पोस्ट्स

माडसांगवीच्या सूनबाई प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलाचे नेतृत्व करणार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
अरूण बिडवे यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस,            नासिक (माडसांगवी)::- २६ जानेवारी २०२१ रोजी राजपथ दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या भारतीय संघात महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नाशिक येथील नवजीवन विधी महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी सौ.शालिनी मनोज पेखळे - घुमरे यांची निवड करण्यात आली आहे.   २० नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२० या कालावधीत पश्चिम क्षेत्र राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक पथसंचलन शिबिर हैदराबाद येथे संपन्न झाले यामध्ये महाराष्ट्रातून २८ मुले आणि २८ मुली अशी एकूण ५६ स्वयंसेवकांची व २ कार्यक्रम अधिकारी यांची निवड करण्यात आली होती. हैदराबाद येथे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दादर हवेली, या सहा राज्यातील दोनशे निवडक विद्यार्थी व ११ कार्यक्रम अधिकारी शिबिरात सहभागी झाले होते. उत्कृष्ट लिडरशिप करून सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन उत्कृष्ट संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम  यांचे उत्तम सादरीकरण करून घेत महाराष्ट्रातील १४ विद्यार्थ्यांची गोवा येथील २ व १ कार्यक्रम अधिकारी यांची दिल्ली येथे पथसंचालना कारीता नि

सांभळ, तूरथाळी वाद्यांच्या गजरात विकास कामांचा भूमीपूजन व लोकार्पण सोहळा ! आमदार नितीन पवार यांच्या हस्ते संपन्न !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
ग्रामपंचायत मांधा येथे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन संपन्न भागवत गायकवाड यांजकडून, न्यूज मसाला सर्विसेस     नासिक(२७)::-आज सुरगाणा तालुक्यातील गृप ग्रामपंचायत मांधा व नाईकपाडा गावातील विविध कामांचा रू १ कोटी रकमेचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नुकताच कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या हस्ते आदिवासी परंपरेनुसार सांभळ, तूर थाळी अशा वाद्यांच्या स्वरूपात मोठ्या आनंदाने हा भूमिपूजन सोहळा पार पडला, मांधा गावातील परिस्थिती लक्षात घेऊन आमदार नितीन पवार यांनी तेथील जनतेच्या समस्या दूर व्हाव्यात, ही गोष्ट लक्षात घेऊन आमदार नितीन पवार यांच्या प्रयत्नातून मांधा व नाईकपाडा येथे विविध विकास कामे व्हावे म्हणून आज हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्यांनतर  माकपमध्ये कार्यरत असलेल्या जाणू पांडुरंग ठाकरे, अशोक थोरात, सुकर मळू गावित, , आदी कार्यकर्त्यांनी माकपाला सोड चिठ्ठी देत आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, चिंतामन गावित, वसंत झिरवाळ, नवसु गायकवाड, भास

ब्रह्माकुमारी संस्थेत ख्रिसमस सण उत्साहात साजरा ! ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस- ब्रह्माकुमारी शक्ती दीदी,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
ब्रह्माकुमारी संस्थेत ख्रिसमस सण उत्साहात साजरा ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस- ब्रह्माकुमारी शक्ती दीदी नाशिकरोड - (दि. 25 डिसेंबर) ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस आहे. आपल्या जीवनात नेहमी नवीन चांगल्या व सकारात्मक गोष्टी घडाव्यात, सांताक्लॉज घेऊन ज्याप्रमाणे सर्वांना गोड पदार्थ वाटतात त्याप्रमाणे आपल्या जीवनातही गोडवा राहावा अशा  शुभेच्छा नाशिकरोड येथील  ब्रह्माकुमारी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शक्ती दीदी यांनी उपस्थितांना दिला.        सेंट फिलोमिना स्कूल समोरील सागर हेरिटेज इमारतीतील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातील सभागृहात ख्रिसमस हा सण मोठ्या हर्षल उल्हासाने साजरी करण्यात आला.  याप्रसंगी ब्रह्मकुमार दिलीप यांनी ख्रिसमस सणाची माहिती संताक्लौज रूप परिधान करून सांगितले तर  ब्रह्माकुमार मोहन भाई यांनी ख्रिस्तमस चे गीत गायले. ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी सर्व उपस्थितांना भेटवस्तू व प्रसादाचे वाटप केले.  भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण आपल्याला एकात्मतेचा संदेश देतो व आनंदी राहण्याचा व नवीन काही शिकण्यासाठी प्रेरित करतो असेही शक्ती दीदी यांनी याप्रसं

