पोस्ट्स

माझी साप्ताहिकीः विचारांची पर्वणी! प्रभाकर येरोळकर यांचा मरणोत्तर लेखसंग्रह " साप्ताहिकी " कुटुंबिय व चपराक प्रकाशनाकडून १४ आॅगस्ट ला प्रकाशित होत आहे ! तुम्हारे याद के, जख्म भरने लगते है, आप को पढ़ने के बहाने तुम्हे, याद करने लगते है। नागेश शेवाळकर यांनी लिहीलेले वाचनीय दोन शब्द !!

इमेज
माझी साप्ताहिकीः विचारांची पर्वणी!         'सर्वोत्कृष्ट नि सर्वोत्तम' हे कुण्या संस्थेचे ब्रीदवाक्य नव्हे तसेच तो कुणाचा प्रण नाही तर तो ध्यास आहे, पुण्यातील एका नामांकित साहित्य प्रकाशन संस्थेचा! घनश्याम पाटील ह्या तरुणाने 'किशोर' वयात 'चपराक' प्रकाशनाची निर्मिती केली. निर्मितीपासूनच पाटील एक गोष्ट सातत्याने करीत आहेत ती म्हणजे 'सर्वोत्कृष्ट नि सर्वोत्तम' साहित्य निर्मितीची! लेखक मग तो जुना असो, प्रतिष्ठित असो की नव्याने लिहिणारा असो. ज्या लेखकाजवळ उत्कृष्ट साहित्य आहे हे समजायला अवकाश घनश्याम पाटील हे त्या लेखकाचा शोध घेतात आणि ते साहित्य वाचक दरबारी अत्यंत आकर्षक स्वरुपात सादर करतात.        बाह्यरंग हे कोणत्याही पुस्तकाचे महत्त्वाचे अंग असते. पुस्तक हातात घेतल्यानंतर मुखपृष्ठ असेल, कागद असेल, अक्षरांचा आकार असेल, साहित्याची मांडणी असेल ह्या बाबी वाचकांना आकृष्ट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. चपराक प्रकाशन, पुणे यांची पुस्तके पाहिली म्हणजे बाह्यरंग किती महत्त्वपूर्ण ठरतात याची कल्पना येते. या कोणत्याही बाबतीत तडजोड करायची नाही ही महत्त्वाकांक

डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू अंध कुटुंबांना मदतीचा हात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू अंध कुटुंबांना मदतीचा हात !    नासिक(१२)::- ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अॅण्ड डिसेबल्ड या संस्थेच्या वतीने संस्थेचे आधारस्तंभ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांचा ५५ वा वाढदिवस उत्साहात साजरा झाला. श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून नाशिक परिसरातील गरजू अंध कुटुंबांना अन्नधान्याचे संस्थेच्यावतीने वाटप करण्यात आले तसेच नाना काळे यांच्या मित्र परिवारातर्फे छत्रीचे वाटप करण्यात आले.          ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड अॅण्ड डिसेबल्ड ही संस्था गेल्या अकरा वर्षांपासून संस्थेचे मानद अध्यक्ष डॉक्टर धर्माधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली नासिक व नासिकबाहेरील ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवून दिव्यांग व्यक्तींची सेवा करीत आहे. या संस्थेच्या मार्फत चालविल्या जाणाऱ्या मोफत निवासी संगणक केंद्रातून गेल्या वर्ष पर्यंत ५७ अंध मुलींना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी १७ ते १८ मुलींना सरकारी व खासगी कार्यालयात रोजगार मिळाला आहे. तसेच गेल्यावर्षापासून कोरोना महामारी चे संकट असल्याने अनेक स्वयंरोजगार

हयासा ई - स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग ! नासिकमधून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ई - स्कुटरची निर्मिती !! अवघ्या १५ ते २० रुपयांत ९० किलोमीटर !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!!

