मुख्याध्यापकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!




नंदुरबार जिल्ह्यातील माध्य. शाळांतील मुख्याध्यापकांसाठी शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन !

       नंदुरबार :- मुख्याध्यापकांना शैक्षणिक कामकाज करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.मुख्याध्यापकांचे प्रशासकीय कामकाज सुलभ होण्यासाठी, नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर प्रथमतः माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांसाठी "शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिका सन २०२१-२२" ची निर्मिती करण्यात आली.
        नंदुरबार जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांचे संक्षिप्त कार्यभार, वर्षभराचे नियोजन, शाळा पातळीवरील विविध समित्या व त्यांचे कामकाज,शालेय अभिलेख, इयत्ता निहाय तासिका वाटप नियोजन, इ.५ वी ते इ.१० वी वर्गांचे मूल्यमापन तक्ते, रजेचे प्रकार, मुख्याध्यापकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके अशा विविधांगी विषयांचे एकत्रित संकलन करून नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, नंदुरबार यांच्या संयोजनाद्वारे श्री.आप्पासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय विखरण ता. जि.नंदुरबार विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिकेची निर्मिती करण्यात आली.
            जि.प. येथील सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले.या कार्यक्रमाचे व जि.प. अध्यक्षा अँड.सीमा वळवी,मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,शिक्षण व आरोग्य सभापती अजित नाईक कृषी व पशुसंवर्धन सभापती गणेश पराडके तसेच महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे,अध्यक्ष जे. के.पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.मच्छिंद्र कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, प्राथ. उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, डॉ.युनूस पठाण माध्य.उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत पाटील, मुख्याध्यापक संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष, सुनील भामरे नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, मुकेश पाटील, सचिव पुष्पेंद्र रघुवंशी तसेच मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
            जि.प.अध्यक्षा अँड.सीमा वळवी यांनी पुस्तिका साकारणारे डी.डी. साळुंके यांचा गौरव केला‌. व आपल्या मनोगतातून माध्यमिक शाळेसाठी "शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिक' दैनंदिन कामकाज करताना मुख्याध्यापकांना निश्चितच उपयोग होईल असे सांगितले.
          तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपल्या मनोगतातून "शैक्षणिक मार्गदर्शक पुस्तिका" शाळेसाठी व मुख्याध्यापकांसाठी प्रशासकीय दैनंदिन कामकाज सुलभ होणे साठी पुस्तिकेतील मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

स्त्री आत्मनिर्भर बनल्यास समाजाचा विकास होईल-पद्मश्री नीलिमा मिश्रा ! गटशिक्षण अधिकारी हेमंत बच्छाव व शिक्षण विस्तार अधिकारी शीतल कोठावदे यांना रोटरी वोकेशनल सर्विस अवार्ड प्रदान !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।