प्राचार्य डॉ. गोटन जैन यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


प्राचार्य डॉ. गोटन जैन यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

 
    चांदवड::-(वार्ताहर): श्री.नेमिनाथ जैन संस्थेच्या आबड-लोढा-जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोटन जैन यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्राचार्य जैन हे नॅनो सायन्स विषयात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि तज्ज्ञ म्हणून सुपरिचित आहेत.महाराष्ट्र शासनाने त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून यापूर्वी गौरव केलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आदर्श शिक्षक आणि आदर्श प्राचार्य म्हणून त्यांचा सन्मान केला आहे. नायजेरिया विद्यापीठांशी महाविद्यालयाचा त्यांनी करार करून चांदवड महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांचे १२ विद्यार्थी हे पीएचडी धारक असून ३ विद्यार्थी पीएचडी प्राप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे चांदवड महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विषयासाठी पीएचडी संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. त्यांच्या या निवडीचे अधिकृत पत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्राचार्य डॉ. गोटन जैन यांना काल शुक्रवारी २९ जुलै रोजी सुपुर्द केले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष श्री बेबीलालजी संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, मानद सचिव जवाहरलालजी आबड, तसेच प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष  अरविंद भन्साळी, विश्वस्त समितीचे सदस्य आणि स्थानिक विकास समितीचे समन्वयक  कांतीलाल बाफना, आणि सीए महावीर पारख यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!