पोस्ट्स

संभाजी ब्रिगेड तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
     नासिक::- म्हसरूळ येथील संभाजी ब्रिगेड प्रणीत प्रसादनगर मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी छत्रपती शिवरायांच्या मुर्तीस पुष्पहार घालुन आभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे हार्दिक निगळ, हर्षल पवार, बापु शिरसाठ, पप्पू गोसावी, शुभम पाटिल, आभिषेक घोडेकर, ओंकार इचाळे, प्रसाद गोसावी, साहील गांगुर्डे, रुपेश मोरे, शिवम पगार, कार्तीक निकम व प्रसादनगर, कलानगर, निसर्गनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

पोलिस आयुक्तांची सल्लागार समिती ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अ.भा.मराठी साहित्य संमेलन- पोलिस आयुक्तांची सल्लागार समिती       नाशिक::- येथे होणारे ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन निर्विघ्नपणे व शांततेत पार पडावे यासाठी नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सल्लागार समिती गठित केली आहे. संमेलनात होणारे विविध कार्यक्रम, मिरवणुक आदिस परवानगी देणे, संमेलन सुरळीत पार पडावे यासाठी उपाय योजना करणे, वाहतूक व पार्किंग व्यवस्था इ. विषयांवर ही समिती विचार करणार आहे. या समितीवर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय,  कामगार, सार्वजनिक बांधकाम, विद्युतपुरवठा, प्रादेशिक परिवहन, अन्न व औषधे प्रशासन यांचे प्रतिनिधी आहेत. लोकहितवादी मंडळाचे प्रतिनिधी म्हणून विश्वास ठाकूर  आणि डाॅ. वैशाली बालाजीवाले हे या समितीवर सदस्य म्हणून काम करणार आहेत.

साहित्य संमेलनाला मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य : कुलगुरू ई वायूनंदन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
साहित्य संमेलनाला मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य : कुलगुरू ई वायूनंदन,  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ           नाशिक : नाशिकमध्ये २६ मार्चपासून होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायूनंदन यांनी साहित्य संमेलन आयोजन समितीच्या शिष्टमंडळाला दिली. याबाबत माहिती देताना जातेगावकर म्हणाले, की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे भूषण आहे. सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेले आणि ज्ञानाची गंगा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन शिक्षणापासून वंचित असलेल्या लाखो लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणारे  ज्ञानशिक्षणाचे महाद्वार आहे. येत्या साहित्य संमेलनासाठी मुक्त विद्यापीठासारखी सशक्त आणि लोकाभिमुख संस्था आयोजकांना सहकार्य करण्यासाठी भक्कमपणे पाठीशी उभी रहावी, याकरिता संमेलन आयोजकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू वायूनंदन यांची भेट घेऊन संमेलनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी नाशिकमध्ये होणार

संमेलनाला सर्वतोपरी मदत करू : आ. सीमा हिरे. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
संमेलनाला सर्वतोपरी मदत करू : आ. सीमा हिरे         नाशिक येते २६ ते २८ मार्च रोजी होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जी काही मदत लागेल ती व्यक्तीशः व भारतीय जनता पार्टीचे तिनही  आमदार, नासिक मनपा महापौर करण्यास कटिबद्ध आहोत. केवळ आर्थिक दृष्टया नाही, तर स्वतः हजर राहून हे संमेलन यशस्वी करू, असे प्रतिपादन नाशिक पश्र्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी केले.            मराठी साहित्य संमेलनाच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणातील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. सोमवारी (ता. ८) रोजी बैठक झाली. यावेळी त्यांनी संमेलनासाठी देण्यात येणाऱ्या १० लाखाच्या निधीचे पत्र लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, अनिल भालेराव, महेश हिरे, विश्वास ठाकूर यांच्यासह लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.             गिरीश पालवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध आहे. जी काही मदत लागेल ती भाजपा

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - ई पेमेंट पद्धती  उपलब्ध ! किती शुल्क व बॅंक खाते क्रमांक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!  

