कोविड रुग्ण तात्काळ शोधणे व उपचार होणेकामी "सच प्रणाली" नामक ऑनलाईन ऍपचे उदघाटन ! सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक - बाळासाहेब क्षीरसागर !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

"सच प्रणाली" ऍपचे उदघाटन संपन्न !
******************************
       नासिक::-कोरोना प्रतिबंधात्मक पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका आढावा सभेप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सीमंतिनी कोकाटे, पंचायत समिती सभापती सौ.शोभाताई बरके, उपसभापती संग्राम कातकाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल व संगोपन अधिकारी डॉ. चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन बच्छाव, गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड, ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड, पंचायत समिती सदस्य जगन भाबड, सौ.संगीता पावसे, भगवान पथवे, सौ. सुमन बर्डे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
         कोरोना प्रादुर्भाव या संदर्भात लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्या समस्या व त्यावर करावयाची उपाययोजना या संदर्भात समन्वयाने चर्चा करण्यात आली. कोरोना हे देशावरील संकट असल्याने सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याची भूमिका जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर यांनी मांडली.
      कोविड रुग्ण तात्काळ शोधणे व उपचार होणेकामी "सच प्रणाली" नामक ऑनलाईन ऍपचे उदघाटन नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर याचे हस्ते करण्यात आले.
         "सच ऍपद्वारे" शारिरीक दृष्ट्या दुर्धर तथा इतर आजाराने बाधित असल्यास ते रुग्ण तात्काळ शोधण्यास मदत होणार आहे. भविष्यात कोविड आजारावर मात करण्यासाठी सदर "सच  ऍप" प्रणालीचा चांगला उपयोग होणार आहे. सदर ऍपद्वारे विविध आजाराने बाधित रुग्णास कोविड बाधित होण्याचा धोका जास्त असल्याने अशा रुग्णांना विशेष आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध करुन देण्यास मदत होणार आहे. सदरच्या "सच ऍप" प्रणाली सिन्नर तालुक्यात प्रायोगिक तत्वावर वापर सुरु करण्यात आला आहे. "सच ऍपचा" अनुभव लक्षात घेऊन संपूर्ण नाशिक जिल्ह्यात "सच ऍपचा" वापर जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहे.
     सदर "सच ऍप" विकसित करण्यासाठी नाशिक जिल्ह्याची अग्रणी बँक- बँक ऑफ महाराष्ट्र यांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमा अंतर्गत निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. कोविड विरोधी मोहिमेत सामाजिक बांधिलकी म्हणुन बँक ऑफ महाराष्ट्र यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्राचे विशेष अभिनंदन नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी श्रीमती लीना बनसोड यांनी केले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी अहीराणी भाषेतून केले आवाहन ! व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

फ्युचर मेकर बद्दल वितरकांची कुठलीही तक्रार नाही-ट्रेनर महेंद्र सुर्यवंशी , फ्युचर मेकरचे व्यवहार पारदर्शक असुन लवकरच कंपनी आपले व्यवहार सुरू करणार-बापू ढोमसे, सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!