जल है तो कल है ! डोल्हारे येथे श्रमदानातून दोन वनराई बंधारे निर्मिती !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
डोल्हारे येथे श्रमदानातून  वनराई बंधारे निर्मिती भागवत गायकवाड यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस सुरगाणा ता:२६::- तालुक्यातील आदिवासी भागातील निसर्गाचं वरदान लाभलेल्या डोल्हारे ता.सुरगाणा येथे गावातील जेष्ठ माणसं, जागरूक युवावर्ग, महिला भगिनी, कृषी विभाग, ग्रामपंचायत कर्मचारी व शाळा कर्मचारी यांच्या श्रमदानातून "जल है, तो कल है!" या उद्देशाने प्रेरित होऊन गावात लोक सहभागाने श्रम दानातून गावातील विहरीजवळ व शिवारात एका ठिकाणी असे दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. सदर बंधाऱ्यांमुळे गाव पाणवठ्याच्या विहीरीची पाणी पातळी वाढेल. गुरांसाठी पिण्याचे पाणी राहील. कपडे धुणे व घर कामासाठी पाणी टिकून राहणार आहे. यावेळी गावाच्या हिताच्या कार्यात कृषी सहायक हरिभाऊ गावित, ग्रामसेवक प्रविण भोये ग्रामसेवक, राजु पाडवी, वसंत पाडवी, बाळू पाडवी, लक्ष्मण वळवी, हेमंत पाडवी नारायण पाडवी, रामदास पवार, मनु पाडवी यांनी प्रत्यक्ष श्रमदानाने परिपूर्ण नियोजन करत सहभाग घेतला. नियोजना साठी कृषीपर्यवेक्षक एम.वाय. चव्हाण, सुरगाणा मंडळ कृषी अधिकारी जे.एच.आढळ, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, परशराम पाडवी सर 

न्यूज मसाला अंक २४ डिसेंबर २०२०,. संपादकीय-- बाळासाहेबांची घरवापसी ! निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो.  "संधी" समोर दिसूनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही....        भाजपात घरवापसी झालेले नासिक चे माजी आमदार "कार्यसम्राट"  बाळासाहेब सानप ! कधीकाळी ग्रामीण भागातून नासिक शहरात आले आणि नशीब आजमावून पहात असताना त्यांनी जी "निवड" केली तिचं "संधीत" रुपांतर करुन जो "बदल" घडवून आणला,,,,,,,,,,,. सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
बाळासाहेबांची घरवापसी ! निवड, संधी आणि बदल या तिन्ही पण महत्वाच्या गोष्टी आहेत. "संधी" दिसता "निवड" करता आली तर "बदल" आपोआप होतो.  "संधी" समोर दिसूनही ज्याला "निवड" करता येत नाही त्याच्यात कधीच "बदल" घडत नाही....        भाजपात घरवापसी झालेले नासिक चे माजी आमदार "कार्यसम्राट"  बाळासाहेब सानप ! कधीकाळी ग्रामीण भागातून नासिक शहरात आले आणि नशीब आजमावून पहात असताना त्यांनी जी "निवड" केली तिचं "संधीत" रुपांतर करुन जो "बदल" घडवून आणला तो डोळे विस्फारणा ठरला होता, संधीच्या शोधातले बाळासाहेब नासिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, त्याक्षणी महापौर पदाची माळ गळ्यात पडते, माळेतील फुलं कोमजण्याआधीच आमदार होतात, भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष पदही एक व्यक्ती एक पद याला फाटा देत सांभाळतात ! हा बदल त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला, अती महत्त्वाकांक्षी होण्यास कारणीभूत ठरला, मंत्रीपदाचा मुकुट चढायलाच हवा अशी कार्यकर्त्यांची, नासिककरांची इच्छा होती की नाही याची चाचपणी करण्यात गल्लत झाली,

दिव्यांग साहील चौधरी ला रोशनी इंटरनॅशनल शाॅर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
साहिल चौधरी ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार द्वितीय  पुरस्कार... भागवत गायकवाड यांजकडून न्यूज मसाला सर्विसेस नासिक (मनखेड): - ता.२२ नुकत्याच झालेल्या रोशनी इंटरनॅशनल शाॅर्ट फिल्म फेस्टीवल औरंगाबाद येथे भारताबरोबर १५ देशातील ६५० हून जास्त चित्रपटांनी सहभाग नोंदविला होता.या सर्व लघूपटातून एका सत्य घटनेवर आधारीत  दिग्दर्शक बलराम माचरेकर निर्मित "पाठलाग स्वप्नांचा" या लघूपटामधील  बाल कलाकार सुरगाणा तालुक्यातील  चिकारपाडा (दे) येथील  साहिल चौधरी ला सर्वोत्कृष्ट बालकलाकार द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार जाहीर झाले.   या फिल्म फेस्टीवल चे आयोजक तुषार थोरात यांनी साहिल चे विशेष कौतूक केले.   नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातून साहिल चौधरी वर अभिनंदनचा वर्षाव होतांना दिसत आहे.    साहिल दोन्ही पायांनी दिव्यांग होता परंतु आपल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून शिक्षक बलराम माचरेकर यांच्या प्रयत्नातून चालायला लागला, यांचा खुप आनंद पाहावयास मिळत आहे. ---------     साहिल हा दोन्ही पायांनी दिव्यांग असलेला माझा विद्यार्थी. सतत प्रयत्न करून साहिल ला सामाजिक संस्थेच्या मदतीने दोन्ही पाया

अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांची जिल्हापरिषदेला भेट ! जलजीवन मिशनचा घेतला आढावा ! महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणे हे प्रमुख ध्येय ठेवुन जलजीवन मिशन योजना जिल्हयात राबविण्यात येत आहे- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
  नाशिक – राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी आज जिल्हा परिषदेला भेट देऊन जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाबाबत आढावा घेतला. तसेच ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांकडील पाणी पुरवठयाच्या नमुना नंबर ९ नुसार नळ कनेक्शनची स्वत: शासन संकेतस्थळावर पडताळणी केली. स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत नाशिक पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मित्रा या प्रशिक्षण केंद्रात  केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त   सचिव अरुण   बरोका यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले हेाते. या बैठकीसाठी आलेल्या डॉ. संजय चहांदे यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान टप्पा-२ अभियानाचा आढावा घेतला. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यामध्ये घरोघरी नळजोडणी करण्यात येत आहे. या कामाबाबत त्यांनी आढावा घेत ऑनलाईन करण्यात आलेल्या माहितीची ग्रामपंचायतीकडील नमुना नंबर ९ नुसार पडताळणी केली. यावेळी यादृच्छिक पध्दतीने जिल्हयातील १० ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेत बोलावून नमुना नंबर ९ वरील नळकनेक्शन धारकांच्या नोंदी व केंद्र शासनाच्या

दि. १७ डिसेंबर २०२० चा अंक ! संपादकीय- बातमीत संस्कार ओतने काळाची गरज !! सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!!

इमेज
संपादकीय- बातमीत संस्कार ओतने काळाची गरज ! पीतपत्रकारितेचा शिरकाव हा पत्रकारिता क्षेत्राला भविष्यात मोठा अडसर ठरेल काय ? या विषयावर अनेक दिग्गज पत्रकारांनी, संघटनांच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केले असून ठोस निर्णयापर्यंत कसे पोहचावे ही द्विधा मनस्थिती अनेक पत्रकारांसाठी डोकेदुखी ठरू पहात आहे. पत्रकारिता क्षेत्रात करीअर करायचे असल्यास कमीतकमी १२ वी पर्यंत चे शिक्षण असावे असे माहीती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने सांगितले जाते किंवा पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण असावा परंतु माध्यम मालक, संपादक यांच्या कडून सर्रास दहावी किंवा विना शिक्षणाची अट काय दर्शविते हा संशोधनाचा विषय आहे.       पत्रकारितेत अशा व्यक्तिंचा शिरकाव होत असेल तर याबाबत  माध्यम मालक-संपादक यांनीच निर्णय घ्यावा, निर्णय योग्य की अयोग्य याचा उहापोह या लेखातून करायचा नाही मात्र बातम्यांचा सामाजिक जीवनावर काय परिणाम होतो हे तरी लक्षात  घ्यायला हवे.       मध्यंतरीच्या काळातील एक बातमी "बापाचा मुलीवर बलात्कार !", या बातमीला कुणी आक्षेप घ्यावा असे प्रथमदर्शनी मुळीच वाटत नाही परंतू ग्रामीण भारतातील अनेक स्त्रि

संपूर्ण जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार- अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आज झालेल्या शिबिरात रक्तदान करून महीला वर्गापुढे एक आदर्श निर्माण केला ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
जिल्हा परिषदेत रक्तदान शिबीर संपूर्ण जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान राबवली जाणार मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीही केले रक्तदान नाशिक : जिल्हा परिषदेतर्फे मंगळवार दि. १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या कै. रावसाहेब थोरात सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा निर्माण झालेला तुटवडा भरुन काढण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.  या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यात १५ ते ३१ डिसेंबर या काळात टप्प्या-टप्प्याने रक्तदान शिबीर घेण्याचा मनोदय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केला होता. या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात दिनांक १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद, नाशिक व जिल्हा शासकीय रुग्णालयाची शासकीय रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर पार पडले. या रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसो

सामाजिक दातृत्वाची अनुभूती,. निमाकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किट भेट ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!

इमेज
निमाकडून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किट भेट नासिक ::-  'निमा' नाशिक च्या वतीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास ६० मेडिकल किट त्याच बरोबर थर्मामीटर गन, पल्स ऑक्सिमीटर हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागास प्रदान करण्यात आले. या मेडिकल किट मध्ये दोन गॉगल, २ एन९५ मास्क, २५ डिस्पोझेबल मास्क, १००मिली. सॅनिटायझर बॉटल, २५० मिली. सॅनिटायझर बॉटल अशा स्वरूपाच्या वस्तू आहे, या वस्तू ग्रामीण भागात काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन केले, निमाच्या या सामाजिक दायित्वाबद्दल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी उपस्थित निमाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले, यावेळी निमाचे मानद सरचिटणीस तुषार चव्हाण, निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कलकर्णी, बाळासाहेब गुंजाळ, निमा हेल्थ कमिटीचे चेअरमन जयंत पवार, कैलास वराडे, लिगल कमिटीचे चेअरमन संजय महाजन, निमाच्या कार्यकारी सचिव सोनाली देवरे आदी उपस्