाचा अवलंब केला तर उमेदवाराला मुलाखत देण्यापासून रोखले जाईल ! आणि रोखले जातेच ! मात्र आज कुणीही मुलाखत घ्यायला येतो आणि स्वत:ची पाठ थोपटून घेत असतो ! अनाकलनीय असे वाटते. माध्यमांमध्ये मुलाखतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे हा संशोधनाचा विषय आहे तरीही अनेक माध्यमे मुलाखत या गोंडस नावाखाली उखळ पांढरे करून घेतात, सर्वच मुलाखती अशा असतात असे नाही.          मुलाखतीची प्रश्नावली कशी, कधी कुणाला अडचणीत आणेल हे सांगता येत नाही व कधी किती सोयीस्कर असेल हेही सांगता येत नाही. मुलाखतीला विचारले जाणारे प्रश्न एकसारखे असतील तरीही ज्याची निवड करायचे ठरविले तोच निवडला जातो ! हे कसं ?       एका नोकरीसाठीच्या मुलाखतीमध्ये प्रत्येका

पक्षीय जोडे बाजूला ठेवून मॅरेथॉन बैठकांनी सहकार क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची आशा ! आता मात्र निर्णायक लढाईसाठी सर्व एकत्रित येणार ? सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,           नासिक::-निफाड तालुक्यातील सहकार चळवळ कर्मवीरांनी ज्या अनुषंगाने स्थापन केली होती त्यासाठी आपण समाजाचे देणे लागतो या लोक भावनेतून आपण सर्वांनी काम केले तर पुन्हा संस्थांना व सहकारला उर्जिता अवस्थेत आणणे अवघड नाही, निफाड सहकारी साखर कारखाना, कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना हे दोन सहकारी व केजीएस शुगर इन्फ्रा प्रा.ली., हा खाजगी कारखाना बंद अवस्थेत असल्याने हे कारखाने सुरु करणे कामी निफाड तालुक्यातील सर्व पक्षीय जेष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करावा या दृष्टिकोनातून निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी पुढाकार घेऊन पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये सोमवारी बैठक आयोजित करून आपली भूमिका मांडली. सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी तालुक्यातील जेष्ठ नेते माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील होते. यावेळी विलास बोरस्ते यांनी बैठकीचा मुख्य हेतू काय आहे हे विशद करून आमदार दिलीप बनकर यांनी प्रास्ताविका मध्येच बैठकीचा मुख्य हेतू तालुक्यातील सहकार चळवळ टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून जेष्ठाचे मार्गदर्शन व सह

मे. तहसीलदार चर्चेचा विषय ठरले ! मग चर्चा तर होणारच !! काय केले मे. तहसीलदारांनी, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
संतोष गिरी यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,        नासिक::- निफाड तालुक्याचे तहसीलदार म्हणून असलेले दीपक पाटील हे आज चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्याला मिळालेल्या शासकीय वाहनाने  लासलगाव-विंचूर रस्त्याने जात असताना त्यांचा कडून झालेल्या कार्यामुळे चर्चा होत आहे. यापूर्वीही त्यांनी आपल्या कामकाजातून अनेक घटनांतून संवेदनशील अधिकारी असल्याचे  दाखवून दिले आहे.      काल दि. २७ जुलै रात्री विंचूर रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे दीपक पाटलांची माणुसकी व संवेदनशीलतेचा जनतेला प्रत्यय आला, कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्हा भरात नव्हे तर महाराष्ट्रात वाढत चाललेला असतांना संकटसमयी ही मदतीला धावणारे विरळाच, गाडीला लिफ्ट मागितली तर ती मिळत नाही, अनोळखी व्यक्तिला गाडीवर बसवून घ्यायला तयार नाही, जो तो सोशल डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न करत कोरोनाच्या  प्रादुर्भावापासून अलग करीत आहेत, अशा वेळी  दोन तरूण अपघात होऊन रस्त्यावर पडलेले असताना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी सरकारी गाडीत त्यांना उचलून टाकत त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले,  या दोघा तरुणांना कोरोणाच्या काळात एक प्रकारे जीवनदा

