न्यूज मसालाचा अंक दि. ३० जुलै २०२०. संपादकीय-मुलाखतीचा सोस !! दीपक दंडवतेंच्या लेखणीतून-सारस्वतांच्या नगरीतील संतोष !!! रासाका-निसाका सहकार विशेषांक !!! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!


संपादकीय
                     मुलाखतींचा सोस !!
मुलाखतीला जायचं म्हणजे तयारी करावी लागते पण कितीही अभ्यास करून जा, जर मुलाखत घेणाऱ्यांनी आधीच ठरवलेले असेल तर काय कुणाची बिशाद की तुमची निवड होईल ? बरं मुलाखत कोणी कोणाची घ्यावी याचे काही संकेत असतात, अनेक ठिकाणी स्पष्ट लिहीलेले असते की परीक्षार्थी ने जर कुणाची ओळख दाखविली, मुलाखत घेणाऱ्यावर दबाव आणला किंवा अनैतिक मार्गाचा अवलंब केला तर उमेदवाराला मुलाखत देण्यापासून रोखले जाईल ! आणि रोखले जातेच !
मात्र आज कुणीही मुलाखत घ्यायला येतो आणि स्वत:ची पाठ थोपटून घेत असतो ! अनाकलनीय असे वाटते.
माध्यमांमध्ये मुलाखतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे हा संशोधनाचा विषय आहे तरीही अनेक माध्यमे मुलाखत या गोंडस नावाखाली उखळ पांढरे करून घेतात, सर्वच मुलाखती अशा असतात असे नाही.
         मुलाखतीची प्रश्नावली कशी, कधी कुणाला अडचणीत आणेल हे सांगता येत नाही व कधी किती सोयीस्कर असेल हेही सांगता येत नाही. मुलाखतीला विचारले जाणारे प्रश्न एकसारखे असतील तरीही ज्याची निवड करायचे ठरविले तोच निवडला जातो ! हे कसं ?
      एका नोकरीसाठीच्या मुलाखतीमध्ये प्रत्येकाला एकच प्रश्र्न विचारला जात होता, "मागे वळून न बघता पाठीमागच्या भिंतीवरील घड्याळात किती वाजले हे सांगायचे होते, सर्वांची उत्तरे चुकीची येत होती ! तिघे मुलाखत घेणारे चष्मा न चढवता प्रश्र्न विचारत होते मात्र ज्या उमेदवाराची निवड करायची होते त्या उमेदवाराच्या वेळी मधल्या मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने डोळ्यांवर चष्मा चढवला, उमेदवाराने समोर चष्म्यात बघून उत्तर दिले ! बरोबर ! उर्वरित दोघे मुलाखतकार अचंबित झाले मात्र त्यांनाही लक्षात आले नाही की आपल्याच पॅनेलमधील मधल्या मुलाखतकाराने चष्मा चढवला ते ?
        दुसरे उदाहरणातील आणखी मजेशीर प्रश्न, आपण मुलाखतीला येताना जो जीना चढून आलात त्याला किती पायऱ्या आहेत ? एक सोडून सर्वांचे उत्तर चुकले, पण ज्याची निवड झाली तो दोन-चार वेळा जीना चढ-उतार करताना सर्वांनी बघीतले होते, खूपच वेंधळा वाटला, मात्र त्याची निवड झाली, त्याने दिलेले उत्तर बरोबर होते, अनेक वर्षे निघून गेलीत तरीही तोच कसा निवडला गेला ? याचे उत्तर इतरांच्या मांडीवर नातवंडे खेळायला लागलीत पण मिळाले नाही ! 
          राजकारणात निवडणुकीचे तिकीट कोणत्या उमेदवाराला द्यायचे यासाठीही मुलाखती होतात ! त्या मुलाखतीत सहसा जास्त प्रश्न विचारले जात नाहीत, मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षपातळीवर उमेदवार निवडीची प्रक्रिया परीक्षा घेऊन करण्याचा प्रयत्न केला गेला, एका चांगल्या पायंड्याला जनतेची मूक संमती तत्कालीन परिस्थितीत मिळाली होती, आपला उमेदवार खरोखर निवडणुकीला उभे राहण्याच्या लायकीचा आहे काय ? गेला बाजार घाट्याचा समजून पहीले पाढे पंचावन्न, एका नवीन प्रक्रियेला खीळ बसली !
           का ? ला उत्तर या जगात नाही ! प्रयत्न करून बघा, राजकारणासाठी कितीही सक्षम उमेदवार असो, त्याला उमेदवारीपासून रोखायचे ठरवलेच तर का ? चे उत्तर त्याच्याकडे मिळूच शकत नाही आणि का ? ला शेवटी कारे ? ने उत्तर दिले की "आऊट" ! अशा कारान्त प्रश्र्नांची सरबत्ती करून लोकशाहीचं, देशाचं भलं होईल ?
बघूया का ? चा खेळ,
चीन बरोबर युद्ध करायचे ? पर्याय दोनच, हो किंवा नाही,
हो असेल तर का ? नाही असेल तर का ?
बरं करुया, फायदा होईल का ? उत्तर हो किंवा नाही !
बरं नाही करायचे, फायदा होईल का ? उत्तर हो किंवा नाही !..................
घ्या बाबांनो, मुलाखती घ्या, जनता काय खुळीच आहे,
का ? चीही मुलाखत डोक्यावरून जाते, इतकं चांगलं आहे की डोक्यावर बसत नाही, नाहीतर "हमाली" पण करता यायची नाही ! 
          माध्यमांच्या मुलाखती समाजासाठी काहीतरी चांगलं देऊ शकतात, मात्र मुद्दामहून आयोजित मुलाखत देताना भविष्यात राजकारण कसे, कोणत्या दिशेने जाणार याचा विचार करता राजकारण करु इच्छिणाऱ्यांनी टाळलेले बरं ! त्यांनी अशा पुर्वलक्षी हेतूने आयोजित मुलाखती देणे व अचानक समोर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावलीवर मुलाखत देणे यांच्यातील फरक समजून घ्यायला हवा असे वाटते ! मुलाखतकार व मुलाखतदार यांच्या संबंधांबाबत जनता खूप चाणाक्ष नजरेने पाहत असते, तिला गृहीत धरण्याचे दिवस नाहीत, आणि तिची आजकालची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे, केव्हाही खिंडीत पकडून घाटावर नेऊन सोडेल ! यापूर्वी अनेकांना "कात्रजचा घाट" दाखविला आहेच ! महत्त्वाकांक्षी राजकारण्यांनी "जरा दमाने" घेत मुलाखतींपासून दूर रहा !
निवृत्त राजकारण्यांनी खुशाल मुलाखती द्याव्यात, त्यातून समाजाला चांगले किंवा वाईट यापैकी काही तरी मिळेल, त्याचा वापर व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतो, पण मुलाखतदाराचं काही नुकसान होत नाही !!
आता विचारू नका !
हे का लिहिले ?
दोस्तो, क्यूं का जवाब नहीं होता !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

महाभारत, रामायणाने देशाला जोडून ठेवले – मधु मंगेश कर्णिक