संमेलनाला सर्वतोपरी मदत करू : आ. सीमा हिरे. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


संमेलनाला सर्वतोपरी मदत करू : आ. सीमा
हिरे

        नाशिक येते २६ ते २८ मार्च रोजी होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जी काही मदत लागेल ती व्यक्तीशः व भारतीय जनता पार्टीचे तिनही  आमदार, नासिक मनपा महापौर करण्यास कटिबद्ध आहोत. केवळ आर्थिक दृष्टया नाही, तर स्वतः हजर राहून हे संमेलन यशस्वी करू, असे प्रतिपादन नाशिक पश्र्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी केले.
           मराठी साहित्य संमेलनाच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणातील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. सोमवारी (ता. ८) रोजी बैठक झाली. यावेळी त्यांनी संमेलनासाठी देण्यात येणाऱ्या १० लाखाच्या निधीचे पत्र लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, अनिल भालेराव, महेश हिरे, विश्वास ठाकूर यांच्यासह लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
            गिरीश पालवे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी हे संमेलन यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध आहे. जी काही मदत लागेल ती भाजपाचे पदाधिकारी करतील व हे संमेलन यशस्वी कसे होईल याची दक्षता घेतील.
          यावेळी  संमेलनाचे कार्यवाह सुभाष  पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी, संजय करंजकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, दिलीप साळवेकर, चंद्रकांत दीक्षित, किरण समेळ, भगवान हिरे, अमोल जोशी, विनायक रानडे, रमेश देशमुख, श्याम पाडेकर, सी.एल.देशपांडे आदी उपस्थित होते. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!

न्यूज मसालाच्या अकराव्या "लोकराजा" दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन !