ब्रह्माकुमारी संस्थेत ख्रिसमस सण उत्साहात साजरा ! ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस- ब्रह्माकुमारी शक्ती दीदी,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!


ब्रह्माकुमारी संस्थेत ख्रिसमस सण उत्साहात साजरा


ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस- ब्रह्माकुमारी शक्ती दीदी


नाशिकरोड - (दि. 25 डिसेंबर) ख्रिसमस हा सण आनंद, स्नेह व नवीनतेचा दिवस आहे. आपल्या जीवनात नेहमी नवीन चांगल्या व सकारात्मक गोष्टी घडाव्यात, सांताक्लॉज घेऊन ज्याप्रमाणे सर्वांना गोड पदार्थ वाटतात त्याप्रमाणे आपल्या जीवनातही गोडवा राहावा अशा  शुभेच्छा नाशिकरोड येथील  ब्रह्माकुमारी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी शक्ती दीदी यांनी उपस्थितांना दिला. 

      सेंट फिलोमिना स्कूल समोरील सागर हेरिटेज इमारतीतील ब्रह्माकुमारी सेवा केंद्रातील सभागृहात ख्रिसमस हा सण मोठ्या हर्षल उल्हासाने साजरी करण्यात आला.  याप्रसंगी ब्रह्मकुमार दिलीप यांनी ख्रिसमस सणाची माहिती संताक्लौज रूप परिधान करून सांगितले तर  ब्रह्माकुमार मोहन भाई यांनी ख्रिस्तमस चे गीत गायले. ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी सर्व उपस्थितांना भेटवस्तू व प्रसादाचे वाटप केले.

 भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण आपल्याला एकात्मतेचा संदेश देतो व आनंदी राहण्याचा व नवीन काही शिकण्यासाठी प्रेरित करतो असेही शक्ती दीदी यांनी याप्रसंगी सांगितले या कार्यक्रमात मोजक्या संख्येने ब्रह्माकुमारी संस्थेचे नियमित साधक सोशल डिस्टंसिंग चे पालन करून व मास परिधान करून उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!

बालविवाह रोखणे यंत्रणेतील प्रत्येकाची जबाबदारी - लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, जि.प.