पोस्ट्स

डाॅक्टरांच्या चिठ्ठीवर मिळणाऱ्या औषधांव्यतिरिक्त इतर औषधांची जाहिरात करता येणार नाही- डॉ. भारती पवार

इमेज
डाॅक्टरांच्या चिठ्ठीवर मिळणाऱ्या औषधांव्यतिरिक्त इतर औषधांची जाहिरात करता येणार नाही- डॉ. भारती पवार                 औषधांविषयीच्या जाहिरातींचे नियमन, औषधे आणि जादुई प्रभाव असणारे उपचार (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, १९५४ अंतर्गत केले जात असून राज्य सरकारे या कायद्याची अंमलबजावणी करतात. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने नियमन १९४५  मध्ये  २०१५ साली दुरुस्ती करण्यात आली असून, त्यानुसार, एच, एच-१ आणि एक्स या सूचीत समाविष्ट औषधे (म्हणजेच केवळ डॉक्टरांच्या चिठ्ठीवर मिळणारी औषधे) यांची जाहिरात करता येत नाही. असे करायचे असल्यास, केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता असते. जर या अटीचे पालन केले नाही, तर अशा उत्पादकांवर कारवाई करण्याचे अधिकार, राज्यातील परवाना देणाऱ्या प्राधिकरणाला आहेत.       दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिराती आणि त्यामुळे जनतेच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन, आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीच्या आधारावर,माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने १२ जून २०१७ रोजी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांना, ज्या औषधी उत्पादनांसाठी आयुष अथवा राज्यातील औ

५७५ ग्रामपंचायतींना जिल्हास्तरावरून ५५ कोटी रुपयांचे वितरण !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा, अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत पेसा ५% अबंध निधीचे जिल्हास्तरावरून ५५ कोटी ८६ लक्ष वितरण !           नाशिक - सन २०२१-२२ वर्षात आदिवासी बहुल ९ तालुक्यातील ५७५ ग्रामपंचायतींना आदिवासी उपयोजनेंतर्गत विकासकामांसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन २०२१-२२ अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , नाशिक द्वारा  जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक यांचे कडील निधी वितरण आदेशानुसार एकत्रित प्राप्त निधी  ५५ कोटी ८६ लक्ष २० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या प्रमाणात निधी थेट पेसा ग्रामपंचायतीना वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. नाशिक जिल्हातल्या अनुसूचित क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायतींना ५% अबंध निधी योजनेचा निधी  २४ मार्च २०२२ रोजी थेट ग्रामपंचायतींना वितरित होत असुन यामुळे जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील विकासकामांना गती मिळणार आहे. जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, बागलाण, देवळा या नऊ तालुक्यातील ५७५ ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश असुन १४७९ गावांना या निधीचा लाभ होणार आ

शिवाजी चुंभळे यांना मानाची गदा मान्यवरांच्या हस्ते प्रदान

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा दांडेकर दीक्षित तालीम संघाच्या वतीने शिंमगा कुस्ती दंगल निमित्ताने क्रीडा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न." शिवाजी चुंभळे यांना मानाची गदा प्रदान !      नासिक (प्रतिनिधी)::- महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला १६५ वर्षांची परंपरा लाभलेला नासिक शहरातील दांडेकर दीक्षित तालीम संघाचा शिमगा कुस्ती दंगल पुरस्कार प्रदान करण्यात आले.         कोरोना महामारीमुळे दोन वर्षे स्पर्धा व पुरस्कार वितरण होऊ शकले नव्हते, चार वर्षांपूर्वी त्यात नविन प्रथा सुरू झाली आहे. कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, कामगिरी करणाऱ्या जुने पहीलवान कुस्तीगीर कुस्ती प्रेमी यांची निवड करुन त्यास शिमगा कुस्ती दंगल मध्ये आमंत्रित करून, नासिक शहर जिल्हा तालीम संघाचे माजी अध्यक्ष खासदार आमदार क्रीडा महर्षी कै. उत्तमराव ढिकले यांचे नावाने क्रीडा महर्षी उत्तमराव ढिकले क्रीडा गौरव पुरस्कार बहाल करण्यात येतो. सन २०२२ चा पुरस्कार जुने कुस्तीगीर व नासिक शहर तालीम संघाचे माजी अध्यक्ष पहीलवान काका साहेब खंडेराव मुळाणे यांना मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला. तसेच मानाची गदा ग्रामीण भागात कुस्ती वाढविण्यासाठी

शिवजयंती निमित्ताने ५१ युवकांचे रक्तदान तर ३५० नागरीकांची आरोग्य तपासणी !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा शिवजयंती निमित्ताने रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्साहवर्धक सहभाग !             मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : चिल्ड्रन्स हेल्प अँड हेल्पेज फाउंडेशन, आर.एम.एस. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, आयसीयू, आयसीसीयू लाईफ मोनीटर्ड वेल व सायन हॉस्पिटल ब्लड बँक व मराठे शाही ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने, शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान व  विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर, गोवंडी येथील इमारत क्र. १७ ब, संस्कृती सोसायटी, म्हाडा कॉलनी, गोवंडी, मुंबई येथे संपन्न झाले.          मराठे शाही ग्रुप व स्थानिक नागरिकांनी मिळून एकंदरीत ५१ युवकांनी रक्तदान केले व आरोग्य शिबिरात ३५० नागरिकांनी, डोळे तपासणी, ईसीजी, शारीरिक तपासणी करून घेतली. मराठे शाही ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंदी वातावरणात शिबिर संपन्न केले.  या शिबिराला, विशेष सहकार्य रक्तदान दाते, साई भाई रामपूरकर यांनी मार्गदर्शन केले होते तसेच संजय इंदप यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.

कसला योगायोग ! हा व्हिडिओ आणि यात दाखवण्यात आलेली बेरीज खरी ठरू नये अशीच भावना सर्वांची असेल !!

कसला योगायोग !    हा व्हिडिओ आणि यात दाखवण्यात आलेली बेरीज खरी ठरू नये अशीच भावना सर्वांची असेल !! जागतिक महायुद्ध सुरू झाले की होणार आहे ? पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाची तारीख आणि आज सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या तारखेत तिसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली जात आहेत का अशी शंका उपस्थित करणारा सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ ! काय गंमत असते ना मानवी मुल्यांचा आणि जीवनातील अनामिक संकटांच्या खेळाची !        सारे विश्व गणितीय सूत्रात बांधले गेले असताना पृथ्वीतलावरील मानवी मेंदूच्या विकासातील कल्पनेच्या, गणिताचा, बुद्धीचा आविष्कार म्हणावा !! असा योगायोग घडू नये ही विधात्याला विनंती करूया ! इतकंच,,,,,,,,,,

मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम कि मै ‘इश्‍क’भी लिखना चाहूँ, तो ‘इन्कलाब’ लिखा जाता है !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा,           (प्रा. विजय कोष्टी, सहयोगी प्राध्यापक, कवठेमहांकाळ)                      दि. २३ मार्च; क्रांतिकारक भगतसिंग ,  राजगुरु व सुखदेव यांचा स्मृतिदिन आहे.   स्वातंत्र्यप्राप्तीच्या जादूई काळात   संपूर्ण पिढीच देशभक्तीने भारावली होती. त्या   मंतरलेल्या दिवसात १९०७ मध्ये पंजाबमध्ये जन्मलेल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या एका   क्रांतिकारी   तरुणाने    अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. हा तरूण म्हणजेच    हसत हसत मृत्यूला कवटाळणारा आणि भीतीवर विजय मिळविणारा   भगतसिंग   होय. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी पोलिसी अत्याचारांविरुद्ध आंदोलन करून  ‘  चौरीचौरा ’  येथील पोलीस चौकी जाळली. त्यानंतर लाल लजपतराय यांच्यावर लाठीमार करणाऱ्या जेम्स स्कॉट ऐवजी चुकून केलेली सॅडर्स ची हत्या ,  असेम्ब्लीतला    बॉम्बस्फोट  ,  बॉम्ब बनविण्याची केंद्रे आदी घटनांबाबत त्यांना दोषी ठरवून पोलिसांनी अटक केली व तुरुंगात छळ केला. शेवटी २३ मार्च १९३१ रोजी त्यांना आणि त्यांचे सहकारी राजगुरु व सुखदेव यांना    सॅडर्सच्या खुनाबद्दल फाशी देण्यात आली.   मित्राला लिहिलेल्या एका पत्र

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास उद्यापासून प्रारंभ !

इमेज
यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २१ मार्च पासून मुंबईत         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुबई, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २६ मार्च या कालावधीत मुंबईत १२ वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यंदाचा महोत्सव स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन २१ मार्चला प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख उपस्थित राहतील. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल तसेच प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले हेही यावेळी उपस्थित राहतील. या महोत्सवात जागतिक पातळीवरील ३०, भारतीय ५ आणि मराठी ५ असे एकूण ४० चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना भारतीय चित्रपटांसोबत फ्रांस, इंडोनेशिया, जर्मनी, इस्त्राइल, रशिया, हंगेरी, सौदी अरेबिया, इटली, ब्रिटन, रोमानिया, ब्राझिल, स्पेन अर्थातच महोत्सवामध्ये ग्लोबल सिनेमा, रेट्रोस्पेक्टीव्ह, इंडियन सिनेमा, कंट्री फोकस आणि म

