हयासा ई - स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग ! नासिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ई - स्कुटरची निर्मिती !! अवघ्या १५ ते २० रुपयांत ९० किलोमीटर !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!
हयासा ई - स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग !


 नाशिक ( प्रतिनिधी ) :- हयासा ई - मोबिलिटी प्रा. लि. कंपनीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संपूर्ण भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिक स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग करण्यात आले. हयासा कंपनी नाशिकमध्ये ओजस, दक्ष, इरा आणि निर्भर या चार आकर्षक मॉडेल्सची निर्मिती करीत आहे. हयासा म्हणजे वेग ! आता वेगाचा अनुभव वाहनधारकांना या चार मॉडेल्सद्वारा घेता येईल. दिंडोरी येथे या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाहनांची निर्मिती करण्यात येत आहे. लवकरच या ई - वाहनांच्या विक्रीसाठी संपूर्ण देशभरात वितरण व्यवस्था उभी राहील.अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
         हयासा ई - मोबिलिटी कंपनीची स्थापना फेब्रुवारी २०२१ मध्ये करण्यात आली. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाची आधुनिक वाहने ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. याचा निश्चितच आनंद वाटतो. ओजस व दक्ष या स्कुटर्स तरुणाईला भुरळ घालतील. ' इरा ' हे मॉडेल विशेषतः महिलांना आकर्षित करेल. निर्भर हे मॉडेल व्यावसायिकांना उपयुक्त ठरेल. कंपनीचे उत्पादन दिंडोरी या आदिवासी व अतिदुर्गम क्षेत्रात चार एकर जागेत सुरु आहे. आकर्षक, दणकट आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा वाहनांची निर्मिती करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. एका महिन्यात ६ हजार वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. मार्च २०२२ पर्यंत हा वेग १ लाखांवर पोहोचेल. अर्थातच ही आपल्या नाशिकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे असे श्री विजय हाके व सौ. सुनीता सांगळे या कंपनी संचालकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
          हयासा ई - मोबिलिटी निर्मित वाहनांबद्दल संचालक संदीप आयाचित व प्रशांत जोशी यांनी सविस्तर माहिती दिली. या स्कुटर्ससाठी वापरण्यात येणारी बॅटरी पूर्णपणे भारतीय बनावटीची व लिथियम आयन तंत्रावर आधारित आहे. यामध्ये भारतीय तापमानातील बदलांचा विचार करून स्मार्ट बीएमएस प्रणाली वापरण्यात आली आहे. त्यामुळे वाहन धारकाला  बॅटरीच्या स्थिती विषयी निर्धास्त रहाता येईल. बॅटरीच्या सुरक्षितेसाठी सेफ्टी फ्युज व कटऑफ तंत्राचा वापर केलेला आहे. या बॅटरीचे आयुष्य ७ वर्षांचे असेल. स्कुटरची मोटर बीएलडीसी तंत्राची व पर्मनंट मॅग्नेट हाय कपॅसिटीची आहे. स्कुटरचे डिझाईन करतांना सेंटर ऑफ ग्राव्हिटी विचारात घेतली असून त्यामुळे गाडी वळणावरही उत्तमरीत्या धावू शकेल व अपघाताचा धोका टळेल. या सर्व स्कुटर्समध्ये अँटी थेफ्ट अलार्मची व्यवस्था करण्यात आली आहे. एका चार्जिंगमध्ये ९० किलोमीटर गाडी धावेल. त्यासाठी अंदाजे २ युनिट्स वीज खर्च होईल म्हणजेच सुमारे १५ रुपयांत ९० किलोमीटर पार करता येतील. या चारही स्कुटर्स विविध आकर्षक रंगात उपलब्ध आहेत. विक्रीपश्चात भारतभरात तत्काळ सहाय्यता - सेवा मिळेल. संपूर्ण देशात वितरण व्यवस्थेचे जाळे निर्माण केले असून वाहन खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळण्याचीही व्यवस्था आहे. सर्व ग्राहकांच्या तांत्रिक माहितीसाठी व सहाय्यतेसाठी हयासा कंपनी लवकरच टेलीमॅटिक ऍप्लिकेशन विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे असेही त्यांनी नमूद केले.
*********************************
लवकरच येणार ई - मोटरसायकल व कार !

    ' विजय २०००' ही दणकट व किफायतशीर ई- मोटरसायकल लवकरच बाजारपेठेत दाखल होईल. एक लाखापेक्षा कमी किंमत असलेल्या या मोटरसायकलवरुन एका चार्जिंगमध्ये १५० ते २०० किलोमीटर प्रवास करता येईल. त्यासाठी केवळ ५ युनिट्स ( फक्त ३५ रुपये ) वीजखर्च होईल. २ व्यक्तींची वाहन क्षमता असेल. ट्यूबलेस १७ इंच अलॉय  व्हील्स देण्यात येणार आहेत. याशिवाय एलईडी इंडिकेटर्स, रिव्हर्स गिअर्स ही देखील वैशिष्ट्ये असतील. दि.२९ ऑगस्टपासून बुकिंगचा शुभारंभ होत आहे. प्रथम येणाऱ्या ५ हजार ग्राहकांना संधी मिळेल. नोंदणी केलेल्या ग्राहकांना ६० दिवसांत वाहन उपलब्ध करुन दिले जाईल. कंपनीचे कार्यकारी अधिकारी प्रदीप मोटवाणी यांनी असे सांगितले.
          आगामी वर्षात मार्च २०२२ मध्ये हयासा कंपनीच्या लिथियम बॅटरी व मोटर दिंडोरी कारखान्यात तयार होतील. सन २०२२ च्या दसरा - दिवाळीला ई - कार लॉंच करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरु झाली आहे. हयासा ई - मोबिलिटी इंडिया प्रा. लि. ही कंपनी येत्या काही काळात देशात अव्वल स्थान प्राप्त करेल असा विश्वास श्री. विजय हाके यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !