सातत्याचे दुसरे रूप म्हणजे डॉ भानोसे यांचे सामाजिक कार्य - न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर


सातत्याचे दुसरे रूप म्हणजे डॉ.
भानोसे यांचे सामाजिक कार्य - न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर

           समाजामध्ये सर्वत्र नकारात्मकता व स्वार्थ पाहायला मिळतो. अशावेळी निस्वार्थपणे गेली १४४७ दिवस सातत्यपूर्ण वाहतूक सुरक्षा अभियान व पर्यावरण संवर्धन अभियान राबवणे हे अत्यंत कठीण आहे. गरुड झेप प्रतिष्ठान चे हे कार्य कौतुकास्पद आहे. समाजाने या कार्याचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केले .
       नासिक मध्ये चार वर्षे विविध ठिकाणी सातत्यपूर्ण वाहतूक सुरक्षा प्रबोधन अभियान सुरू आहे. गरूड झेप प्रतिष्ठान चे डॉ.भानोसे यांचे नऊ जागतिक विक्रम झाले आहेत. त्यांनी केलेल्या वाहतूक सुरक्षा चळवळीमुळे नाशिककर वाहतुकीचे नियम पाळत आहेत, शहरातील दुचाकीधारकांचा हेल्मेट वापर वाढलेला आहे, विनाकारण हॉर्न वाजविणे कमी झालेले आहे, अपघातांचे प्रमाण देखील घटलेले पाहायला मिळते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे आज दुपारच्या सत्रात झाली निदर्शने !

२७ मे रोजी शिवशंभूप्रेमींच्या भेटीला "सरसेनापती हंबीरराव मोहिते". "परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट"… "युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे" ... "मराठ्यांकडे आग रोखणाऱ्या नजरा आहेत" !

भास्कर कृष्णा कोठावदे काळाच्या पडद्याआड ! सहकार, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात शोककळा !!