पक्षीय जोडे बाजूला ठेवून मॅरेथॉन बैठकांनी सहकार क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची आशा ! आता मात्र निर्णायक लढाईसाठी सर्व एकत्रित येणार ? सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

संतोष गिरी यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस,
          नासिक::-निफाड तालुक्यातील सहकार चळवळ कर्मवीरांनी ज्या अनुषंगाने स्थापन केली होती त्यासाठी आपण समाजाचे देणे लागतो या लोक भावनेतून आपण सर्वांनी काम केले तर पुन्हा संस्थांना व सहकारला उर्जिता अवस्थेत आणणे अवघड नाही, निफाड सहकारी साखर कारखाना, कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना हे दोन सहकारी व केजीएस शुगर इन्फ्रा प्रा.ली., हा खाजगी कारखाना बंद अवस्थेत असल्याने हे कारखाने सुरु करणे कामी निफाड तालुक्यातील सर्व पक्षीय जेष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करावा या दृष्टिकोनातून निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी पुढाकार घेऊन पिंपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये सोमवारी बैठक आयोजित करून आपली भूमिका मांडली.
सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी तालुक्यातील जेष्ठ नेते माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील होते.
यावेळी विलास बोरस्ते यांनी बैठकीचा मुख्य हेतू काय आहे हे विशद करून आमदार दिलीप बनकर यांनी प्रास्ताविका मध्येच बैठकीचा मुख्य हेतू तालुक्यातील सहकार चळवळ टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून जेष्ठाचे मार्गदर्शन व सहकार्य अपेक्षित असल्यानेच बैठकीचे आयोजन करण्यात आले असे प्रतिपादन केले. सदर बैठकीच्या सुरुवातीला वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी आमदार दिलीप बनकर यांनी तालुक्यातील सहकार चळवळ टिकविण्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे पाऊल उचलेले असून त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तालुक्यातील तिन्ही साखर कारखाने सध्या बंद अवस्थेत आहेत हे कारखाने सुरु करणे हि काळाची गरज आहे हि बाब महत्वाची असून या संस्था कशा बंद पडल्या, कोणी बंद पाडल्या यावर चर्चा करू नये, तसेच संस्था बंद आहे ही वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेऊन चर्चा करावी आणि  तीनही कारखान्याच्या बाबतीत प्रथम प्राधान्य कोणत्या कारखान्यास द्यावयाचे हे बैठकीत निश्चित करावे, तसेच सभासदांच्या भावना लक्षात घेऊन सभासदांच्या वतीने कारखाना सुरु करता येईल का याबाबत देखील विचार व्हावा अशा प्रकारच्या सूचना विनायकदादा पाटील यांनी केल्या. याबाबतीत विश्वासराव कराड यांनी प्रथमच आपले मत व्यक्त करतांना केजीएस शुगर इन्फ्रा प्रा.ली. हा कारखाना बँकेच्या कर्जामध्ये अडकलेला असून बँकेचा निर्णय झाल्या खेरीज हा कारखाना सुरु करणे शक्य नाही, त्यामुळे या कारखान्याच्या बाबतीत चर्चा न करता उर्वरीत दोन्ही सहकारी कारखान्याच्या बाबतीत प्राधान्याने विचार करावा असे नमूद केले.
यावेळी माजी आमदार अनिल कदम यांनी निसाका व रासाका हे दोन्ही कारखाने सुरु करण्यासाठी कोणताही सभासद फंड जमा करणार नाही, तशी अपेक्षा करणे देखील योग्य होणार नाही, त्यामुळे सदरचे कारखाने हे इतर पर्यायातून सुरु करावे लागतील हे नमूद करून रानवड कारखाना सुरु करणे सोपे आहे. परंतु निसाका सुरु करणे अडचणीचे असुन तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी रासाका व निसाका सुरु करण्यासाठी तयारी दर्शावावी. त्यांना मी संपूर्ण पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगितले.
यावर निसाका सुरु करणेसाठी निश्चितच माझे प्रयत्न असल्याचे आमदार दिलीप बनकर यांनी सांगितले. परंतु निसाका बाबतीत जे काही सत्य आहे हे सुद्धा या बैठकीमध्ये समोर येणे गरजेचे आहे. सदरचा कारखाना हा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात असून बँकेने दि.२७/०५/२०१९ रोजी जाहिरात देऊन कारखाना सुरु करण्याच्या संदर्भात निविदा प्रसिद्ध केली होती. त्याप्रमाणे साईकृपा शुगर अँड ऍग्रो इंड लि., श्रीगोंदा या कंपनीने करारानुसार कारखाना सुरु करणेस बँकेने पुढाकार घेतला होता. त्यानुसार रू.२५ लाख रुपये बयाना रक्कम देखील भरली आहे. परंतु पुढे करारनामा व अटीशर्तीची नोंदणी न केल्यामुळे कारखाना सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सदरहू कंपनीस भाडेकरार पोटी अनामत रक्कम रु.५ कोटी भरून करारनामा करून घ्यावा व कारखाना तात्काळ सुरु करावा त्या दृष्टिकोनातून बँकेच्या वतीने दि.२९ जून २०२० रोजी लेखी पत्राद्वारे संबंधितांना कळविण्यात आले होते. त्याकरिता ७ दिवसाची मुदत देखील देण्यात आली होती. परंतु करारनामा न झाल्याने कारखाना सुरु करणे हि मुख्य अडचण ठरत असल्याचे आमदार दिलीप बनकर यांनी बैठकीमध्ये सर्वांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हा बँकेकडील प्राप्त पत्रच आमदार दिलीप बनकर यांनी माजी आमदार अनिल कदम यांना दाखविले असता सदरचे पत्र हे मोठ्याने वाचावे अशा प्रकारच्या सूचना बैठकीचे अध्यक्षांनी केल्या असता माजी आमदार अनिल कदम यानी मोठ्याने पत्र वाचन केले. त्यानंतर निसाका बाबत आमदार दिलीप बनकर यांनी विशद केलेली वस्तुस्थिती खरी असून याबाबत मला निश्चितच माहिती नसल्याचे माजी आमदार अनिल कदम यानी विशद केले. विद्यमान आमदार दिलीप बनकर यांनी कारखाने सुरु करण्या संदर्भात शासन स्तरावर जे काही अध्यादेश काढावयाचे असतील त्यासाठी प्रयत्न करावे, मी देखील त्यांना याकामी मदत करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे अभिवचन यावेळी दिले. यानंतर निसाकाचे माजी चेअरमन तथा मविप्र चे सभापती माणिकराव बोरस्ते यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले कि,  निसाका हा कारखाना श्री साईकृपा शुगर अँड अँग्रो इंड लि., श्रीगोंदा या कंपनीने करारावर घेतलेला असून या कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक पाटील यांच्या सोबत मी चर्चा केली असून त्यांनी करारनामा पोटी लागणारी फी रक्कम रु.५२ लाख बँकेस अदा केलेले आहे. त्यामुळे कारखाना सुरु करण्याच्या दृष्टीकोनातून तातडीने कार्यवाही करण्याबाबत विनंती केली आहे. या बैठकीमध्ये सहकार नेते राजेंद्र मोगल यांनी आपले मत व्यक्त करतांना तालुक्यातील ऊस उत्पादकांचा विचार करता कारखाने सुरु करणे बाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली.
