महीलादिनीच "अडलेल्या" महीलेची उपजिल्हा रुग्णालयाकडून हेळसांड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


न्यूज मसाला सर्विसेस 7387333801
**********************************

महीलादिनीच "अडलेल्या" महीलेची उपजिल्हा रुग्णालयाकडून हेळसांड !

नासिक( नरेंद्र पाटील )::-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महत्वाच्या उप जिल्हा रूग्णालयात महीलादिनीच गर्भवती महिलेला दिवसभर उपजिल्हा रुग्णालयात बसवून ठेवण्यात आले. यासह तिच्याकडे दुर्लक्ष करत प्रसूती न करता सात तासानंतर नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात  पाठवण्यात आले. महिलादिनीच गरिब आदिवासी महिलेची हेळसांड झाली असल्याने संबंधित आरोग्य यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी आम. हिरामण खोसकर यांच्याकडे केली आहे.
सोमवारी ( दि. ८ ) रोजी सकाळी ११ वाजता प्रसूतीसाठी आलेली आदिवासी महीला त्र्यंबकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल झाली. सहा-सात तासांच्या विलंबाने आमच्याकडे कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. तेथे उपस्थित असलेले एकमेव डाॅक्टरांनी कोणतेही उपचार न करता सदर महीलेला नाशिक येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्याच्या सुचना दिल्या. प्रत्यक्षात रूग्णवाहीका रात्री ८ वाजता आली. नाशिक येथे पाठविण्यात आल्यानंतर तिची नॉर्मल प्रसूती झाली. त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय शोभेची वस्तु आहे का ? असा सवाल सर्वसामान्य विचारत आहेत. नेमणुकीच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित रहात नसल्याचे या घटनेवरून दिसून येते, याबाबत आता प्रशासन योग्य तो निर्णय घेईल का? अशा तीव्र प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केलेल्या. सदर  रुग्णाची तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा   नमूना तसेच उपजिल्हा रूग्णालयात कर्मचाऱ्यांकडून कामकाज करतांना ग्रामस्थांशी अरेरावी करणे आदी नेहमीच्या  तक्रारी आहेत. कामकाजात सुधारणा होत नसल्याने आमदार हिरामण खोसकर यांनी यात लक्ष घालण्याची मागणी चंदर मेंगाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
__________________________________

शिष्टमंडळाने घेतली वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट !
महिलादिनीच आदिवासी गर्भवती महिलेची हेळसांड झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हरिभाऊ बोडके, रामभाऊ मुळाणे, युवक काँग्रेसचे रोहीत सकाळे, अजित सकाळे यांनी वैद्यकीय अधिकारी डाॅ. मंदा बर्वे यांची मंगळवारी सकाळी भेट घेतली.  झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत करत येथील आरोग्य व्यवस्थेच्या तक्रारीचा पाढा वाचला. येथे असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा तक्ता लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
_________________________________

वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदा बर्वे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
************************************

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अद्वितीय शास्त्रज्ञ तथा विसाव्या शतकातील महान शास्त्रज्ञ : सर आयझॅक न्यूटन. ४ जानेवारी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला थोडक्यात आढावा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

मूर्तिकार कारागीरांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न !