पोस्ट्स

वारली कलाशैलीचा मोहक ' चित्रसंवाद ' पितामह पद्मश्रींचा आशीर्वाद ' वारली चित्रशैलीचा आस्वाद सर्वांनी घ्यावा ' !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
न्यूज मसाला सर्विसे स, नासिक,  7387333801 ******************************** वारली कलाशैलीचा मोहक ' चित्रसंवाद '     चित्रकार आणि पत्रकार या नात्याने विविध ललित कलांचा परामर्श मला घेता आला. वास्तववादी चित्रणशैलीपासून आजच्या डिजिटल पेंटिंगपर्यंतची अनेक स्थित्यंतरे मी अनुभवली. मात्र चाळीस वर्षांच्या या प्रदीर्घ वाटचालीत, आदिवासी वारली चित्रशैलीने मोहून घेतले. याच कलेवर लक्ष केंद्रित करून संशोधनात्मक अभ्यास केला. वारली कलेचा व्यापक आवाका, त्यातली क्षमता सामोरी आली. प्रयत्नपूर्वक मिळवलेले हे समृद्ध संचित रसिकांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने २००८ मध्ये 'वारली चित्रसृष्टी' हे पुस्तक माझ्याच 'कल्पक प्रकाशना'तर्फे प्रकाशित केले. नंतर 'वारली आर्ट वर्ल्ड' हे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रसिद्ध झाले. शब्द आणि चित्रांचा सुरेख समन्वय त्यातून साधता आला. आज जागतिक मैत्री दिन आहे. पुस्तकांशी केलेली मैत्री कायमच समृद्ध करते.     आतापर्यंत माझ्या 'वारली चित्रसृष्टी' या पुस्तकाच्या चार तर 'वारली आर्टवर्ल्ड'च्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. प्रत

जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश जिल्हाधिकारी यांचेकडे सुपूर्द ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी ! जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द !! नासिक(२९)::-सर्वांना गेली दिड ते दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असताना मागील आठवड्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातले होते. या पुरग्रस्त भागातील जनतेचे जीवनमान उध्वस्त झाले आहे. अशा भयावह परिस्थितीचा विचार करून संघटनेचे माजी अध्यक्ष स्व.माधवराव भणगे साहेब यांच्या प्रेरणेने नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन, नाशिक या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रु.२५०००/- (अक्षरी रु. पंचवीस हजार) रक्कमेचा धनादेश नासिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.   याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव(बाबा) गांगुर्डे, उपाध्यक्ष रविंद्र बापू थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, संघटक प्रमुख ज्ञानेश्वर कासार सुभाष कंकरेज, राजेंद्र अहिरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

' ट्रेंडिंग ' वारलीला ' ब्रँडिंग ' ची गरज ! सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
NEWS MASALA SERVICES, NASHIK, 7387333801 ********************************** ' ट्रेंडिंग ' वारलीला ' ब्रँडिंग ' ची गरज !              शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या आदिवासी वारली चित्रकलेला अलीकडे भरपूर मागणी वाढली आहे. पूर्वी आदिवासी पाड्यांवरील झोपड्यांच्या भिंतीपुरत्या मर्यादित  स्वरूपातील या कलेने, आता मोठेच फॅशनेबल रूप धारण केले आहे. वारली चित्रे विविध वस्त्रप्रावरणांवर अधिराज्य गाजवताना दिसतात. सध्या वारली प्रिंट असलेले ड्रेस मटेरियल, साड्या, कुर्ती, लेगिंग्ज तसेच लहान मुलांचे, तरुणांचे टी शर्टस् मार्केटमध्ये हिट आहेत. याशिवाय बेडशीट्स, स्कार्फ, पडदे आणि हँडबॅग्स, पर्सेस, फोल्डर्स, पाऊच देखील वारली चित्रांनी सजतात. मागणी तसा पुरवठा या न्यायाने बाजारपेठेत वारली डिझाईन्सचा मोठा ट्रेंड  निर्माण झाला आहे. मात्र बऱ्याचदा अशी वारली डिझाईन्स जाणकार आणि मूळ शैलीशी बांधिलकी असणाऱ्या कलाकारांकडून करून न घेतल्याने, वारलीच्या नावाखाली काहीही खपवले जाते. कलेला येणारे हे विकृत स्वरूप मारक ठरते. रेखाटनाचे असले भलतेच 'फ्युजन'  केवळ  'कन्फ्युजन' निर्

निरामय वैश्विक स्वास्थ्यासाठी आयुर्वेद उपयुक्त - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत न्यूज मसाला सर्विसेस, नासिक, 7387333801.