इमेज
हयासा ई - स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग !  नाशिक ( प्रतिनिधी ) :- हयासा ई - मोबिलिटी प्रा. लि. कंपनीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संपूर्ण भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रिक स्कुटर्सचे शानदार लॉंचिंग करण्यात आले. हयासा कंपनी नाशिकमध्ये ओजस, दक्ष, इरा आणि निर्भर या चार आकर्षक मॉडेल्सची निर्मिती करीत आहे. हयासा म्हणजे वेग ! आता वेगाचा अनुभव वाहनधारकांना या चार मॉडेल्सद्वारा घेता येईल. दिंडोरी येथे या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाहनांची निर्मिती करण्यात येत आहे. लवकरच या ई - वाहनांच्या विक्रीसाठी संपूर्ण देशभरात वितरण व्यवस्था उभी राहील.अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.          हयासा ई - मोबिलिटी कंपनीची स्थापना फेब्रुवारी २०२१ मध्ये करण्यात आली. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाची आधुनिक वाहने ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. याचा निश्चितच आनंद वाटतो. ओजस व दक्ष या स्कुटर्स तरुणाईला भुरळ घालतील. ' इरा ' हे मॉडेल विशेषतः महिलांना आकर्षित करेल. निर्भर हे मॉडेल व्यावसायिकांना उपयुक्त ठरेल. कंपनीचे उत्पादन दिंडोरी या आदिवासी व अतिदु

आदिवासी पाड्यांवरील ५८ शाळांतील ३५०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वितरण ! ■ 'शाळा बंद, शिक्षण सुरु' उपक्रमाला बळ ! मुंबई च्या अमास सेवा ग्रुप चा उपक्रम !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
आदिवासी पाड्यांवर शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वितरण ■ 'शाळा बंद, शिक्षण सुरु' उपक्रमाला बळ !         नाशिक ( प्रतिनिधी ) - अमास सेवा ग्रुप, मुंबई यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-घोटविहिरा व इतर शाळेतील विद्यार्थ्याना काल शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.  आपल्या कर्तृत्वाने जनमानसात समाजसेवेने व सामाजिक कार्याने सुगंधीत असणारे व्यक्तीमत्व म्हणजे अमास सेवा ग्रुपचे सर्वेसर्वा चंद्रकांतभाई देढीया व विजय भगत त्यांच्यातर्फे जि.प.प्राथमिक शाळा-घोटविहिरा, पिंपळवटी, घोसाळी, गांवधबर्डा व पळशी या शाळेतील विद्यार्थ्यांना व पेठ,दिंडोरी आणि सुरगाणा तालुक्यातील ५‌‌८ शाळेतील ३५१४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.     कोविडच्या प्रादुर्भावामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व शाळा बंद आहेत. अशा कालावधीत गरीब गरजू विद्यार्थ्यांना अमास सेवा ग्रुप मुंबई यांनी शैक्षणिक साहित्य दिल्याने ' शाळा बंद पण शिक्षण सुरु ' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी निश्चितच मदत होईल. त्यामध्ये वह्या, पेन व इतर लेखन साहित्याचा समावेश आहे. या उपक्रमाला हरिश्चंद

पेट्रोलची शंभरी मध्यमवर्गाला पडतेय भारी ! लेखक उद्धव भयवाळ यांनी केलेले उपहासात्मक तथा विनोदी लेखन !! सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
पेट्रोलची शंभरी मध्यमवर्गाला पडतेय भारी ! अलीकडे पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली तेव्हा पेट्रोलला उद्देशून म्हणावेसे वाटले की, "बा पेट्रोल राजा ! तू शेवटी शंभरी गाठलीच. तुझे अभिनंदन. एखाद्या क्रिकेट खेळाडूने नव्वद, पंचाण्णव धावा कराव्यात. परंतु त्याला शतक गाठता येऊ नये, तेव्हा त्याला जे दु:ख होत असेल, तसेच दु:ख मागच्या वर्षभर तुझ्या वाट्याला आले ना? नव्वद, पंचाण्णव, शहाण्णव, एवढ्या किमतीतच खेळलास वर्षभर. शंभरी गाठायला तुला बराच संघर्ष करावा लागला. शेवटी शंभरी गाठण्याचा आनंद वेगळाच असतो. नाही का? शतायुषी माणसाला किती आनंद होत असेल! तू शंभरी गाठल्यामुळे तुला तर आनंद झाला असेल पण आता सामान्य माणसाचे काय होईल ते सामान्य माणसालाच माहित!" पेट्रोलच्या किमती कितीही वाढल्या तरी श्रीमंतांना काहीच फरक पडत नाही. गरिबांकडे तर पेट्रोलवर चालणारे वाहनच नसते. त्यामुळे त्यांचाही प्रश्न नाही. प्रश्न असतो तो फक्त मध्यम वर्गाचा. आधी गरिबी बघितलेल्या, पण हळू हळू श्रीमंत होण्याची इच्छा धरणाऱ्या या मध्यमवर्गीय माणसाला अनेकानेक समस्यांनी ग्रासलेले असते. किमतीचे शतक झळकावून पेट्रोलने तर आपले हेल्म

बाॅईज टाऊन पब्लिक स्कूलचा अनोखा गौरव सोहळा ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
अनोखा गौरव सोहळा !                                                                            नासिक ::- बॉईज टाऊन पब्लिक स्कूल मधील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा अनोखा ऑनलाईन गुणगौरव सोहळा. बॉईज टाऊन पब्लिक स्कूलच्या २०२०-२१ च्या शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा आगळा वेगळा ऑनलाइन सत्कार समारंभ दि.१ ऑगस्ट २०२१ रविवार रोजी शाळेचे विश्वस्त माननीय नेवील मेहता,  माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ मॅडम, शिक्षकवृंद व यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सध्याच्या परिस्थितीत गुणवंतांचा प्रत्यक्ष सत्कार करणे शक्य नसल्याने शाळेने इ-प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अनोखा सत्कार सोहळा आयोजित केला होता. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणवत्तेनुसार शाळेने वेगवेगळी प्रमाणपत्रे तयार केली आणि या इ-प्रमाणपत्रांची झलक या  सत्कार समारंभात  दाखविण्यात आली. शाळेचा या वर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल १००% लागला असून धनंजय हिरे या विद्यार्थ्याने १००% गुण प्राप्त करून पहिला क्रमांक पटकावला तर प्रथमेश बोरसे या

कोपरगावच्या मातीचा सुगंध कवितेच्या माध्यमातून जगभर पसरावा - प्रा. डॉ. सदानंद भोसले. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
कोपरगाव (२९)::-- कोपरगाव च्या मातीचा सुगंध कवितेच्या माध्यमातून जगभर पसरावा आणि येथील साहित्यिक वारशाचे पुनर्निर्माण व्हावे,आजच्या परिस्थिती मध्ये कविता माणुसपणा ची जाणीव करून देत असल्याने ती समृद्ध व्हावी,यासाठी असे साहित्यिक उपक्रम महत्वाचे आहेत असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सदानंद भोसले यांनी केले.        शब्दगंध साहित्यिक परिषद,कोपरगाव शाखेच्या वतीने आयोजित ऑनलाईन काव्यसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली व कोपरगाव चे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे,कवी सुभाष सोनवणे, ऐश्वर्याताई सातभाई, प्रा.डॉ.कैलास कांबळे, सुधीर कोयटे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये काव्य संमेलन संपन्न झाले,           पुढे बोलताना प्रा.डॉ.  सदानंद भोसले म्हणाले की, 'कवितेत भावनेचा ओलावा असावा, विचार कवितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन व  जनजागृती साठी मांडले जातात,आपली पाळेमुळे कोपरगावच्या मातीत रुजली,वाढली त्यामुळे कोपरगाव चे आकर्षण कायम आहे,या काव्य संमेलनात सर्व कविता प्रासंगिक आशावादी आणि प्रेरणादायी आहे

