पोस्ट्स

महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवाचे १७ आक्टोबरला नाशिकमध्ये आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवाचे १७ आक्टोबरला नाशिकमध्ये आयोजन !        नाशिक प्रतिनिधी : सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोकशाहीर वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोसत्व नाशिकमध्ये होतो आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकपासून या महोत्सवाची सुरुवात होऊन, महाड पर्यंत या महोत्सवाचे आयोजन केले आहे. दादांच्या सांस्कृतिक क्षेत्रांतील अनमोल कामगिरीबद्दल कृतज्ञता म्हणून तसेचं लोकांपर्यंत त्यांची गाणी व  विचार पोहचवणे हा या कार्यक्रमामागील संयोजकांचा मानस आहे. नाशिक येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाच्या प्रांगणात दि.१७ ऑक्टोबरला सकाळी ११ वा. तीन सत्रात संपन्न होणा-या या महोत्सवात विविध मान्यवर वामनदादांंच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा गीत-काव्य आणि व्याख्यानातून मांडणार आहेत. पहिल्या सत्रात, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगीत विभाग प्रमुख आणि प्रसिद्ध संगीतकार डॉ. संजय मोहड हे वामनदादांच्या गीतांचा 'गीत भीमायन' हा कार्यक्रम सादर करणार आहेत. शाहीर मेघानंद जाधव (औरंगाबाद) हेदेखील यावेळी दादांची गीत

ग्रामसेवक लाचलुचपत च्या जाळ्यात ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
ग्रामसेवक लाचलुचपत च्या जाळ्यात ! नासिक::- शासकीय घरकुल योजनेंतर्गत बांधकाम केलेल्या शौचालयाचे प्रकरणाचा अहवाल फिर्यादी यांचे बाजूने तयार करून गटविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यासाठी २७५००/- रुपयांची मागणी करण्यात आली होती. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने आज रोजी आरोपी लोकसेवक चंद्रकांत पाटील ग्रामसेवक दहेगाव (म) ता. चांदवड यांस रुपये २५०००/- लाचेची मागणी करून लाच  स्विकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचेविरूद्ध चांदवड पोलिस ठाण्यात ५७४/२०२१ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

अनिल चैत्या वांगड एक प्रतिभावान शिष्योत्तम ! वारली चित्रशैली म्हणजे मातीचा सन्मान !!

इमेज
प्रतिभावान  शिष्योत्तम                "आदिवासी वारली चित्रशैलीला ११०० वर्षांची ज्ञात परंपरा आहे. या कलेला समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी, वारसा आणि स्थानिक भौगोलिक संदर्भ आहेत. माझे गुरू पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्यामुळेच वारली कलेला नाव आणि वैभव प्राप्त झाले. ते टिकवून अधिक उंचीवर नेण्याचे काम माझ्यासह नव्या पिढीने करायचे आहे. सरकारी पातळीवरील गुरू-शिष्य योजनेतून मी त्यांच्याकडे शिकलो. सध्याची व्यावसायिकता व अर्थकारणाच्या रेट्यामुळे एकूणच कलाविश्वात परिवर्तन अपरिहार्य आहे. मात्र तरीही विचारात सुस्पष्टता असेल तर वारली चित्रशैली विशुद्ध स्वरुपात टिकवणे शक्य होईल", असा अभिप्राय मशे यांचे प्रतिभावान शिष्योत्तम अनिल वांगड व्यक्त करतात.                अनिल चैत्या वांगड यांचा जन्म १९८३ साली डहाणू तालुक्यातील गंजाड जवळच्या वांगडपाडा येथे झाला. नववीपर्यंत आश्रमशाळेत शिक्षण झाल्यावर परिस्थितीमुळे त्यांनी शिक्षण सोडले. पुढे सरकारी पातळीवरील गुरू-शिष्य योजनेत जिव्या सोमा मशे यांच्याकडे अनिल यांनी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. आत्मसात केलेल्या कलेला त्यांनी आपल्या प्रतिभेने अधिक

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर ! नासिक जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तात्याराव लहाने, दिशा प्रतिष्ठान सह ३० मान्यवरांचा उपमुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार गौरव !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

इमेज
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर तात्याराव लहाने, प्यारे खान, अमितेशकुमार, मातृभूमी, दिशा प्रतिष्ठान, यांच्या सह राज्यातील ३० मान्यवरांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ तारखेला मुंबईत गौरव.     मुंबई - कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासुन राज्यात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ति, संस्था व अधिकार्‍यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन संघटनेच्या वतीने गौरव करण्यात येत आहे. राज्यातील पुरस्कारांची घोषणा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आज येथे केली. मंगळवार दि. ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत सह्याद्रि अतिथीगृह येथे सायंकाळी ४.०० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ३० मान्यवरांना स्मृतिचिन्ह व कृतज्ञतापत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण व संस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि कृषि राज्य मंत्री डॉ. विश्वजित पतंगराव कदम हे उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार विजेत्यांची नावे अशी,

भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या दोन दिवसीय अभिनव पथ परीषदेचे उद्घाटन !! परिषदेत "दि रुल्स अँड रेड फ्लॅग्स" या पुस्तकाचे अनावरण !!

इमेज
नाशिक शाखेच्या परिषदेत "दि रुल्स अँड रेड फ्लॅग्स" या पुस्तकाचे अनावरण            भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम विभागाच्या दोन दिवसीय "  अभिनव पथ  " प्रादेशिक परिषदचे, उदघाटन नाशिक येथे दि ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे आणि जळगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शाखेत करण्यात आले. सदर परिषदेत नाशिकचे  खासदार हेमंत गोडसे , इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचे  माजी अध्यक्ष सीए. प्रफुल्ल छाजेड , प्रमुख अतिथी म्हंणून उपस्थित होते.             नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव  व  धुळे परिसरातील  २०० पेक्षा अधिक सनदी लेखापालांनी या परिषदेत भाग घेतला.   या परिषदेत  सीए. राजेंद्र शेटे  लिखित  “दि रुल्स अँड रेड फ्लॅग्स”  या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी सीए. राजेंद्र शेटे यांनी आपले विचार मांडतांना असे सांगितले कि कोणता हि व्यवसायिक फसवणूक करण्यासाठी व्यवसाय सुरु करत नाही, परंतु अशा प्रकार ची परिस्थिती निर्माण होते कि जी त्याला फसवणूक करण्यास भाग पाडते, अशा परिस्थितीलाच आर्थिक गैरव्यवस्थापन असे म्हणतात. सदरच्या पुस्तका मध

ईगल फौंडेशनच्यावतीने " ईगल ब्रँड आयकॉन २०२१ " पुरस्कारासाठी आवाहन ! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
ईगल फौंडेशनच्यावतीने " ईगल ब्रँड आयकॉन २०२१ " पुरस्कारासाठी आवाहन ईगल फौंडेशनच्या ( ईगल न्यूज चॅनल ISO 9001:2015   सर्टीफाईड) वर्धापन दिनानिमित्ताने ईगल फौंडेशनच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे. आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श माता- पिता  पुरस्कार देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, प्रशासकीय, उद्योग, युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, आदी क्षेत्रातील  व्यक्ती अथवा संस्थांना सहभाग घेता येईल. पुरस्कार नामांकन फॉर्म 9422420611 या व्हॉटस्अप नंबरवर आपले नाव, पत्ता, हुद्दा कळवावा. दि.३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन शेखर सुर्यवंशी (सांगली), सागर पाटील (रत्नागिरी ), प्रशांत लाड (चिवे), प्रकाश वंजोळे (खंडाळा), सुभाष भोसले (कागल), बाबासाहेब राशिनकर (गुहागर), दिपक पोतदार (जयसिंगपूर),  प्रा,बापुसाहेब कांबळे (मुंबई), संजय नवले (अहमदनगर), प्रा.तुकाराम पाटील (कोल्हापूर),  प्रा.अरुण घोडके (इस्लामपूर ), अशोक शिंदे (येलूर), संजय गायकवाड (रोहा), भगवान देवकर (कुरळप), डॉ.सुनील भावसार (नाशिक),  प्रा.सर्जेराव राऊत (कोल्हापूर), प्रतापराव

राष्ट्रपती भवनात झळकले वारली चित्रशैलीतील रामायण ! हरेश्वर वनगा : पुरोगामी वारली चित्रकार !!

इमेज
हरेश्वर वनगा : पुरोगामी वारली चित्रकार   आई मथीबाई यांच्याकडून हरेश्वर वनगा यांना वारली चित्रकलेचा वारसा मिळाला. उद्धवराव पंडित यांच्या घरी ती मोलकरणीचे काम करायची. तेथे हरेश्वर व त्यांच्या भावंडांवर  नागरी संस्कार झाले. तलासरीच्या जनजाती आश्रमशाळेतील विकास प्रकल्पात त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रप्रेमी विचारांनी ते प्रेरित झाले व स्वयंसेवक बनले. पुरोगामी विचारसरणीच्या हरेश्वर यांनी नातेवाईकांच्या व समाजाच्या दबावाला न जुमानता, आपल्या दोन मुलींना 'वंशाची पणती' मानून उत्तम शिकवले. त्यांना उच्चशिक्षित केले. राज्य सरकारने आदिवासी सेवक पुरस्काराने त्यांना गौरविले आहे. त्यांनी वारली कलेत स्वतःचे वेगळेपण सिध्द केले आहे. त्यांचे रामायणावर आधारित असलेले वारली चित्र थेट राष्ट्रपती भवनात विराजमान झाले आहे.    डहाणू आगर येथे १९६५ साली जन्मलेल्या हरेश्वर नथू वनगा यांची आई मथीबाई झोपडीच्या भिंतीवर चित्रे रंगवायची. छोट्या हरेश्वरला ते बघून खूप उत्सुकता वाटायची. आईकडून ही कला त्यांनी आत्मसात केली. ५ बहिणी व १ भाऊ अशा मोठ्या कुटुंबात हरेश्व

जिल्हा परिषदेत ५८ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नत्या ! कुटुंबप्रमुखच्या भूमिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी !!

