दिव्यांग साहील चौधरी ला रोशनी इंटरनॅशनल शाॅर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा !!


साहिल चौधरी ला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय बालकलाकार द्वितीय  पुरस्कार...

भागवत गायकवाड यांजकडून
न्यूज मसाला सर्विसेस

नासिक (मनखेड): - ता.२२ नुकत्याच झालेल्या रोशनी इंटरनॅशनल शाॅर्ट फिल्म फेस्टीवल औरंगाबाद येथे भारताबरोबर १५ देशातील ६५० हून जास्त चित्रपटांनी सहभाग नोंदविला होता.या सर्व लघूपटातून एका सत्य घटनेवर आधारीत  दिग्दर्शक बलराम माचरेकर निर्मित "पाठलाग स्वप्नांचा" या लघूपटामधील  बाल कलाकार
सुरगाणा तालुक्यातील  चिकारपाडा (दे) येथील  साहिल चौधरी ला सर्वोत्कृष्ट बालकलाकार द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार जाहीर झाले.
  या फिल्म फेस्टीवल चे आयोजक तुषार थोरात यांनी साहिल चे विशेष कौतूक केले.
  नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातून साहिल चौधरी वर अभिनंदनचा वर्षाव होतांना दिसत आहे.
   साहिल दोन्ही पायांनी दिव्यांग होता परंतु आपल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करून शिक्षक बलराम माचरेकर यांच्या प्रयत्नातून चालायला लागला, यांचा खुप आनंद पाहावयास मिळत आहे.

---------
    साहिल हा दोन्ही पायांनी दिव्यांग असलेला माझा विद्यार्थी. सतत प्रयत्न करून साहिल ला सामाजिक संस्थेच्या मदतीने दोन्ही पायांनी चालायला भाग पाडले.रोशनी आंतरराष्ट्रीय शाॅर्ट फिल्म फेस्टीवल मध्ये साहिलला सर्वोत्कृष्ट बालकलाकार द्वितीय क्रमांक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनस्वी आनंद वाटले.
   बलराम माचरेकर
दिग्दर्शक "पाठलाग स्वप्नांचा" लघूपट

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड युके कडून उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर सन्मानित !

अनंत कान्हेरे मैदान विकसित तरी समस्या कायम ! आयुक्तांना निवेदन !

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !