डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू अंध कुटुंबांना मदतीचा हात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू अंध कुटुंबांना मदतीचा हात !

  
नासिक(१२)::- ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अॅण्ड डिसेबल्ड या संस्थेच्या वतीने संस्थेचे आधारस्तंभ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांचा ५५ वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून नाशिक परिसरातील गरजू अंध कुटुंबांना
अन्नधान्याचे संस्थेच्यावतीने वाटप करण्यात आले तसेच नाना काळे यांच्या मित्र परिवारातर्फे छत्रीचे वाटप करण्यात आले.
         ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अॅण्ड डिसेबल्ड ही संस्था गेल्या
अकरा वर्षांपासून संस्थेचे मानद अध्यक्ष डॉक्टर धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली नासिक व नासिकबाहेरील ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवून दिव्यांग व्यक्तींची सेवा करीत आहे. या संस्थेच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या मोफत निवासी संगणक केंद्रातून गेल्या वर्ष पर्यंत ५७ अंध मुलींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी १७ ते १८ मुलींना सरकारी व खासगी कार्यालयात रोजगार मिळाला आहे.
तसेच गेल्यावर्षापासून कोरोना महामारी चे संकट असल्याने अनेक स्वयंरोजगार करणारे अंध व्यक्ती घरी बसले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. म्हणून संस्थेचे मानद अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारीसरांच्या पुढाकाराने व सम्राट ग्रुपच्या सौजन्याने मागील पंधरा महिन्यांपासून अन्नधान्याचे वाटप केले जात आहे.
आजच्या वाढदिवसा निमित्त या अन्नधान्य वितरण व छत्री वाटप कार्यक्रमात शिवसेनेचे विभाग प्रमुख नाना काळे, नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र निकम, नगरसेवक सुनील गोडसे ,शहजाद पटेल, विलास अडके, संजय करंजकर, सचिन बांडे, कुंदन दळे, संजय चिंचोरे, गणेश परदेशी, गणेश कुसमोडे, गणेश अल्लट, अभय दिघे, संतोष देशपांडे, सौ. स्वाती कुलकर्णी,  दत्ता कोठावदे, गोटु कुमावत,
ओम साई वेल्फेअर असोसिएशन फोर द ब्लाइंड अॅण्ड डिसेबल्ड या संस्थेचे अध्यक्ष विकास
शेजवळ, महासचिव रामदास जगताप, उपाध्यक्ष डी.एन.महाले, कार्यकारी सदस्य कृष्ण कुमार चावरे, संजय चावरे, विद्या जगताप, निमिता शेजवळ, आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !