जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश जिल्हाधिकारी यांचेकडे सुपूर्द ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक
असोसिएशन कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी !
जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे धनादेश सुपूर्द !!

नासिक(२९)::-सर्वांना गेली दिड ते दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असताना मागील आठवड्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातले होते. या पुरग्रस्त भागातील जनतेचे जीवनमान उध्वस्त झाले आहे. अशा भयावह परिस्थितीचा विचार करून संघटनेचे माजी अध्यक्ष स्व.माधवराव भणगे साहेब यांच्या प्रेरणेने नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशन, नाशिक या सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटनेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रु.२५०००/- (अक्षरी रु. पंचवीस हजार) रक्कमेचा धनादेश नासिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
  याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष उत्तमराव(बाबा) गांगुर्डे, उपाध्यक्ष रविंद्र बापू थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, संघटक प्रमुख ज्ञानेश्वर कासार सुभाष कंकरेज, राजेंद्र अहिरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी डांगी भाषेत केलेले आवाहन !!

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी अहीराणी भाषेतून केले आवाहन ! व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

जिल्हा परिषदेत ५८ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नत्या ! कुटुंबप्रमुखच्या भूमिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी !!