यशवंत पंचायत राज अभियान : जिल्ह्यातील पंचायत समित्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
न्यूज मसाला सर्विसेस, ७३८७३३३८०१ ********************************* यशवंत पंचायत राज अभियान : जिल्ह्यातील नाशिक व कळवण पंचायत समित्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल विभागात द्वितीय व तृतीय पुरस्कार नाशिक : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागस्तरीय अत्युत्कृष्ट पंचायत समित्यांच्या पुरस्कारांची घोषणा केली. याअंतर्गत नाशिक विभागात नाशिक पंचायत समितीने विभागात द्वितीय (जि. नाशिक) तर कळवण पंचायत समितीने अनुक्रमे तृतीय (जि. नाशिक) क्रमांकाचे पुरस्कार पटकावले, कळवण पंचायत समितीने सलग तिस-यांदा पुरस्कार मिळवला आहे, केंद्र व राज्य शासनाकडुन गट स्तरावर राबविल्या जाणा-या योजना त्याच बरोबर उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज याचे मुल्यमापन विभागस्तरावर करण्यात येऊन अखेर ३ पंचायत समित्यांची निवड ही विभाग निहाय करण्यात येते. नाशिक व कळवण या दोन्ही पंचायत समित्यांमध्ये सोलर पॅनलिंगचा वापर करुन उर्जेची बचत, स्वच्छ भारत मिशनची अमलबजावणी, वृक्षलागवडीची १०० टक्के उद्दीष्टपूर्ती, संपुर्ण लसीकरणाची उद्दीष्टपूर्ती यासह इतर सर्व योजना व कार्यालय