प्रशासकीय राजवटीत धडक वसुली मोहीम !


प्रशासकीय राजवटीत मनपाकडून पंचवटी विभागात धडक वसुली मोहीम !

  गाळेधारक व घरपट्टी-पाणीपट्टी थकबाकीदारांवर होणार कठोर कारवाई !

      नाशिक(प्रतिनिधी)::- मनपाच्या प्रशासकीय राजवटीत पंचवटी विभागीय कार्यालयाच्यावतीने पंचवटी भागात मनपा गाळेधारक व घरपट्टी-पाणीपट्टी मिळकत थकबाकीदारांकडून वसुली होण्यासाठी विशेष धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. या विशेष धडक वसुली मोहिमेत घरपट्टी-पाणीपट्टीची थकबाकी न भरणाऱ्या मिळकतींचे नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली जात आहे. यावेळी या वसुली मोहिम दरम्यान कारवाई टाळण्यासाठी मनपा गाळेधारक व घरपट्टी-पाणीपट्टी मिळकत धारकांनी तात्काळ घरपट्टी-पाणीपट्टी भरावी असे आवाहन नाशिक मनपाच्यावतीने केले जात आहे.
       नाशिक मनपाच्या प्रशासकीय राजवटीत पंचवटी विभागीय कार्यालयाच्यावतीने विभागीय अधिकारी कैलास राभडीया यांच्या नेतृत्वाखाली घरपट्टी-पाणीपट्टी तसेच मिळकत-जाहिरात व परवाने विभागाकडून पंचवटी प्रभागातील प्रामुख्याने म्हसरूळ, मखमलाबाद, आडगांव, नांदूर, हनुमानवाडी, रामवाडी, हिरावाडी, गणेशवाडी, दिंडोरीरोड, पेठरोड, अमृतधाम, हनुमाननगर आदी मुख्य भागात वसुलीची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या धडक वसुली मोहिमेत संबंधित थकबाकी असलेल्या मिळकतींवर दंडात्मक बरोबरच मिळकत सीलबंदची कारवाई करण्यात येणार आहे. मोहीम यशस्वीतेसाठी मनपा पंचवटी मिळकत, जाहिरात व परवाने विभागाचे सहा. अधिक्षक भुषण देशमुख, मंगेश वाघ, राजेंद्र सोनवणे, दिपक मिंधे, प्रकाश उखाडे, राहुल बोटे, सचिन गवळी, संजय बोरसे आदींसह घरपट्टी-पाणीपट्टी विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
      या धडक वसुली मोहिमेत थकबाकीदार बरोबरच चालू वर्षीचे संपूर्ण बील भरणा करण्यासाठी पंचवटी प्रभागात यापूर्वीच महारँली काढण्यात आली आहे. आजही ध्वनी प्रक्षेपणद्वारे घरपट्टी-पाणीपट्टी संदर्भात कर भरा..सहकार्य करा..दंडात्मक कारवाई टाळा..मिळकत सीलबंद किंवा नळ कनेक्शन बंद करण्याची कटू कारवाई टाळा..! या घोषवाक्यात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.
       दरम्यान या धडक वसुली मोहीम प्रसंगी संबंधित थकबाकीदार गाळेधारक तसेच घरपट्टी - पाणीपट्टी मिळकत धारकांनी तात्काळ चालू रक्कम बरोबरच थकबाकीची रक्कम भरून होणारी मिळकत सीलबंद किंवा नळ कनेक्शन बंद करण्याची कटूकारवाई टाळावी.असे आवाहन घरपट्टी-पाणीपट्टी आणि मिळकत- जाहिरात व परवाने विभागाकडून करण्यात येत आहे.आज त्यानुसार प्रामुख्याने पंचवटी भागातील गाळेधारक व घरपट्टी-पाणीपट्टी थकबाकीदारांकडून रक्कम वसूल करण्यात येत आहे. त्यास संबंधित मिळकत धारक नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती मनपा पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडीया यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रथमतःच अध्यक्षपदी खासदार, सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती स्थापन, कार्याध्यक्षपदी के. के. अहिरे.

दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन ! साप्ताहिक न्यूज मसाला चा "लोकराजा" दिवाळी विशेषांक २०२४,

‘मविप्र’ च्या ठेवींचा आकडा सव्वाशे कोटींपर्यंत:- सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. मविप्र संस्थेची ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत, १ हजार ८७ कोटींचे अंदाजपत्रक, वर्षभरात तीन हजार विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, मविप्र सुरु करणार वृद्धाश्रम !ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत मविप्र करणार करार !