आदिवासी पाड्यांवरील ५८ शाळांतील ३५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वितरण ! ■ 'शाळा बंद, शिक्षण सुरु' उपक्रमाला बळ ! मुंबई च्या अमास सेवा ग्रुप चा उपक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


आदिवासी पाड्यांवर शैक्षणिक

साहित्याचे विनामूल्य वितरण


■ 'शाळा बंद, शिक्षण सुरु' उपक्रमाला बळ !


        नाशिक ( प्रतिनिधी ) - अमास सेवा ग्रुप, मुंबई यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-घोटविहिरा व इतर शाळेतील विद्यार्थ्याना काल शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.  आपल्या कर्तृत्वाने जनमानसात समाजसेवेने व सामाजिक कार्याने सुगंधीत असणारे व्यक्तीमत्व म्हणजे अमास सेवा ग्रुपचे सर्वेसर्वा चंद्रकांतभाई देढीया व विजय भगत त्यांच्यातर्फे जि.प.प्राथमिक शाळा-घोटविहिरा, पिंपळवटी, घोसाळी, गांवधबर्डा व पळशी या शाळेतील विद्यार्थ्यांना व पेठ,दिंडोरी आणि सुरगाणा तालुक्यातील ५‌‌८ शाळेतील ३५१४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.


    कोविडच्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा बंद आहेत. अशा कालावधीत गरीब गरजू विद्यार्थ्यांना अमास सेवा ग्रुप मुंबई यांनी शैक्षणिक साहित्य दिल्याने ' शाळा बंद पण शिक्षण सुरु ' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निश्चितच मदत होईल. त्यामध्ये वह्या, पेन व इतर लेखन साहित्याचा समावेश आहे. या उपक्रमाला हरिश्चंद्र भोये , धनंजय भोये, श्री कोकणे या शिक्षकांनी  मोलाचे सहकार्य केले. तसेच साहित्य वाटप प्रसंगी जि.प प्राथमिक शाळेतील शिक्षक गोरख बहिरम, विजय भोये, सुरेश सुर्यवंशी, दिलीप आहिरे, धर्मा खोटरे, फकीर वायकंडे आदी उपस्थित होते.यावेळी कोविड नियमावलीचे पालन करण्यात आले. विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार गटागटाने बोलावून साहित्य दिल्याने गर्दी झाली नाही. सर्वांनी मास्क घालून सुरक्षित अंतर राखले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद पाहण्यासारखा होता. शैक्षणिक साहित्य देणाऱ्या सर्व देणगीदारांचे शालेय व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !