शब्दगंध च्या वतीने पुरस्कारासाठी पुस्तकं पाठविण्याचे आवाहन !


शब्दगंध च्या वतीने पुरस्कारासाठी पुस्तकं पाठविण्याचे आवाहन
!

अहमदनगर(प्रतिनिधी)::- “१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान प्रकाशित झालेले कथासंग्रह, काव्यसंग्रह, आत्मचरित्र, लेखसंग्रह, कादंबरी, बालवाड्मय, संशोधन ग्रंथ, समीक्षा ग्रंथ च्या दोन प्रती राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कारासाठी पाठवाव्यात ” असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले आहे.
             वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. यावर्षी “ पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन” लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पुस्तकं मागविण्यात येत असल्याची माहिती अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.
          सन २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या दोन प्रती, परिचय, पोस्टाची रु ५ ची ५ तिकिटे ३१ मार्च २०२२  पर्यंत शब्दगंध साहित्यिक परिषद, फुलोरा, लक्ष्मी कॉलनी, तपोवन रोड, सावेडी, अहमदनगर – ४१४००१ मो.९९२१००९७५० येथे पाठवावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, सुभाष सोनवणे, भगवान राऊत, किशोर डोंगरे, प्रा.अशोक कानडे, शर्मिला गोसावी, सुनील गोसावी, राजेंद्र फंड  यांनी केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नाशिकच्या जडणघडणीत मविप्रचा मोलाचा वाटा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचे दिमाखात उद्घाटन

कौशल्याचे प्रशिक्षण घेऊन महिलांनी स्वावलंबी व्हावे – हेमलता बिडकर

ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन लिमिटेडच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद - आयपीओच्या पहिल्याच दिवशी २.१ पट प्रतिसाद. इएसडीएस सॉफ्टवेअर सोल्यूशन लिमिटेड चा आयपीओ २८ ऑगस्ट २०२६ रोजी उघडला, प्रति इक्विटी शेअर किंमत पट्टा (Price Band) ₹४०८ ते ₹४२९ निश्चित (दर्शनी मूल्य ₹१ प्रति शेअर). • प्रति इक्विटी शेअर किंमतपट्टा ₹४०८– ₹४२९ निश्चित. •बोली/इश्यू उघडण्याची तारीख – २८ ऑगस्ट २०२६ आणि बोली/इश्यू बंद होण्याची तारीख – १ सप्टेंबर २०२६. • किमान बोली लॉट ३४ इक्विटी शेअर्स आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत