खरंच महिला "अबला" आहेत का  ?  ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करताना हेच अपेक्षित आहे- दिलीप देशपांडे यांनी शब्दबद्ध केलेला विशेष लेख !! सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!!




|| 
खरंच महिला "अबला" आहेत का  ?  ||


स्त्रियांना अबला संबोधून दुय्यम स्थान दिले जाते.


खरच ती अबला आहे का? परवा परवाच महाराष्ट्रात ग्राम पंचायत निवडणुका झाल्यात.खूप महिला निवडून आल्यात.खरतर त्यात अनेक सक्षम महिला आहेत.पण सत्तेचे केन्द्र आपल्या  कडेच रहावे ह्या 

प्रयत्नात स्त्रियांना बाजूला सारून देता पुरुष मंडळी .
आणि स्त्रियांना सबला,सक्षम, करण्याच्या गोष्टी करतात.
                  खडकी.ता.दौंड.जि.पुणे.इथे सरपंच म्हणून निवडून आलेली एकवीस वर्षाची तरुणी स्नेहल काळभोर ,हिची प्रतिक्रिया बोलकी आहे.आपल्याकडे सक्षमता आहे.मला महिला आणि सगळ्यां साठी काम करायच आहे.विविध आरोग्य- शिक्षण,योजना आणायच्या आहे.बचत गटाचे काम करायचे आहे.आदर्श गाव निर्माण करायचा आहे.निवडून आलेल्या महिला सदस्यांना मी सांगितले आहे.काम आपल्याला करायचे आहे.कामकाजात,निर्णयात,नातेवाईकांना येण्यास परवानगी  नाही. मार्गदर्शन घेऊ.


महिलादिवस साजरा करतांना हेच अपेक्षित आहे.


             ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो..वर्षभरात ज्या कोणी महिलांनी, शिक्षण,कला,क्रिडा,साहित्य, क्षेत्रात विशेष कार्य केल असतं,तसेच काही महिलांनी एखादे विशेष प्रावीण्य दाखविले असते,अशा महिलांचा सत्कार,केला जातो.सन्मान केला जातो.अनेक संस्था, कार्यालयात, महिला दिन साजरा केला जातो.अशा रितीने महिलांचा सन्मान करणे उचितच आहे.तो करायलाच ह वा.पण हा महिला दिन का साजरा केला जातो ?ह्याची सुरूवात कधी झाली ?,ह्या बाबतीत मात्र बहुसंख्य महिला अनभिज्ञ आहेत.आठ मार्च महिला दिन आहे, तो साजरा करणे फक्त एवढेच केले जाते.

             महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी जो लढा दिला त्याच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. काय होता हा लढा?   तर संपूर्ण अमेरिका, आणि युरोप सहित जवळपास जगभरातल्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत मतदानाचा हक्क नाकारला होता.त्याविरोधात महिलांनी लढा उभारला होता,त्याच वेळी जर्मनीतल्या कम्युनिस्ट कार्यकर्ती क्लारा झेटकिन प्रभावित झाली.असा एखादा दिवस असावा, ज्या दिवशी जगभरातल्या महिला आपल्या मागण्यासाठी लढ्याचा निर्धार व्यक्त करू शकतील.अशी कल्पना मांडली.१९१० मध्ये कोपनहेगनला झालेल्या परिषदेत ८मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून ठराव पास झाला.
       पण भारतात मुंबई येथे ८मार्च १९४३ रोजी पहिला महिला दिन साजरा झाला.
              महिला दिन असा निरनिराळ्या ठिकाणी साजरा होत असतानाच मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात.ते अगदी सहज आहे.
               अनेक महिलांनी निरनिराळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सत्तेची पद भुषविली आहेत.त्यांना संधी दिली तर त्या काय करु शकतात हे दाखवून दिले आहे.आपले वेगळेपण सिध्द केले आहे.
     स्व.ईंदिरा गांधी, स्व.सुषमा स्वराज्, श्रीमती प्रतिभाताई पाटील, सुमित्राताई महाजन, अशा अजूनही अनेक महिलांनी आपले वेगळेपण सिध्द केल आहे. उच्च पदावर त्या पोहचल्यात.
तर मेधा पाटकर यांनी समाजिक कार्यात स्वःतला झोकून दिले आहे. किरण बेदींची प्रशासकीय कारकीर्द, पोलिस प्रशासनात, तिहार जेलमध्ये  केलेल्या बदलाने उल्लेखनीय ठरली होती. मीरा बोरवणकर, सुधा मूर्ती आहेत.
        आजही राजकीय क्षेत्र बघितले तर,डाँ निलम गोऱ्हे, सुप्रिया सुळे, पंकजा मुंढे, प्रणिती शिंदे, पुनम महाजन, भावना गवळी, रक्षा खडसे, सारख्या अजूनही महिलांनी राजकीय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलय. अनेक लेखिका आहेत, शिक्षण क्षेत्रातील महिला आहेत  त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलय. अनेक महिला प्रशासकीय सेवेत उच्च पदावर कार्य करीत आहेत. मुख्य सचिव, आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, तहसीलदार, गट विकास अधिकारी, नगर पालिका- जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, बँक अधिकारी अनेक क्षेत्र आहेत. कुठलं क्षेत्र बाकी नाही.
       काही वर्षा पुर्वीचा इतिहास बघितला तर जिजाबाई, , राणी लक्ष्मीबाई, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, अनेक उदाहरणे देता येतील. महिलांनी एक वेगळा क्रांतीकारी ईतिहास घडवलाय. आनंदीबाई, सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा, स्त्रीमुक्तिचा पाया रचला. पुण्यात महिलांसाठी पहिली शाळा काढली. एकूण अठरा शाळा काढल्यात.
"आई सारखे दैवत साऱ्या जगा मध्ये नाही" 


किंवा••••••••


"जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगासी उध्दारी"असे


आपण नेहमीच म्हणतो.पण-


आता दुसऱ्या बाजूचा विचार बघीतला तर सध्या

त्या जगाचा उध्दार करणाऱ्या, दैवत असणाऱ्या, ज्या स्त्री शक्तिची नवरात्रात पूजा केली जाते,त्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे. तीनशे पासष्ट दिवसांत एक दिवस महिला दिवस साजरा करुन त्यांचा मानसन्मान केला जातो. बाकीच्या तीनशे चौसष्ट दिवसांचे काय? हा महत्वाचा प्रश्न आहे. स्त्रिया किती सुरक्षित आहेत. रोजच वर्तमानपत्र उघडतो तर त्यात महिलांची शोषण,विनयभंग, बलात्कार, खून अश्या बातम्या असतातच.अगदी पाच-सात वर्षाचे मुलींन पासून तर साठ-पासष्ट वर्षांचे महिलांचा त्यात समावेश असतो ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.


समाजात, शाळेत,नोकरीच्या ठिकाणी, नातेवाईकात, प्रवासात, एकटी स्त्री किती सुरक्षित आहे? 


       आंध्रप्रदेश मधील बलात्कार घटना व त्यानंतर हत्या, विदर्भातील हिंगणघाटची घटना, औरंगाबाद, सिल्लोडची घटना, आणी अशा अनेक ठीकाणी दररोज घडणा-या स्त्रीअत्याचाराच्या घटना हे काय दर्शवितात? अनेक कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग सारख्या घटना घडतात त्यांच शोषण होत, त्या घटना कधीकधी दाबून टाकल्या जातात. अनेक वेळा बायकांसारख्या बांगड्या भरल्या का?  म्हणून हिणवले जाते. हासुध्दा स्त्रियांचा अपमानच आहे. बांगड्या भरा..बांगड्या भरा..असा शब्द प्रयोग मागे एका दूरचित्रवाणी वरील चर्चेत माजी मंत्र्यांनी केला होता, त्यावेळी स्व.विद्या बाळ यांनी त्यांना खूपच कडक शब्दात फटकारले होते. पण असा सडेतोडपणा सगळ्याच महिलांजवळ नसतो, ज्याची आज गरज आहे. एका माजी मंत्री ह्यांनीही मध्यंतरी भरसभेत "आपल्या तहसीलदार मँडम आहेतच "हिरोईन"असा सभेत उल्लेख केला, तो स्त्रीचा अपमान तर होताच पण शाब्दिक शोषणाचा प्रकार असे त्याला म्हणता येईल. त्यांनी ज्या भावनेने तो शब्दप्रयोग केला तो चुकीचा होता अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

    आता सध्याही काही दिवसांनी पासून, मंत्री-राजकारणी यांचे प्रकरणात महाराष्ट्रात वातावरण तप्त आहे. कुणी राजीनामा दिला, तर कुणाच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. जळगांवा आशा सरकारी वसतिगृहात मुलींना कपडे काढून नाचायला लावल्याची संतापजनक घटना काही माध्यमांमधून समोर आली आहे.
तर महाराष्ट्रात स्त्री ची अशीही "पूजा "होत आहे असा विरोधकांचा हेटाळणीचा सूर आहे.


स्त्रियांना अनेक भुमिकेतून जावे लागते,...माता..भगिनी..पत्नी ..मुलगी, त्या त्या वेळची जीवनातील भुमिका खऱ्या असतात. त्यात निष्ठा असते. तीच तर बांगड्या घालत असते..माता-भगिनी-पत्नी. तिचा असे शब्दप्रयोगानी हेटाळणी करु नका. खऱ्या अर्थाने ती हिरोईन असते. देवी रूपात तिची पूजा करत असतात. राज्यात महिला आयोग आहे. त्यांनी अशा घटनांची ताबडतोब नोंद घेऊन संबधितांवर कारवाई करणे अपेक्षित असते. पण राजकीय दबावामुळे काही होत नाही. महिला आयोगाने आपली भुमिका स्पष्ट करायला हवी.

