माडसांगवीच्या सूनबाई प्रजासत्ताक दिनी दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलाचे नेतृत्व करणार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!


अरूण
बिडवे यांजकडून,
न्यूज मसाला सर्विसेस,

           नासिक(माडसांगवी)::- २६ जानेवारी २०२१ रोजी राजपथ दिल्ली येथे होणाऱ्या पथसंचलनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या भारतीय संघात महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नाशिक येथील नवजीवन विधी महाविद्यालय कार्यक्रम अधिकारी सौ.शालिनी मनोज पेखळे - घुमरे यांची निवड करण्यात आली आहे.   २० नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२० या कालावधीत पश्चिम क्षेत्र राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक पथसंचलन शिबिर हैदराबाद येथे संपन्न झाले यामध्ये महाराष्ट्रातून २८ मुले आणि २८ मुली अशी एकूण ५६ स्वयंसेवकांची व २ कार्यक्रम अधिकारी यांची निवड करण्यात आली होती. हैदराबाद येथे महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, दादर हवेली, या सहा राज्यातील दोनशे निवडक विद्यार्थी व ११ कार्यक्रम अधिकारी शिबिरात सहभागी झाले होते. उत्कृष्ट लिडरशिप करून सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन उत्कृष्ट संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम  यांचे उत्तम सादरीकरण करून घेत महाराष्ट्रातील १४ विद्यार्थ्यांची गोवा येथील २ व १ कार्यक्रम अधिकारी यांची दिल्ली येथे पथसंचालना कारीता निवड झाली आहे. यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या व नवजीवन विधी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी तसेच माडसांगवी च्या सुनबाई सौ. शालिनी मनोज पेखळे - घुमरे यां संघात संघ नायिका म्हणून प्रतिनिधित्व करीत आहे. सौ. पेखळे यांचे यशाकरिता महाराष्ट्र व गोवाचे क्षेत्रीय संचालक कार्तिकेय सर, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन करमाळकर, राज्य संपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य मा. अतुल साळुंखे , तसेच युवा अधिकारी मा. अजय शिंदे , पुणे विद्यापीठ रासेयो चे संचालक डॉ. प्रभाकर देसाई , जिल्हा समन्वयक रवींद्र अहिरे व पुष्कर पाडेकर, डॉ.डी. के. आहेर, स्थानिक समन्वयक डॉ. पिंगळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के. के. देव,  महाविद्यालयाचे  अध्यक्ष सुभाष देशमुख (बडे सर)  महाविद्यालयाच्या सचिव सौ. विजया सुभाष  देशमुख (बडे मॅडम)  मार्गदर्शन लाभले आहे.
सौ.शालीनी पेखळे यांच्या निवडीबद्दल माडसांगवी पोलीस पाटील आण्णा गरड, तंटामुक्ती अध्यक्ष खंडेराव पेखळे, सोसायटी चेअरमन अनिल बुणगे, क्रु.उ.बा.संचालक तुकाराम पेखळे, माजी सरपंच संपत पेखळे, नरेंद्र पेखळे, जगन्नाथ पेखळे, साहेबराव पेखळे आदींनी अभिनंदन केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!