पत्रकारितेचा बदलता प्रवाह,,,,,,दर्पण दिनानिमित्त. ६ जानेवारी रोजी दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस आहे. तोच स्मृती दिवस पत्रकार दिन म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो. सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!
पत्रकारितेचा बदलता प्रवाह....|| दर्पण दिनानिमित्त वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळींचा इतिहास असतो. वृत्तपत्रे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देतात. त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत, कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते आणि याच विचारातून जवळपास १८३ वर्षापूर्वी म्हणजे ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू केले. मराठीतील पहिले संपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात "दर्पण दिन" साजरा करतो. त्याकाळी समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपला देश असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे असे बाळ शास्त्रींना वाटले. त्यामुळे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेत ‘दर्पण’ ची सुरूवात मुंबई येथे केली. त्याकाळी सुरु झालेल्या मुद्रणालयाचा त्यांनी समाज प्रबोधनासाठी उपयोग करुन घेतला. २५ जून १८४० साली दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण, मनोरंजन, आणि समाजप्रबोध