पोस्ट्स

प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू- नरेंद्र पाटील !!

इमेज
माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, मा. आमदार नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात शेकडो माथाडी कामगार आझाद मैदानात!             मुंबई दि. १५ :- माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन व सहकार आणि अन्य खात्याअंतर्गत असलेल्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन च्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन आयोजित केले होते. माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या धरणे व उपोषण आंदोलनात युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ सखाराम जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील इतर पदाधिकारी आणि बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे, लातूर, सातारा, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातील व्यवसायात काम करणारे हजारो प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाचे विविध खात्यांत

७०० अंकांनी गडगडला !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, सेन्सेक्स ७०० अंकांनी गडगडले मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बाजारातील उदासीन स्थिती असूनही निफ्टी सकारात्मक नोटेवर उघडला परंतु सातत्याने नफा बुकिंगमुळे २६५ अंकांची घसरण झाली. धातू, तेल आणि वायू यासारख्या क्षेत्रांमध्ये सुधारणा दिसून आली तर काही निवडक वाहन खरेदीत आवड दिसून आली. कच्च्या तेलाच्या किमतीत तीव्र घसरण झाली. तांत्रिकदृष्ट्या बाजार अजूनही तेजीच्या बाजूने आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा बाजाराचा परिणाम दिसून येत आहे, कारण कमोडिटीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. त्याचवेळी चीनमधील मंदीमुळे कमोडिटीच्या किमतींवरही दबाव येत आहे. रशिया-युक्रेन युद्धाव्यतिरिक्त सर्वात महत्वाची घटना म्हणजे बुधवारी येणारा एफओएमसी बैठकीचा निकाल. भारतीय रुपया आणि रशियन रुबल व्यापार सुलभ करून सवलतीच्या दरात रशियन कच्चे तेल खरेदी करण्याचा विचार करत असल्याच्या बातमीचीही गुंतवणूकदारांनी दखल घेतली. सरकारने ऑटो पीएलआय योजनेचे लाभार्थीही जाहीर केले आहेत. मारुती सुझुकी इंडिया लि., भारत फोर्ज, बॉश, प्रिकोल, लुमॅक्स यासह इतर अनेक कंपन्यांना मान्यता मिळाली आहे.           ऑटो वगळता आयटी, धातू, ऊर्ज

राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्कार सोहळा २०२२ उत्साहात साजरा !

इमेज
  राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्कार सोहळा २०२२ उत्साहात साजरा !        पुणे(प्रतिनिधी)::- सक्षम पोलीस टाइम्स व सक्षम टाइम्स मिडिया फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय सक्षम महिला रत्न पुरस्कार सोहळा २०२२ येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड  येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.          सोहळ्यात प्रमुख पाहुणे उल्हासदादा पवार, माजी आमदार व ज्येष्ठ साहित्यीक मोहन जोशी, अभिनेत्री निशा परुळेकर, भाजपा पदाधिकारी सविता जामनिक, कॉर्डिनेटर किसान सेल भारत, तथा अंबिका मसाले संचालक, जेष्ठ समाजसेविका कमलबाई परदेशी उपस्थित होते.          याप्रसंगी पुस्तक प्रकाशन शुभहस्ते - सुनीताताई राजे पवार, कोषाध्यक्ष  महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या शुभहस्तेहस्ते पु्स्तक प्रकाशन करण्यात आले.   सुजाता ताई कमलकृष्ण, सदस्य सावित्रीबाई फुले मराठी अभ्यास मंडळ पुणे विद्यापीठ व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सक्षम महिला रत्न पुरस्कार २०२२ सोहळा उत्साहात पार पडला.           पुरस्कार्थी म्हणून माधुरी मुरारी मडावी, (मुख्याधिकारी यवतमाळ नगरपरिषद), डॉ. रुपाली भुजंगराव मेमाणे (लेखन), नलिनी प्रफु

"हे फाऊंडेशन" च्या रेन्बो प्राईड ऑफ इंडिया २०२२ चे मानकरी ! मिस रेन्बो आणि मिस्टर रेन्बो कोण ठरले ?

इमेज
"हे फाऊंडेशन " च्या रेन्बो प्राईड ऑफ इंडिया २०२२ चे बियोन्से आणि अंश तिवारी ठरले मानकरी ! न्यूज मसाला वृत्तसेवा,      मुंबई (गुरुदत्त वाकदेकर ) : "हे फाऊंडेशन" च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील रेन्बो प्राईड ऑफ इंडिया २०२२ च्या दिमाखदार स्पर्धेत बियोन्से हिने मिस रेन्बो तर अंश तिवारी याने मिस्टर रेन्बोचा किताब पटकावला. व्हिक्टोरिया तेयिंग उपविजेती तर मोहित आगरवाल उपविजेता ठरला. मिस्टर क्वीन रेन्बो प्राईड ऑफ इंडियाचा मानकरी समीर शेख तर उपविजेता सय्यद याह्या ठरला.                              "हे फाऊंडेशन" च्या संस्थापिका डॉ. संगीता पाटील आणि संचालिका तसेच मिस इंडिया ग्लोबल ब्यूटीच्या विजेत्या लावण्या पाटील यांनी या सौंदर्यस्पर्धेचे शानदार आयोजन केले. प्रसिद्ध दंतवैद्यक आणि फॅशन मॉडेल डॉ. सुमाया रेश्मा यांचीही यावेळी उपस्थिती होती.         या उपक्रमाबाबत बोलताना डॉ. संगीता पाटील यांनी सांगितले की, हा उपक्रम एलजीबीटी कम्युनिटीबाबत समाजात जागरूकता व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आला. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून

डॉ. रेणू स्वरूप यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान ! कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतीला विज्ञानाची जोड आवश्यक-शरद पवार !!

इमेज
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार डॉ. रेणू स्वरुप यांना प्रदान कष्टकरी शेतकर्‍यांच्या शेतीला विज्ञानाची जोड आवश्यक - शरद पवार न्यूज मसाला वृत्तसेवा,            मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार यंदा जैवतंत्रज्ञान विभागाच्या माजी सचिव डॉ. रेणू स्वरुप यांना यशवंतराव चव्हाण यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्ताने प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ५ लाख रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी राष्ट्रीय पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती दिली. राष्ट्रीय पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. यावेळी अरुण गुजराथी, खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या.           मी केंद्रात कृषिमंत्री म्हणून शपथ घेतली, त्यावेळी देशात धान्यटंचाई असल्याने विदेशातून धान्य आयात करण्याचा निर्णय घेतला होता. ती फाईल घेऊन सचिव माझ्याकडे आले, त्यावेळी मी अस्वस्थ झालो. आपण बाहेरच्या

आधुनिक युगातील न्यूटन म्हणून ओळखले जाणारे महान जगप्रसिद्ध विश्वरचनाशास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचा १४ मार्च चौथा स्मृतिदिनानिमित्त !!

इमेज
ख्यातनाम विश्वरचनाशास्त्रज्ञ हॉकिंग  ! *******************************             आधुनिक युगातील न्यूटन म्हणून ओळखले जाणारे महान जगप्रसिद्ध विश्वरचनाशास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचा आज चौथा स्मृतिदिन. विश्वनिर्मिती , विश्वरचना, पुंजभौतिकी आणि कृष्णविवरावरील त्यांचे  संशोधन मैलाचा दगड मानले जाते. ऐन उमेदीत ’मोटार न्युरॉन डिसीज’ ही स्नायूची व्याधी जडलेल्या हॉकिंग यांनी मोठ्या जिद्दीने अपंगत्वावर विजय मिळवून ब्रम्हांडातल्या अनेक न उकलणाऱ्या गूढ रहस्यांचा शोध घेतला आणि असामान्य बुद्धीकौशल्याच्या जोरावर माणूस जग जिंकू शकतो हे साऱ्या जगाला दाखवून दिले. त्यांची जीवनकथा मोठी प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी आहे. *********************************                 ८ जानेवारी १९४२ म्हणजेच  गॅलिलिओच्या ३०० व्या पुण्यतिथी वर्षी आणि न्युटनच्या जन्मानंतर बरोबर तीनशे वर्षांनी इंग्लंडमध्ये जन्मलेल्या स्टीफन हॉकिंग यांची लहानपणानापासूनच शास्त्रज्ञ व्हायची इच्छा  होती. ८-९ वर्षाचे असतानाच ते घड्याळ आणि रेडिओ सारख्या वस्तू सहजपणे खोलत असत आणि त्या वस्तू कशा चालतात याचेही त्यांना ज्ञान होते. १९५९ मध्ये

शब्दगंध च्या वतीने पुरस्कारासाठी पुस्तकं पाठविण्याचे आवाहन !

इमेज
शब्दगंध च्या वतीने पुरस्कारासाठी पुस्तकं पाठविण्याचे आवाहन ! अहमदनगर(प्रतिनिधी)::- “१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह, काव्यसंग्रह, आत्मचरित्र, लेखसंग्रह, कादंबरी, बालवाड्मय, संशोधन ग्रंथ, समीक्षा ग्रंथ च्या दोन प्रती राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारासाठी पाठवाव्यात ” असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले आहे.              वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षी “ पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन” लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पुस्तकं मागविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.           सन २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती, परिचय, पोस्टाची रु ५ ची ५ तिकिटे ३१ मार्च २०२२  पर्यंत शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर – ४१४००१ मो.९९२१००९७५० येथे पाठवावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, सुभाष सोनवणे, भगवान राऊत, किशोर डोंगरे, प्रा.अशोक कानडे, शर्मिला

सातत्याचे दुसरे रूप म्हणजे डॉ भानोसे यांचे सामाजिक कार्य - न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर

इमेज
सातत्याचे दुसरे रूप म्हणजे डॉ. भानोसे यांचे सामाजिक कार्य - न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर            समाजामध्ये सर्वत्र नकारात्मकता व स्वार्थ पाहायला मिळतो. अशावेळी निस्वार्थपणे गेली १४४७ दिवस सातत्यपूर्ण वाहतूक सुरक्षा अभियान व पर्यावरण संवर्धन अभियान राबवणे हे अत्यंत कठीण आहे. गरुड झेप प्रतिष्ठान चे हे कार्य कौतुकास्पद आहे. समाजाने या कार्याचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केले .        नासिक मध्ये चार वर्षे विविध ठिकाणी सातत्यपूर्ण वाहतूक सुरक्षा प्रबोधन अभियान सुरू आहे. गरूड झेप प्रतिष्ठान चे डॉ.भानोसे यांचे नऊ जागतिक विक्रम झाले आहेत. त्यांनी केलेल्या वाहतूक सुरक्षा चळवळीमुळे नाशिककर वाहतुकीचे नियम पाळत आहेत, शहरातील दुचाकीधारकांचा हेल्मेट वापर वाढलेला आहे, विनाकारण हॉर्न वाजविणे कमी झालेले आहे, अपघातांचे प्रमाण देखील घटलेले पाहायला मिळते.

सेन्सेक्सचा सावध पवित्रा !

इमेज
सेन्सेक्सचा सावध पवित्रा !                मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : फार्मा, तेल आणि वायू समभागांच्या नेतृत्वाखाली ११ मार्च रोजी अत्यंत अस्थिर सत्रात निर्देशांक किरकोळ वाढले. सेन्सेक्स शुक्रवारी लाल रंगात उघडल्यानंतर, देशांतर्गत समभागांनी लवकरच तोटा भरून काढला आणि बँकिंग, आरआयएल आणि टाटा स्टीलच्या वाढीमुळे ते अधिक स्थिर होत गेले. सकाळच्या सत्रात ब्रेंट क्रूडच्या किमती १.३ टक्क्यांनी १०७.९४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरल्याने आणि राज्य निवडणुकीत भाजपला मिळालेल्या जोरदार विजयाने भावनांना बळ दिले. फार्मा निर्देशांक २ टक्के आणि तेल आणि वायू निर्देशांक १ टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक हिरव्या रंगात कामगिरी करत राहिले. सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे कारच्या किमतीत वाढ यासारख्या विविध समस्यांमुळे देशभरातील कारखान्यांकडून डीलरशिपपर्यंत ऑटोमोबाईल डिलिव्हरी २३% कमी झाली. जागतिक ऊर्जेच्या किमती वाढल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर नकारात्मक प्रभाव पडेल.              सिप्ला, बीपीसीएल, सन फार्मा, जेएसडब्लू स्टील आणि आयओसी हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले तर

विकासात्मक- आदिवासी औद्योगिक समूह (क्लस्टर) निर्मितीची घोषणा !

इमेज
आदिवासी औद्योगिक समूह निर्मितीची घोषणा ! “विधान सभा उपाध्यक्ष  नरहरी झिरवाळ यांचे संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिले आदिवासी औद्योगिक समुह TIC दिंडोरीत होणार” अर्थमंत्री अजित पवार यांची अर्थ संकल्पात घोषणा.    नासिक,११ (प्रतिनिधी)::-प्रस्तावित आदिवासी औद्योगिक समुह ही नाविन्यपूर्ण संकल्पना असून आदिवासी उद्योजकांना एका छताखाली सुविधा उपलब्ध करून आदिवासी समाजात उद्योजकता विकास घडवून आणणे हा मुख्य उद्देश आहे.       आदिवासी औद्योगिक क्लस्टर Trible Industrical cluster (TIC) मध्ये आदिवासी उद्योजकांना उद्योगांकरीता शेड, वीज, पाणी, रस्ते यांची उपलब्धता करण्यासोबत मोठे, मध्यम आणि लहान उद्योग एकाच ठिकाणी विकसित करण्यात येतील. आदिवासी युवकांना रोजगार उपलब्धीतून कौशल्य विकास साध्य करणे या उद्देशाने क्लस्टरची निर्माती करण्यात येईल.           नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका मुख्य बाजारपेठे पासून जवळ आणि इतर आदिवासी तालूक्यांचा मध्यवर्ती ठिकाणी आहे. रस्ते आणि पाणी यांची उपलब्धता यांचा विचार करता दिंडोरी तालुक्यात आदिवासी औद्योगिक समुह प्रस्तावित करण्यात आले आहे. दिंडोरी तालुक्यातील टोमॅटो, द्राक्