डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू अंध कुटुंबांना मदतीचा हात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू अंध कुटुंबांना मदतीचा हात ! नासिक(१२)::- ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अॅण्ड डिसेबल्ड या संस्थेच्या वतीने संस्थेचे आधारस्तंभ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांचा ५५ वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून नाशिक परिसरातील गरजू अंध कुटुंबांना अन्नधान्याचे संस्थेच्यावतीने वाटप करण्यात आले तसेच नाना काळे यांच्या मित्र परिवारातर्फे छत्रीचे वाटप करण्यात आले. ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अॅण्ड डिसेबल्ड ही संस्था गेल्या अकरा वर्षांपासून संस्थेचे मानद अध्यक्ष डॉक्टर धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली नासिक व नासिकबाहेरील ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवून दिव्यांग व्यक्तींची सेवा करीत आहे. या संस्थेच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या मोफत निवासी संगणक केंद्रातून गेल्या वर्ष पर्यंत ५७ अंध मुलींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी १७ ते १८ मुलींना सरकारी व खासगी कार्यालयात रोजगार मिळाला आहे. तसेच गेल्यावर्षापासून कोरोना महामारी चे संकट असल्याने अनेक स्वयंरोजगार