इमेज
जिल्हा परिषदेत ५८ कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नत्या ! सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी पदी बढती नाशिक : मागीलआठवड्यात अनुकंपा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेत समावेश केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषद सेवेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी आनंदराव पिंगळे व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांना कार्यवाही करण्याबाबत सूचना केल्या होत्या, त्यानुषंगाने जिल्हा परिषदेत सेवेतील वरिष्ठ सहायक पदावरील कर्मचाऱ्यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर १६ तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावरून सहायक प्रशासन अधिकारी ०६ तर ग्रामसेवक पदावरून ग्रामविकास अधिकारी या पदावर ३६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली, यावेळी महिला, वयोवृद्ध, दिव्यांग, दुर्धर आजाराने त्रस्त, पती पत्नी एकत्रीकरण यांच्याबाबत पदोन्नती देताना सहानुभतीपूर्वक विचार करण्यात आला. असे आहेत पदोन्नती झालेले कर्मचारी - सहायक प्रशासन अधिकारी पाठक वृषाली दिलीप जाधव ललिता ज्ञानेश्वर भुजबळ राजे

भास्कर यांच्यामुळेच  आमचा, कलेचा भाग्योदय - सदाशिव. सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!

इमेज
भास्कर यांच्यामुळेच  आमचा, कलेचा भाग्योदय !    "१९७३ साली भास्कर कुलकर्णी गंजाडला आमच्याकडे प्रथम आले आणि त्यांच्या येण्याने माझे वडील जिव्या सोमा मशे लोकांसमोर आले ! आमची वारली कला उजेडात आली. वारल्यांचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले. त्यांच्या येण्याने आमच्या वारली जमातीचा व पारंपरिक कलेचा भाग्योदय झाला. ते वारली आणि मधुबनी या लोककलांचे तारणहार ठरले. त्यांच्या रुपात देवच भेटला. नाहीतर वारली जमात आयुष्यभर वेठबिगारी करीत राहिली असती. वारली कला जनमानसात पोहोचली त्याला लवकरच ५० वर्षे होतील."  -हे उदगार आहेत पद्मश्री जिव्या सोमा मशे यांचे ज्येष्ठ चिरंजीव सदाशिव यांचे...    वारली चित्रशैलीवरील लेखमालेतील ५० लेखांचा माझा संकल्प गेल्या आठवड्यात पूर्ण झाला. त्यानंतर प्रतिभावान वारली कलाकारांवर नवी लेखमाला लिहिण्याचे ठरवले. अर्थातच पहिले नाव समोर आले ते वारली कलेचे पितामह पद्मश्री मशे यांचे चिरंजीव सदाशिव यांचे. त्यांचा जन्म डहाणू तालुक्यातील गंजाड या गावात १ जून १९५८ रोजी झाला. वाडा येथील आश्रमशाळेत नववीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वारली चित्रे रे

अभिनंदनीय !! अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या एंजल मोरे या युवतीस मॅरेथॉन जलतरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'वर्ल्ड ट्रिपल क्राऊन' हा बहुमान प्राप्त !

इमेज
  'वर्ल्ड ट्रिपल क्राऊन ' विजेती एंजल मोरे !   अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या एंजल मोरे या युवतीने, मॅरेथॉन जलतरणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'वर्ल्ड ट्रिपल क्राऊन' हा बहुमान प्राप्त केला आहे. तब्बल १४ तास २३ मिनिटे महाकाय सागरी लाटांशी दोन हात केल्यानंतर, दि.१५ सप्टेंबरला  संध्याकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी इंग्लिश खाडी पार करून तिने हे असामान्य यश मिळवले.एंजल मूळची नाशिक येथील मोरे परिवारातील आहे. ज्येष्ठ संगणक अभियंता तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील प्रख्यात उद्योजक श्री. हेमंत आणि अर्चना मोरे यांची ती कन्या असून, व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य अमेरिकेत स्थायिक झाले आहे.       एंजलचा या मोहिमेतील अत्यंत खडतर जलप्रवास इंग्लंड ते फ्रान्स असा होता. खाडी ओलांडण्याचे हे अंतर, म्हणजेच चॅनल क्रॉसिंग २८.१ मैल (४५.१ कि.मी.) इतके प्रदीर्घ  होते. एंजलसह अन्य आठ स्वतंत्र एकल जलतरणपटू आणि दोन रिले संघ ग्रीनीच मध्यवर्ती वेळेनुसार पहाटे ४.३० वाजता मोहिमेवर निघाले. सोसाट्याचा वारा आणि  पाण्याच्या प्रचंड वेगाने त्यांच्या पुढे आव्हान उभे केले. परिणामी यापैकी पाच माघारी