बैठकीत एकुणच झालेल्या सांगोपांग चर्चेचा विचार करता कारखाने सुरु व्हावे याबाबत निश्चितच सकारात्मक विचार होत आहे. यामध्ये केजीएस हा कारखाना सुरु करण्यास मोठी अडचण आहे. तर निसाका बाबत जो काही करार साईकृपा या कंपनीशी झालेला आहे. या कराराच्या बाबतीत पुढील निर्णय होत नाही तो पावेतो या कारखान्याच्या बाबत देखील विचार करणे सोईस्कर वाटत नाही त्यामुळे सर्व प्रथम रासाका सुरु करण्याच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक असून या बैठकीमध्ये सर्व प्रथम रासाका सुरु करण्याचा ठराव पारीत करण्यात येत असल्याचे बैठकीचे अध्यक्ष विनायकदादा पाटील यांनी केला. त्यास सर्वानुमते मान्यता दिली. या बैठकीस नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर, रासाका चे संस्थापक अध्यक्ष तथा कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, मराठा विद्या प्रसारक समाजाच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, नानासाहेब बोरस्ते  हे आवर्जुन उपस्थित होते. तर भाजपाचे जेष्ठ नेते सुरेश बाबा पाटील, माजी आमदार मंदाकिनी कदम, काँग्रेस आय चे प्रदेश सरचिटणीस राजाराम पानगव्हाणे यांनी बैठकीस उपस्थित राहणे शक्य नसल्याने या बैठकीत जो काही निर्णय घेतला जाईल तो आम्हाला मान्य असल्याचे दुरध्वनी द्वारे कळविले असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत तालुक्यातील सर्व जेष्ठ नेतृत्वा ने केवळ फोन द्वारे संदेश देऊन उपस्थित राहिले त्याबदल आमदार दिलीप बनकर यांनी सर्वांचेच आभार व्यक्त केले व तालुक्यातील सहकार चळवळ जिवंत रहावी यासाठी सर्वानीच एकत्र काम करून तालुक्यातील जनतेच्या भावनांचा आदर करण्याचे प्रतिपादन या बैठकी दरम्यान आमदार दिलीपराव बनकर यानी केले.
तसेच सदर बैठकीच्या अनुषगाने पुन्हा दुपारी ४ वाजता तालुक्यातील प्रमुख नेते, दोन्ही कारखान्याचे माजी चेअरमन, संचालक यांच्या समवेत बैठक घेण्यात आली त्यामध्ये सकाळी बैठकीमध्ये झालेल्या चर्चेची इत्यंभुत माहिती देण्यात आली. त्यानुसार पिपळगाव बसवंत कृषि उत्पन्न बाजार समिती, स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था किवा भिमाशंकर अँग्रो प्रा.लि. या माध्यमातून दोन्ही साखर कारखाने सुरु करण्याच्या दृष्टीने आमदार दिलीप बनकर यांनी पुढाकार घ्यावा व सदरचे कारखाने हे आमदार दिलीप बनकर यानी स्वत: चालवावे कारण तालुक्यातील शेतक-यांना केवळ तुमच्या वरच विश्वास असुन आम्ही सर्व गटतट पक्षभेद बाजूला ठेउन या कामासाठी आपणास खंबीरपणे साथ देऊ, अशा प्रकारचे वचन या बैठकीत उपस्थितांच्या मार्फ़त आमदार दिलीप बनकर याना देण्यात आले. या बैठकीस ज्येष्ठ नेते तथा  समर्थ औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष भास्करराव बनकर, रासाका  चे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे,   शंकरराव  कोल्हे,  युवा नेते , प्रणव पवार, भाग्यश्री पतसंस्थेचे अध्यक्ष तथा सहकार नेते रमेशचंद्र घुगे,  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे ,जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे सुरेश कमानकर, निफाड नगरपंचायत नगरसेवक अनिल पाटील कुंदे ,पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती, दिपक बोरस्ते, नाशिक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, निफाड पंचायत समितीचे माजी अध्यक्ष सुभाष कराड, निसाका अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, रासाका माजी अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, पिंपळगाव खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रतापराव मोरे, मविप्र चे निफाड माजी संचालक विश्वास मोरे, रासाका  कृती समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे, भाउलाल कूटे, विठोबा फडे, , धोंडीराम रायते, हीरालाल सानप, दिनकर मत्सागर, विलास मत्सागर,  , भाऊसाहेब भवर, विजय कारे, बापु कुंदे,  बापु गडाख, भुषण धनवटे, सुनिल कुटे, राजेंद्र कुटे, सुरेश जंजाळे, रामभाऊ माळोदे, कृष्णा नागरे, अनिल बोरस्ते, भाऊसाहेब कापसे, सागर कुटे, माधवराव ढोमसे, रामदास सुरवाड़े, दिपक गाजरे, जगदीश माळोदे आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक