साहित्य संमेलनाला मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य : कुलगुरू ई वायूनंदन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


साहित्य संमेलनाला मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य : कुलगुरू ई वायूनंदन, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

          नाशिक : नाशिकमध्ये २६ मार्चपासून होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. इ. वायूनंदन यांनी साहित्य संमेलन आयोजन समितीच्या शिष्टमंडळाला दिली.
याबाबत माहिती देताना जातेगावकर म्हणाले, की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे भूषण आहे. सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेले आणि ज्ञानाची गंगा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन शिक्षणापासून वंचित असलेल्या लाखो लोकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणारे  ज्ञानशिक्षणाचे महाद्वार आहे. येत्या साहित्य संमेलनासाठी मुक्त विद्यापीठासारखी सशक्त आणि लोकाभिमुख संस्था आयोजकांना सहकार्य करण्यासाठी भक्कमपणे पाठीशी उभी रहावी, याकरिता संमेलन आयोजकांच्या शिष्टमंडळाने कुलगुरू वायूनंदन यांची भेट घेऊन संमेलनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन ही नाशिककरांच्या दृष्टीने आणि तमाम महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानास्पद घटना असून, या साहित्याच्या महोत्सवात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सक्रिय सहभाग नोंदवेल आणि आयोजनात सर्वतोपरी सहकार्य करणे ही केवळ संधी नसून आमची जबाबदारीही आहे, अशी ग्वाही कुलगुरू वायूनंदन यांनी शिष्टमंडळाला दिली. याप्रसंगी संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, विश्र्वास ठाकूर, संजय करंजकर, नाट्यदिग्दर्शक तथा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे समन्वयक सचिन शिंदे, विद्यापीठाच्या जनसंपर्क कक्षाचे सहयोगी सल्लागार तथा लेखक दत्ता पाटील उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

दातार म्हणजे समाजाला भरभरून देणारे ! कुलसंमेलनात उमटला सार्थ अभिमान !!