युवा कवयित्री कु. वर्षा शिदोरे यांच्या "स्मितरहस्य" काव्यसंग्रहास सन्मान पुरस्कार ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


युवा कवयित्री कु. वर्षा शिदोरे यांच्या "स्मितरहस्य" काव्यसंग्रहास सन्मान पुरस्कार !

      नासिक::- युवा कवयित्री कु. वर्षा शिदोरे, नाशिक यांच्या 'स्मितरहस्य' या पहिल्या-वहिल्या काव्यसंग्रहास  पुणे येथे ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
     ी कवी चंद्रकांत जोगदंड यांच्या काव्यार्चना कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त कै. गंगाधर श्रावण आबक यांच्या स्मरणार्थ 'विशेष सन्मान' म्हणून दिला जाणारा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार देण्यात आला.
      काव्यार्चना काव्यसंग्रहाच्या प्रकाशन व पुरस्कार सोहळ्यानिमित्त खुले काव्यसंमेलन आयोजित केले गेले होते. अनेक कवी/कवयित्रींच्या काव्यसुमनांनी आनंदलेल्या सोहळ्याला थाटामाटात सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक व कथाकार बबन पोतदार, भारत हायस्कुल ज्युनिअर कॉलेज जेऊर ता. करमाळाचे प्राचार्य हनुमंत धालगडे , विश्वरत्न इंग्लिश मेडियम विष्णूपंत ताम्हाणे विद्यालय चिखलीचे अध्यक्ष प्रा. व्यंकटराव वाघमोडे, सुभाष वारे, एस.एम.जोशी फाऊंडेशन, यशोदीप पब्लिकेशन्स पुणे येथील निखिल लंबाते, आत्माराम हारे यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजक आदरणीय चंद्रकांत जोगदंड, त्यांच्या पत्नी सौ. अर्चना जोगदंड, कवी बाळासाहेब गिरी, कवी आनंद गायकवाड, कवी जितेन सोनवणे तसेच मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. सर्व साहित्यिक यांचे प्रा.त्रिशाला साळवे यांनी आयोजकांचे आभार मानून महाराष्ट्रभरच्या २० कलाकृतींना पुरस्कृत करून नविन साहित्य लिखाणास उर्जा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
        नाशिकचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ कविवर्य किशोर पाठक यांची प्रस्तावना लाभलेल्या व स्मितांच्या रहस्यातून फुललेल्या "स्मितरहस्य" काव्यसंग्रहाबद्दल.
       आजच्या तरुण पिढीच्या मनातील विचार, आचार, संघर्ष, जगताना पडलेले प्रश्न आणि यातूनच त्यांच्या मनाची होणारी घालमेल या सर्वांची काव्यातून अचूक सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा कवयित्री/लेखिका कु. वर्षा शिदोरे यांचा पहिलाच 'स्मितरहस्य' काव्यसंग्रह आहे. स्मितात हजारो अर्थ दडलेले आहेत. प्रत्येक स्मित वेगळं असतं. त्याची लबक, छटा, अर्थ, अभिप्राय वेगळाच असतो. मग त्यातून माणूस वेगवेगळ्या अर्थाने जाणवतो, दिसू लागतो. त्यात 'आई' असते, 'ती' असते, 'लग्न' असतं, एकमेकांना भेटणारी 'पाखरं' असतात. म्हणून हे "स्मितरहस्य" विविध भावभावना आणि रंगरेषांनी गडद होत जातं, जे आपलंही होतं आणि आपल्यापासून दूर जातं. अशा स्मितात दडलेल्या अनेकविध पैलूंना शोधता-शोधता त्यामागचं रहस्यही उलगडेल अशी कवयित्रीची कल्पना !
              किशोर पाठक यांची प्रस्तावना असून दिषोत्तमा प्रकाशन ने प्रकाशित केलेला ७६ पृष्ठे व १०० रुपये मुल्य असलेला स्मितरहस्य काव्यसंग्रह आपल्या संग्रही असावा यासाठी संपर्क ८७९३७९९७७७.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार ओमान मधील मस्कत येथे ,,,,,,!

आधाराश्रम संस्थेचा बालकमृत्यूशीकोणताही संबंध नाही - दातार

आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बालक-पालकांना दिलासा !