इमेज
निरामय वैश्विक स्वास्थ्यासाठी आयुर्वेद उपयुक्त - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत     निरामय स्वास्थ ही संकल्पना आयुर्वेदाने फार पूर्वीपासून मांडली. आता आयुर्वेद उपचार पद्धत वैश्विक ठरू लागली आहे. केवळ 'इलनेस' दूर करणे नव्हे; तर 'वेलनेस' टिकवून ठेवणे हा आयुर्वेदाचा मूळ पाया आहे. सारे जग त्याच्याकडे आशेने बघते आहे. आयुर्वेदाने इतर पॅथींना एकत्र जोडून समन्वयाची भूमिका पेलावी. 'आयुर्वेद व्यासपीठ ' च्या माध्यमातून अग्रेसर राहून निरामय विश्वासाठी आयुर्वेद चिकित्सा रुग्णांपर्यंत पोहोचली पाहिजे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी या आशयाचे प्रतिपादन केले.     नाशिकमध्ये  बुधवारी ( दि.१४ जुलै )आयुर्वेद व्यासपीठच्या  'चरक सदन' या वास्तूचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. ऑनलाईन पद्धतीने कळ दाबून उद्घाटन करण्यात आले. मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत गंगापूर रोडवरील डॉ. कुर्तकोटी शंकराचार्य संकुलातील सभागृहात कार्यक्रम झाला. यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय चिकित्सा पध्दती आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी होते. त्यांच्या सम

औषध निर्माण अधिकारी संघटनेमार्फत शासकीय कन्या विद्यालय येथे मोफत वह्या वाटप ! एक वही मोलाची, सावित्रिच्या लेकीची !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
औषध निर्माण अधिकारी संघटनेमार्फत शासकीय कन्या विद्यालय येथे मोफत वह्या वाटप !      नासिक( प्रतिनिधी)::-सामाजिक बांधिलकी उपक्रमातून महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी  संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा, नाशिक व विविध सेवाभावी संस्था यांचे वतीने नाशिक शहरातील जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या शासकीय कन्या विद्यालय नाशिक या शतक महोत्सव पूर्ण केलेल्या ऐतिहासिक शाळेतील इयत्ता १ली ते १० वीच्या सर्वसाधारणपणे  ६०० मुलींसाठी  " एक वही मोलाची सावित्रीच्या लेकीची" हे ब्रिद घेऊन विविध प्रकारच्या ६४०६ वह्या मोफत वाटप करण्यात आल्या.      कोरोना काळात नाशिक शहरातील गरीब कुटुंबातील मुली या शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांना मोफत शिक्षण उपलब्ध होत असतांना अत्यावश्यक वह्या उपलब्ध होण्यासाठी औषध निर्माण अधिकारी संघटना व विविध सेवाभावी संस्था मागील गत आठ वर्षांपासून सातत्याने मोफत शालोपयोगी वह्या शासकीय कन्या शाळेतीलमुलींसाठी मोफत उपलब्ध करुन देत आहे. शासकीय कन्या विद्यालय नाशिक येथील मुलींना मोफत शालेय अभ्यासक्रमास आवश्यक वह्या उपलब्ध करुन देणेकामी प्रसिद्ध उद्योजक प्रदीप राठी, सामाजिक क

" अल्फ़ाज़ो की उड़ान " प्रातिनिधिक कथासंग्रहाचे लवकरच प्रकाशन! नागेश शेवाळकर यांच्या दोन कथांचा समावेश! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
" अल्फ़ाज़ो की उड़ान " प्रातिनिधिक कथासंग्रहाचे लवकरच प्रकाशन! नागेश शेवाळकर यांच्या दोन कथांचा समावेश!!        पुणे (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील ख्यातकीर्त लेखक नागेश सू. शेवाळकर यांच्या दोन हिंदी कथांचा समावेश असणारा 'अल्फ़ाज़ो की उड़ान' हा कथासंग्रह २६ जुलै २०२१ रोजी उज्जैन (मध्यप्रदेश) येथे प्रकाशित होत आहे. जतिन गहलोत प्रकाशक यांनी श्रीहिन्द पब्लिकेशनव्दारे हा प्रातिनिधिक हिंदी कथासंग्रह प्रकाशनार्थ सज्ज केला आहे.          महाराष्ट्रातील नामवंत लेखक नागेश सू. शेवाळकर यांनी लिहिलेल्या 'चाय पुराण' आणि 'डर कोरोना का' या दोन हिंदी विनोदी कथांचा ह्या कथासंग्रहात समावेश करण्यात आला आहे. मराठी भाषेत लेखन करणाऱ्या शेवाळकरांनी हिंदी भाषेत लेखनाचा असा शुभारंभ केला असून या यशाबद्दल नागेश शेवाळकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हा कथासंग्रह, अमेझॉन, किंडले अशा संस्थांवर विक्रीसाठी उपलब्ध असेल असे जतिन गहलोत यांनी कळवले आहे.

जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावुन निदर्शने ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
   जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावुन निदर्शने !        नाशिक- केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचारी धोरणाविरोधात जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्याकरीता पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना  अप्पर  जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे आणि अति.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे , उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांचे मार्फत जिल्हा परीषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर, कार्याध्यक्ष डॉ.भगवान पाटील, सरचिटणीस महेंद्र पवार, प्रमोद निरगुडे , सचिन विंचुरकर यांनी निवेदन दिले. राज्य सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक – शिक्षकेत्तर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि कंत्राटी व अंशकालिन कर्मचारी यांचे मागण्यांबाबत गेल्या दोन वर्षापासुन वारंवार निवेदने, निदर्शने, आंदोलने करूनही केंद्र व राज्य  शासनाने दखल न घेतल्याने कर्मचा-यांच्या मनात तिव्र आक्रोश आहे. कोरोना महामारीच्या राष्टीय आपत्ती निवारण कार्यात जिल्हा परिषदेचे सर्व विभागातील कर्मचारी यांनी जिव धोक्यात घालुन फ्रन्ट लाईन वर्कर म्हणुन सामाजिक बांधिलकीने कर्तव्य बजावतांना कर्मचा-यांचे मोठया प्रमाणावर