दोन विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या आगळ्यावेगळ्या कलाकाराची मुलाखत घेणार त्यांचाच वर्गमित्र !! शताब्दी महोत्सव व्याख्यानमालेतील ३३ वे पुष्प !!!


न्यूज मसाला वृत्तसेवा

ना.ए. सोसायटी शताब्दी व्याख्यानमाला !

वारली चित्रशैली अभ्यासक

संजय देवधर यांची मुलाखत


नाशिक ( प्रतिनिधी ):- येथील नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालय आयोजित शताब्दी महोत्सव व्याख्यानमाला सुरू आहे. त्यातील ३३ वे पुष्प सोमवारी ( दि.२१) गुंफण्यात येईल. पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी व वारली चित्रशैली अभ्यासक संजय देवधर यांची मुलाखत त्यांचे वर्गमित्र साहित्यिक, रंगकर्मी सतीश मोहोळे घेणार आहेत. वारली चित्रसृष्टी या विषयावरील हा संवाद दुपारी ४.३० वाजता संस्थेच्या रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये होईल.  

           ख्यातनाम पेठे विद्यालयातील १९७५ सालच्या बॅचचे विद्यार्थी संजय देवधर यांनी पत्रकारिता करतानाच आदिवासी वारली चित्रशैलीत संशोधनाचे कार्य केले. कार्यशाळेद्वारे ते वारली कलेचा प्रचार - प्रसार करतात. त्यांची ६ मराठी, इंग्लिश पुस्तके प्रकाशित झाली असून वारली चित्रसहल हा अनोखा उपक्रम राबवितात. दोन विश्वविक्रम त्यांनी प्रस्थापित केले आहेत. राज्य शासनाने आदिवासी सेवा पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. कोरोनाच्या काळात दोन वर्षात त्यांचे नासिकच्या साप्ताहिक न्यूज मसाला व www.newsmasala.in या वेबसाईटवर वारली कलेवरील ५० पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले. संजय देवधर यांनी वारली कलेतील अथकपणे दिलेल्या योगदानाचा पट मुलाखतीतून उलगडेल. हा ऑनलाईन कार्यक्रम फेसबुक लाईव्ह अनुभवता येईल. तसेच नंतर युट्यूबवर बघता येईल.

            या व्याख्यानाचा सर्वांनी लाभ घेऊन जगप्रसिद्ध लोकप्रिय वारली चित्रशैली जाणून घ्यावी. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर, उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम, सहकार्यवाह शैलेश पाटोळे, शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड, मुख्याध्यापक कैलास पाटील, उपमुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, पर्यवेक्षक गंगाधर बदादे यांनी असे आवाहन केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

"राजकारण गेलं मिशीत" या चित्रपटात उद्धव भयवाळ यांची लावणी !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।