इमेज
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - ई पेमेंट पद्धती  उपलब्ध       नासिक::-९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्च २०२१ दरम्यान नाशिकला होत आहे. त्या साठीचे प्रतिनिधि शुल्क (रु. ३०००/- ), स्वागत समिती सदस्य शुल्क   (रु. ५०००/- व अधिक), ग्रंथ प्रदर्शन स्टॉल बुकिंग शुल्क  (रु. ६५००/- ), आणि इतर तत्सम शुल्क संबंधीतांना  ऑनलाइनपद्धतीने  संमेलनाच्या बँक खात्यात भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.         ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्यासाठीचा तपशील खालील प्रमाणे आहे.  नांव:- 94 ABMSS LOKHITWADI MANDAL NASHIK खाते क्रमांक::- 077100100000005 बॅंक::-The Nashik Merchants Co-op Bank Ltd. College Road Branch,  IFSC : NMCB0000078           ऑनलाइन पद्धतीने शुल्क  भरतांना पूर्ण नाव, गाव, मोबाइल नंबर आणि कशासाठी शुल्क भरले याची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच सादर माहिती आणि भरलेली रक्कम, UTR  NO. अथवा REF. NO. अथवा स्क्रीन शॉट सह ९४२२९४५०५३ या वॉट्स ऍप क्रमांकावर पाठवावे असे आवाहन मंडळाचे कोषाध्यक्ष श्री. चंद्रकांत दीक्षित यांनी केले आहे.  या बाबत अथवा  ९४

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष र. ग. कर्णिक यांचे निधन !!

इमेज
र. ग. कर्णिक यांचे निधन अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ तथा शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे माजी निमंत्रक, लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे हृदय स्थान असलेले र. ग. कर्णिक यांचे आज दुख:द निधन झाले.  अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या इतिहासात प्रखरपणे प्रकाश देणारा नभातील लखलखनारा तारा आज निखळला आहे. कर्मचाऱ्यांची बुलंद तोफ विसावली...... लोकप्रिय कामगार कर्मचारी नेते र.ग.कर्णिक निवर्तले.... रमाकांत गणेश अर्थात र. ग.कर्णिक यांचा जन्म २७ जानेवारी, इ.स. १९२९ मध्ये झाला.       पुढे १९४८ साली सचिवालयात नोकरी करू लागल्यानंतर त्यांना कर्मचाऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी समजू लागल्या. तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्यामुळे कर्मचाऱ्यांची झालेली ससेहोलपट त्यांनी अनुभवली होती. त्यामुळे त्यांनी काही सहकाऱ्यांना एकत्र करून १९५८ साली सेक्रेटरिएट ॲंड अलाईड ऑफिसेस स्टाफ असोशिएशन (मंत्रालय) या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांचीच निवड झ

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ! बोध नाहीच, चिन्ह कशाचे ? संमेलनापूर्वीच वादविवादांची नांदी !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
बोध नाहीच ; चिन्ह कशाचे ?    साहित्य संमेलन आणि वादविवाद हे अलीकडच्या काळात समीकरणच झाले आहे. नाशिकमध्ये मार्च महिन्यात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्याची अध्यक्ष निवडप्रक्रिया कोणत्याही वादाविना सुरळीत पार पडली. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि ख्यातकीर्त विज्ञानलेखक डॉ.जयंत नारळीकर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याचे बव्हंशी सर्व स्तरांतून स्वागतच झाले. मात्र वादाची पहिली ठिणगी पडली ती बोधचिन्ह निवडीने. बोधचिन्ह व घोषवाक्यातील अशुद्ध लेखनाने साहित्य महामंडळाच्या कारभारावर टीकेची सरबत्ती सुरु झाली. बोधचिन्हाची स्पर्धा घाईघाईने उरकण्यात आली. त्याला फारशी प्रसिद्धी देण्यात आली नाही त्यामुळे प्रतिसादही मिळाला नाही. मोजक्या ५३ प्रवेशिकांंमधून निवडलेल्या बोधचिन्हातून 'बोध' तर होतच नाही ; मग हे 'चिन्ह' कशाचे म्हणावे असा प्रश्न उपस्थित होतो!    तसे बघता चित्रे, छायाचित्रे बोलकी असतात. त्यात हजार शब्दांची ताकद सामावलेली असते. तोच वारसा सांगणारे बोधचिन्ह हे सुस्पष्ट, सुसंगत व नेमका बोध घडविणारे असले पाहिजे,नव्हे तीच बोधचिन्हाची प्राथमिक अट असते