नाशिकच्या कलाकारांची हस्तकला जगाच्या कॅनव्हासवर पोहोचेल - पाटील. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!साप्ताहिक न्यूज मसाला सर्विसेस, 
संपर्क-7387333801

______________________________________


नाशिकच्या कलाकारांची हस्तकला जगाच्या कॅनव्हासवर पोहोचेल - पाटील


नाशिक ( प्रतिनिधी ) घर, संसार सांभाळून अनेक महिला कलानिर्मितीचा छंद जोपासतात. त्यांनी आपल्या कलेचे मूल्य जाणून घेतले पाहिजे. देसी हाट या संकल्पनेतून नाशिकच्या अनेक कलाकारांची अप्रतिम हस्तकला जगाच्या कॅनव्हासवर नक्कीच पोहोचेल.मात्र त्यासाठी मोठी स्वप्ने बघणे गरजेचे आहे असे प्रतिपादन गुंतवणूक सल्लागार मंदाकिनी पाटील यांनी केले.


    आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने काल ( दि.८) देसी हाट या वर्षभर सुरू रहाणाऱ्या कलाउत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. मोजक्या कलाकार व रसिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम कॅनडा कॉर्नरजवळच्या हेरंब रेसीडेन्सीत आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुण्या मंदाकिनी पाटील यांनी दीपप्रज्वलन केले. बिना रावत यांच्या हस्ते केक कापून महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ओमप्रकाश रावत यांनी स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. ते म्हणाले, अनेक महिला,पुरुष अंगभूत कलेचा वापर करून सुंदर कलानिर्मिती करतात. त्यांच्या कलाकृतींना ग्राहक मिळावे ही देसी हाटची संकल्पना आहे. कलाकार व रसिक ही दोन टोके जोडणारे हे माध्यम असेल. मंदाकिनी पाटील म्हणाल्या, नाशिकमध्ये अनेक उत्तम हस्तकलाकार आहेत. त्यात महिला आघाडीवर असून त्यांच्या कलेला निश्चित बाजारपेठ मिळेल. इतर राज्यांमधील कलांचे आदानप्रदान येथे घडेल. हस्तकलेचा हा उत्सव वर्षभर बहरत राहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. ज्येष्ठ 


कलासमीक्षक संजय देवधर म्हणाले, कलाकार त्यांच्या कलानिर्मितीमध्ये रममाण झालेले असतात. व्यवहारी जगात ते काहीसे मागे पडतात. अश्यांंसाठी हे व्यासपीठ मोलाचे आहे. ते कलाकार व रसिकांना समाधान मिळवून देईल. ऑनलाईन मार्केटिंगमुळे आता जगापर्यंत आपली कला पोहोचविण्याचा मार्ग सोपा झाला आहे असे त्यांनी सांगितले.


    स्नेहा वाणी, सुनीता घोटकर,अंजली कुलकर्णी, सुरेश पाटील, गार्गी भंडारे,शुभांगी बैरागी, विनिती वाकलकर, वैशाली रावत,


 हिमांशी निखारे, वृषाली महागावकर यांच्या हस्तकलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या. त्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमात रंगवलेली चित्रे, कागदाच्या लगद्यापासून करण्यात आलेल्या आकर्षक कलावस्तू,मधुबनी व वारली शैलीतील चित्रे, खणांचा कलात्मक वापर करून तयार केलेल्या कलाकृती, क्रोशावर्क, तोरणे, बॅग्स, पर्सेस, सुंदर गोधड्या, चिमुकल्या गुढ्या अशा विविधतेचा समावेश आहे. स्नेहा वाणी यांनी मंदाकिनी पाटील यांचा परिचय करून दिला. देसी हाटतर्फे विविध कलांच्या प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येतील असे सांगून वैशाली रावत यांनी आभार मानले. कोविडच्या नियमावलीचे पालन करून हा समारंभ उत्साहात झाला.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

आनंद मेळाव्याच्या माध्यमातून टिळकांचा एकत्रित येण्याचा उद्देश सफल- वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भालेराव

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ! आषाढी स्पेशल- कवयित्री प्रतिभा खैरनार यांची "भक्तीची वारी !