अंध-बधीर ज्युडो राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला तीन पदके ! मोईज मोहम्मदल्ली यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन !!


न्यूज मसाला वृत्तसेवा

अंध-बधीर ज्युडो राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला तीन पदके

         मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गुजरात येथील गांधीनगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या १० व्या राष्ट्रीय अंध आणि बधीर ज्युडो चॉम्पियनशीप २०२२ या स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण, रौप्य आणि कास्य अशी तीन पदके मिळाली आहेत. या स्पर्धेचे नियोजन महाराष्ट्राच्या अंध आणि बधीर ज्युडो असोसिएशनचे सरचिटणीस आर. व्ही. पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
महाराष्ट्रातून या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक – जयदीप सिंग (९० किलो), अजय ललवानी (७३ किलो), दर्शन कांबळी (९० किलो), सुजाता (९० किलो). स्पर्धेत जयदीप सिंग याने सुवर्ण, दर्शन कांबळी याने रौप्य तर सुजाता यांनी कास्य पदक मिळवले. जयदीप याने हे पदक प्राप्त केल्यानंतर १० सुवर्ण पदक मिळविल्याचा राष्ट्रीय पॅरा ज्युडो चॉम्पियनशीपमध्ये विक्रम नोंदवला. या स्पर्धेतून इंटरनॅशनल आयबीएसए ग्रॅण्ड प्रिक्स आणि वर्ल्ड ग्रॅण्ड प्रिक्स स्पर्धेसाठी जयदीप सिंग, अजय ललवानी यांची निवड करण्यात आली आहे.
             महाराष्ट्राच्या संघटनेचे अध्यक्ष मोईज मोहमदल्ली यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. स्पर्धेत दिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मिर, छतीसगड, हरयाणा, नागालँड, मध्यप्रदेश, गोवा, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतून स्पर्धक सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर अनिल गिते व अनिल सानप यांना पदोन्नती !