       बलात्कार, स्त्रीअत्याचाराचे घटनांमध्ये कारवाईस विलंब होतो. काही वर्षे निघून जातात. त्या घटनेचं गांभीर्य रहात नाही. निर्भया प्रकरणात काय झाले ? बघतोय आपण. आंध्रप्रदेश सरकारने कँबिनेट मध्ये "दिशा" कायदा मंजुरी दिली, सात दिवसांत तपास, चौदा दिवसांत न्यायालयीन कामकाज, आणि एकवीस दिवसाचे आत आरोपीस मृत्यूदंड. ह्याच धर्तीवर संपूर्ण देशात असा कायदा लागू झाला तर अशा घटनां वर जरब बसेल असे वाटते.
      दुसरा मोठा प्रश्न आहे स्त्रियांचे बाबतीत तो दुय्यम स्थानाचा.आणि राजकीय क्षेत्रात स्त्रियांचा करुन घेतला जाणारा वापर.तसेच जाहिरात क्षेत्रात स्त्री देहाचा केला जाणारा वापर.


आता तो कसा?


आपला उत्पादनाचा खप वाढवण्यासाठी स्त्री देहाचा नको तितका वापर, स्त्री देहाचं प्रदर्शन केल जातं, अर्थातच यात स्त्रियांचा दोष आहेच. त्याच स्वतःच अधःपतन करुन घेत आहेत. त्यात अमुलाग्र बदल आवश्यक आहे. स्त्री संघटनांनी, आयोगाने ह्याचेवर गंभीरपणे विचार करावा.

          राजकीय क्षेत्रात, जसे विधान सभा, विधान परिषदेत स्त्रियांना नगण्य स्थान आहे. त्यातही मंत्रिपदासाठी वर्णी लागली तरी, कँबिनेट दर्जा फारच कमी महिलांना मिळतो. अशी परिस्थिती आहे. जिल्हा आणि तालुका पातळीवर ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद, ह्या ठिकाणी स्त्री राखीव जागा असतात. त्यात काय परिस्थिती आहे हे आपण सगळेच जाणतो. सत्ताकेंन्द्र घरातच रहावे म्हणून तिकिटांचे वाटपासाठी व्यवस्था असते. त्यातील बहुतांश महिलांना ना समाजकार्याची आवड असते ना राजकारणाची. केवळ सत्ते साठी महिलांचा वापर करुन घेतला जातो, काही महिलांना प्रासंगिक चार शब्द बोलता येत नाही. आपले हक्क, जबाबदा-या, कर्तव्ये काय माहित नसते. काही महिलांना तर सही सुध्दा करता येत नाही. त्यांचे पतीच कामकाज बघतात ही परिस्थिती नाकारता येणार नाही.
           खरंच ज्या महिलांना समाजकार्य, राजकारणाची आवड असते त्यांना मात्र संधी मिळत नाही खऱ्या अर्थाने स्त्रीयांचा सर्वच क्षेत्रात सहभाग कमीच आहे .जोपर्यत महिला सक्षम पणे उभ्या रहात नाही त्याच्यात निर्णयक्षमता येत नाही तो पर्यंत स्त्रीमुक्त आहे हे खऱ्या अर्थाने म्हणता येणार नाही.


स्त्री विषयक अनेक कायदे आहेत, महिलांना मिळणाऱ्या सवलतीआहेत, त्यांची अधिकाधिक माहिती महिलांपर्यंत पोहचावी, बलात्कार कायदा कडक करुन आंध्रप्रदेश धर्तीवर संपूर्ण देशात लागू होऊन अंमलबजावणी व्हावी, आणि महत्वाचे.

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. महाराजांचा स्त्री विषयी दृष्टिकोन काय होता, हे माहित करून घेणे तितकेच आवश्यक आहे.


आपल्या राज्यात स्त्री वर अत्याचार होणार नाही याकरिता कडक नियम होते. परस्त्री माते समान,  स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य होते. आदर होता. केवळ महाराजांचे नाव घेउन जयजयकार करण्यात काहीहि अर्थ नाही. महाराजांचे विचार अमलात आणणेची गरज आहे. मग व्यक्तिगत असो, का पक्ष म्हणून असो मग पक्ष कोणताही असो.

    मुळातच स्त्रियांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे . छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्त्री विषयी  आदर सांगितला आहे, तो आचरणात आणणेची आवश्यकता आहे.
ज्या महिलांमध्ये काही कतृत्व आहे त्यांना संधी प्राप्त करुन द्यावी.तरच महिला दिवस साजरा करण्याचा हेतू साध्य होईल.   


                         - दिलीप देशपांडे
                               जामनेर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

सेवानिवृत्त होत असणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचे त्यांच्या आयुष्य भरातील चढ उतार तसेच जडणघडणा विषयीचा लेखाजोखा स्वरूपात मनोगत.... पत्थर खाकर भी खडे रहे! वो लहू बनकर अडे रहे ! जब दुनिया जश्न मनाती है ! तब पुलिस फर्जं निभाती है ! सविस्तर मनोगत वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।