दोन विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या आगळ्यावेगळ्या कलाकाराची मुलाखत घेणार त्यांचाच वर्गमित्र !! शताब्दी महोत्सव व्याख्यानमालेतील ३३ वे पुष्प !!!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा ना.ए. सोसायटी शताब्दी व्याख्यानमाला ! वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर यांची मुलाखत नाशिक ( प्रतिनिधी ):- येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालय आयोजित शताब्दी महोत्सव व्याख्यानमाला सुरू आहे. त्यातील ३३ वे पुष्प सोमवारी ( दि.२१) गुंफण्यात येईल. पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी व वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर यांची मुलाखत त्यांचे वर्गमित्र साहित्यिक, रंगकर्मी सतीश मोहोळे घेणार आहेत. वारली चित्रसृष्टी या विषयावरील हा संवाद दुपारी ४.३० वाजता संस्थेच्या रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये होईल.              ख्यातनाम पेठे विद्यालयातील १९७५ सालच्या बॅचचे विद्यार्थी संजय देवधर यांनी पत्रकारिता करतानाच आदिवासी वारली चित्रशैलीत संशोधनाचे कार्य केले. कार्यशाळेद्वारे ते वारली कलेचा प्रचार - प्रसार करतात. त्यांची ६ मराठी, इंग्लिश पुस्तके प्रकाशित झाली असून वारली चित्रसहल हा अनोखा उपक्रम राबवितात. दोन विश्वविक्रम त्यांनी प्रस्थापित केले आहेत. राज्य शासनाने आदिवासी सेवा पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. कोरोनाच्या काळात दोन वर्षात त्यांचे ना

प्रशासकीय राजवटीत धडक वसुली मोहीम !

इमेज
प्रशासकीय राजवटीत मनपाकडून पंचवटी विभागात धडक वसुली मोहीम !   गाळेधारक व घरपट्टी-पाणीपट्टी थकबाकीदारांवर होणार कठोर कारवाई !       नाशिक(प्रतिनिधी )::- मनपाच्या प्रशासकीय राजवटीत पंचवटी विभागीय कार्यालयाच्यावतीने पंचवटी भागात मनपा गाळेधारक व घरपट्टी-पाणीपट्टी मिळकत थकबाकीदारांकडून वसुली होण्यासाठी विशेष धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या विशेष धडक वसुली मोहिमेत घरपट्टी-पाणीपट्टीची थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली जात आहे. यावेळी या वसुली मोहिम दरम्यान कारवाई टाळण्यासाठी मनपा गाळेधारक व घरपट्टी-पाणीपट्टी मिळकत धारकांनी तात्काळ घरपट्टी-पाणीपट्टी भरावी असे आवाहन नाशिक मनपाच्यावतीने केले जात आहे.        नाशिक मनपाच्या प्रशासकीय राजवटीत पंचवटी विभागीय कार्यालयाच्यावतीने विभागीय अधिकारी कैलास राभडीया यांच्या नेतृत्वाखाली घरपट्टी-पाणीपट्टी तसेच मिळकत-जाहिरात व परवाने विभागाकडून पंचवटी प्रभागातील प्रामुख्याने म्हसरूळ, मखमलाबाद, आडगांव, नांदूर, हनुमानवाडी, रामवाडी, हिरावाडी, गणेशवाडी, दिंडोरीरोड, पेठरोड, अमृतधाम, हनुमाननगर आदी मुख्य भागात वसुलीची धडक मोही

अंध-बधीर ज्युडो राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला तीन पदके ! मोईज मोहम्मदल्ली यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन !!

इमेज
न्यूज मसाला वृत्तसेवा अंध-बधीर ज्युडो राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला तीन पदके          मुंबई (गुरुदत्त वाकदेकर ) : गुजरात येथील गांधीनगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या १० व्या राष्ट्रीय अंध आणि बधीर ज्युडो चॉम्पियनशीप २०२२ या स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण, रौप्य आणि कास्य अशी तीन पदके मिळाली आहेत. या स्पर्धेचे नियोजन महाराष्ट्राच्या अंध आणि बधीर ज्युडो असोसिएशनचे सरचिटणीस आर. व्ही. पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. महाराष्ट्रातून या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक – जयदीप सिंग (९० किलो), अजय ललवानी (७३ किलो), दर्शन कांबळी (९० किलो), सुजाता (९० किलो). स्पर्धेत जयदीप सिंग याने सुवर्ण, दर्शन कांबळी याने रौप्य तर सुजाता यांनी कास्य पदक मिळवले. जयदीप याने हे पदक प्राप्त केल्यानंतर १० सुवर्ण पदक मिळविल्याचा राष्ट्रीय पॅरा ज्युडो चॉम्पियनशीपमध्ये विक्रम नोंदवला. या स्पर्धेतून इंटरनॅशनल आयबीएसए ग्रॅण्ड प्रिक्स आणि वर्ल्ड ग्रॅण्ड प्रिक्स स्पर्धेसाठी जयदीप सिंग, अजय ललवानी यांची निवड करण्यात आली आहे.              महाराष्ट्राच्या संघटनेचे अध्यक्ष मोईज मोहमदल्ली यांनी विजेत्यांचे अभिनंद