क्रांती कांबळेला विद्यापीठ स्तरीय सुवर्णपदक जाहीर ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
क्रांती कांबळेला सुवर्णपदक जाहीर -------------------------------------------------         उस्मानाबाद (२९)::- वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये कृषी जैवतंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्याशाखेत विद्यापीठ स्तरावर दिल्या जाणाऱ्या सुवर्णपदकासाठी उस्मानाबाद येथील क्रांती पंडित कांबळे ही पात्र ठरल्याचे  विद्यापीठाने जाहीर केले आहे.        क्रांती कांबळे ही विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय( वनामकृवि) लातूर येथून बीएससी ऍग्री बायोटेक्नॉलॉजी( कृषी जैवतंत्रज्ञान) शाखेतून उत्तीर्ण झाली आहे. ती चारही वर्षे महाविद्यालयातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे .एकूण गुण( सीजीपीए) ८. ९४ घेऊन ती प्रथम श्रेणी विशेष प्रावीण्यासह विद्यापीठातून प्रथम आली आहे. तिला सुवर्णपदक (सुवर्ण मुलामित ) व गुणवत्ता प्रमाणपत्र २३ व्या दीक्षांत समारंभात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. असे विद्यापीठाचे कुलगुरू यांनी कळविले आहे.        क्रांती कांबळे हिचे सर्व शिक्षक, कुटुंबीय ,नातेवाईक ,आप्तेष्ट यांच्याकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आ

प्राचार्य डॉ. गोटन जैन यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
प्राचार्य डॉ. गोटन जैन यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड       चांदवड::-(वार्ताहर): श्री.नेमिनाथ जैन संस्थेच्या आबड-लोढा-जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोटन जैन यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. प्राचार्य जैन हे नॅनो सायन्स विषयात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि तज्ज्ञ म्हणून सुपरिचित आहेत.महाराष्ट्र शासनाने त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून यापूर्वी गौरव केलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आदर्श शिक्षक आणि आदर्श प्राचार्य म्हणून त्यांचा सन्मान केला आहे. नायजेरिया विद्यापीठांशी महाविद्यालयाचा त्यांनी करार करून चांदवड महाविद्यालयाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांचे १२ विद्यार्थी हे पीएचडी धारक असून ३ विद्यार्थी पीएचडी प्राप्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे चांदवड महाविद्यालयातील भौतिक शास्त्र विषयासाठी पीएचडी संशोधन केंद्र म्हणून मान्यता दिली आहे. त्यांच्या या निवडीचे अधिकृत पत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्राचा

आर्थिक सुधारणांमुळे या दशकात भारत 7 टक्क्यांपेक्षा जास्त दराने जीडीपीमध्ये वाढ दर्शवेल: आर्थिक विकास होत असताना असमानतेकडे बोट दाखवणाऱ्या लोकांनी कोरोनाच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचे संकुचन झाल्याने श्रीमंतांपेक्षा मध्यमवर्गीय आणि गरिबांना जास्त त्रास झाला, हे समजून घेतले पाहिजे ::- कृष्णमूर्ती सुब्रमण्यम

इमेज
मुक्त व्यापार आणि आर्थिक विकासाचे समर्थन या गोष्टी शतकानुशतके भारतीय साहित्याचा भाग आहेत :कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आर्थिक सुधारणांमुळे या दशकात भारत 7 टक्क्यांपेक्षा जास्त दराने जीडीपीमध्ये वाढ दर्शवेल: कृष्णमूर्ती सुब्रमण्यम मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी विभागाचा शताब्दीवर्ष सोहळा संपन्न            आर्थिक विकासासाठी मुक्त व्यापाराला चालना आणि आणि मुक्त व्यापाराचे समर्थन या गोष्टी आपल्याला पाश्चिमात्यांनी शिकवलेल्या नसून त्या भारतीयांच्या जीवनशैलीचा गेली शतकानुशतके भाग आहेत. आपण कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये पाहतो की राजाला व्यापारावरील सर्व प्रकारची बंधने हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.         त्यामुळेच आपण आर्थिक सुधारणांच्या तत्त्वज्ञानामध्ये संपत्ती निर्माण करण्याकडे एक वरदान म्हणून पाहतो असे प्रतिपादन भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार, कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी मुंबई विद्यापीठातील मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (आधीचे अर्थशास्त्र विभाग) विभागाच्या शताब्दीवर्षाच्या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना केले.          ते पुढे म्हणाल