विकासात्मक- आदिवासी औद्योगिक समूह (क्लस्टर) निर्मितीची घोषणा !


आदिवासी औद्योगिक समूह निर्मितीची घोषणा !

“विधान सभा उपाध्यक्ष  नरहरी झिरवाळ यांचे संकल्पनेतून महाराष्ट्रातील पहिले आदिवासी औद्योगिक समुह TIC दिंडोरीत होणार” अर्थमंत्री अजित पवार यांची अर्थ संकल्पात घोषणा.

   नासिक,११ (प्रतिनिधी)::-प्रस्तावित आदिवासी औद्योगिक समुह ही नाविन्यपूर्ण संकल्पना असून आदिवासी उद्योजकांना एका छताखाली सुविधा उपलब्ध करून आदिवासी समाजात उद्योजकता विकास घडवून आणणे हा मुख्य उद्देश आहे.
      आदिवासी औद्योगिक क्लस्टर Trible Industrical cluster (TIC) मध्ये आदिवासी उद्योजकांना उद्योगांकरीता शेड, वीज, पाणी, रस्ते यांची उपलब्धता करण्यासोबत मोठे, मध्यम आणि लहान उद्योग एकाच ठिकाणी विकसित करण्यात येतील. आदिवासी युवकांना रोजगार उपलब्धीतून कौशल्य विकास साध्य करणे या उद्देशाने क्लस्टरची निर्माती करण्यात येईल.
          नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका मुख्य बाजारपेठे पासून जवळ आणि इतर आदिवासी तालूक्यांचा मध्यवर्ती ठिकाणी आहे. रस्ते आणि पाणी यांची उपलब्धता यांचा विचार करता दिंडोरी तालुक्यात आदिवासी औद्योगिक समुह प्रस्तावित करण्यात आले आहे. दिंडोरी तालुक्यातील टोमॅटो, द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकां सोबत, तांदूळ, नागली, खुरासणी, वरई ही महत्वाची पिके असून यावरील विविध प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे शक्य होईल. दिंडोरी तालुक्यात परनॉड रिकॉर्ड, गोदरेज, UB बेव्हरेज, वरूण ॲग्रो, सहयाद्री ॲग्रो, सूला, सि-ग्राम, एव्हरेस्ट हे उद्योग असून उदयोगांकरीना पोषक वातावरण असल्याने नाशिक जिल्हा मुख्यालयापासून 23 किमी अंतरावर पेठ, गुजरात राज्य मार्गावरील जांबूटके शिवारात सदर प्रकल्प प्रस्तावित आहे.
       आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने उद्योजकांसाठी तयार शेड वितरीत करणे, कृषि प्रक्रिया, इंजिनिअरींग, आदिवासी हस्तकला, लॉजीस्टीक आणि कौशल्य विकास तसेच गाळे या स्वरुपात शेडचे बांधकाम करण्यात येईल. सोबत तांत्रिक पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण, शेती प्रक्रिया उद्योग उभारणी, शेतमालाची स्वच्छता, वर्गीकरण आणि पॅकींग सुविधा, तसेच निर्यातीस चालना देण्याकरिता सहाय्य, प्रशिक्षण आणि वर्कशॉप यूनिट यांची उभारणी करण्यात येईल.
       आदिवासी‍ औद्योगिक समुहामुळे तसेच सोबतच्या नवीन औद्योगिक क्षेत्रामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास व रोजगार निर्मिती होवून या परिसराचा विकास होण्यास चालना मिळणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।