मुख्याध्यापक दिनेश साळुंके अर्थात मदतीला धावून जाणारा खरा कोरोना योद्धा ! त्यांचा सत्कार म्हणजे सामाजिक भान असलेले सहृदयी व्यक्तिमत्वाचा सत्कार - प्रशांत जानी, डिस्ट्रिक गव्हर्नर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
कोरोना योद्धा सन्मान     कोरोना संचारबंदी,लाॅकडाऊन काळात नंदुरबार जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात गरजू कुटुंबांना मदत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, खाजगी डाॅकटरांना पी.पी.ई. किटचे वाटप,माकस्चे मोफत वाटप, कोविड १९ आजारा संदर्भात जनजागृती करून अवरॅनेसचे काम, काळजी व उपाय संदर्भात सोशल मिडीया द्वारे माहिती प्रसिध्द केली.           २३ मार्चपासून सुरू असलेल्या लाॅकडाऊनमध्ये मुख्याध्यापक दिनेश साळुंके यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजूंना मदत केली, मदतीसाठी मित्रपरिवारामार्फत गरजूंची माहीती घेत शक्यहोईल तितकी मदत पोहोचविली. शाळेला सुट्टी असूनही नंदूरबार व विखरण येथेच थांबणे पसंत केले, याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांचा कोविड योद्धा म्हणून प्रशस्तीपत्राद्वारे सत्कार केला. मात्र आंतरराष्ट्रीय रोटरी क्लब ऑफ नंदनगरी यांनी साळुंके यांचे कार्य फक्त प्रशस्तीपत्राने न करता महाराष्ट्र राज्याचे डिस्ट्रिक गव्हर्नर प्रशांत जानी यांच्या हस्ते केले. यावेळी जानी यांनी सांगितले की, साळुंके यांच्यासारखे मुख्याध्यापक म्हणजे सामाजिक भान असलेले सहृदयी व्यक्तिमत्व आहे.          आपासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्

नासिकच्या शिक्षकाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद !!! शैक्षणिक उपक्रम 'रविवारचा विरंगुळा" !!! कौतुक तर होणारच पण का ? उपक्रमाच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
नितीन प्रभू केवटे यांच्या ‘रविवारचा विरंगुळा’ या शैक्षणिक उपक्रमाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद            नासिक::-त्र्यंबकेश्वर येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे शिक्षक नितीन प्रभू केवटे (जन्म ०२ नोव्हेंबर १९८९) यांनी प्रत्येक रविवारी मुलांना वर्गाबाहेरचे अनौपचारिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी 'रविवारचा विरंगुळा' या आदर्श शैक्षणिक उपक्रमाची सुरुवात केली. शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया चार भिंतीच्या बंदिस्त खोलीत पूर्णत्वास येऊ शकत नाही. शिक्षण हे सहज निरीक्षणातून व कृतीतून घडते आणि समृद्ध होते. अनौपचारिक शिक्षणात व्यवसाय शिक्षण व जीवन शिक्षण देण्यासाठी मुलांच्या साह्याने शाळेत सिमेंटचा १२ x १४ फूट जागेवर ३ फूट उंच असा मजबूत किल्ला उभारला, सिंटेक्सच्या टाकाऊ टाकी पासून शौचालय निर्मिती, झाडाला सिमेंटचे चबुतरे, जुन्या लाईटच्या खांबाचा उपयोग करून हँडबॉल व व्हॉलीबॉल कोर्टची निर्मिती, शाळेतील टाकाऊ बँडच्या पत्र्यापासून घड्याळ व संख्यावाचन शैक्षणिक साहित्याची निर्मिती, गावातील भजनी मंडळाचा कार्यक्रम, मातीकाम, माळीकाम प्रशिक्षण, गावच्या पाणवठ्या

सर्वपक्षीय नेते एकत्र येत तालुक्यातील जनतेला पक्षविरहीत राजकारणाचा दिला सकारात्मक संदेश !! आज झालेल्या बैठकीच्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संतोष गिरी यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस निसाका-रासाका सुरू करण्याबाबत पिंपळगाव बाजार समितीत जेष्ठ नेत्या सह सर्वपक्षीय आज बैठक संपन्न       नासिक::-निफाड तालुक्यातील जनतेसाठी जीवन-मरणाचा प्रश्न असलेल्या ऊस उत्पादक शेतकरी, सभासद कामगार व संपूर्ण तालुक्यात आर्थिक गणित या दोन्ही संस्थांवर असलेल्या निसाका व रासाका या दोन्ही संस्था सुरु होण्यासाठी व तालुक्‍यातील गेलेले गतवैभव परत येण्यासाठी आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली निफाड तालुक्यातील सर्वपक्षीय जेष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी दोन्ही कारखाने सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. माजी आमदार अनिल कदम  यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली. निसाका-रासाकाच्या मुद्द्यावर शेतकरी हितासाठी आपण आमदार दिलीप बनकर यांना राजकीय जोडे बाजूला ठेवून सहकार्य करणार असून बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे अनिल कदम यांनी यावेळी जाहीर केले. निसाकाच्या बाबत जिल्हा बँकेच्या बैठकीत चर्चा झाली असून इतर सक्षम संस्थाना कारखाने चालवण्यास देण्यासाठी अध्यादेश काढून विधानसभेत कायदा