महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवाचे १७ आक्टोबरला नाशिकमध्ये आयोजन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोत्सवाचे १७ आक्टोबरला नाशिकमध्ये आयोजन !

       नाशिक प्रतिनिधी : सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोकशाहीर वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महोसत्व नाशिकमध्ये होतो आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांची जन्मभूमी असलेल्या नाशिकपासून या महोत्सवाची सुरुवात होऊन, महाड पर्यंत या महोत्सवाचे आयोजन केले आहे. दादांच्या सांस्कृतिक क्षेत्रांतील अनमोल कामगिरीबद्दल कृतज्ञता म्हणून तसेचं लोकांपर्यंत त्यांची गाणी व  विचार पोहचवणे हा या कार्यक्रमामागील संयोजकांचा मानस आहे. नाशिक येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाच्या प्रांगणात दि.१७ ऑक्टोबरला सकाळी ११ वा. तीन सत्रात संपन्न होणा-या या महोत्सवात विविध मान्यवर वामनदादांंच्या कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा गीत-काव्य आणि व्याख्यानातून मांडणार आहेत. पहिल्या सत्रात, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगीत विभाग प्रमुख आणि प्रसिद्ध संगीतकार डॉ. संजय मोहड हे वामनदादांच्या गीतांचा 'गीत भीमायन' हा कार्यक्रम सादर करणार आहेत. शाहीर मेघानंद जाधव (औरंगाबाद) हेदेखील यावेळी दादांची गीतं सादर करतील. दुसऱ्या सत्रात प्रसिध्द साहित्यिक प्रा. गंगाधर आहिरे आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय हे 'वामनदादांचे कर्तृत्व आणि वर्तमान प्रबोधनाची दिशा' या विषयावर बोलणार आहेत. तिसऱ्या सत्रात कवी संविधान गांगुर्डे, विशाल नंदागवळी, रोहित जगताप, शुभंम बचुटे, निखिल दोंदे, शिशूपाल गंवई आणि दिपक दोंदे हे परिवर्तनाच्या कविता सादर करणार आहेत. सदर महोत्सवाचे स्वागताध्यक्ष नितीन भुजबळ व संयोजक मिहीर गजभिये यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन दिपक पगारे, विशाल यडे, विजय साळवे, सूरज भालेराव, कोमल पगारे, रोहिणी दोंदे, राहुल नेटावटे आदिंनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

होय! मी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लिना बनसोड(भा.प्र.से.) यांच्याबद्दलच बोलतो आहे, लिहितो आहे.

८४ अनुकंपा कर्मचाऱ्यांचे समायोजन !

आंतर जिल्हा बदलीने जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापना ! शून्य शिक्षक शाळांना मिळाले २० शिक्षक !!