पोस्ट्स

जागतिक पर्यावरणदिनी मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्या वतीने वाडीव-हे पोलिस ठाणे प्रांगणात वृक्षारोपण !

इमेज
जागतिक पर्यावरणदिनी वाडीव-हे पोलिस स्टेशन प्रांगणात वृक्षारोपण !      नासिक (वाडीव-हे) ::- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्या वतीने वाडीव-हे पोलिस स्टेशनच्या प्रांगणात विविध औषधि वनस्पती असलेल्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.      मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून आणि वाडीव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाडीव-हे पोलिस स्टेशन आवारात औषधि वनस्पतीची रोपण केले. आणि ग्लोबल वार्मिंग च्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करावी जेणेकरून भविष्यात ग्लोबल वार्मिंगची दाहकता कमी होईल.त्यासाठी प्रत्येकाने एक झाड़ लावून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटिल, उपाध्यक्ष सुभाष सबनीस, संस्थेचे खजिंनदार नरेंद्र सूर्यवंशी, सचिव प्रकाश उखाडे, विश्वस्त जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, संजय देवधर, राजीव शहा, हिरामण शिंदे, वाडीव-हे पोलिस स्टेशनचे प्रवीण काकड़, नीलेश मराठे, प्रवीण मोरे, भगवान कडाळे, शरद मालु

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी वारली चित्रशैली ! आदिवासी औद्योगिक क्लस्टर व्हावे लवकरच कार्यान्वित... !!

इमेज
पर्यावरण संवर्धनाचा संदेश  देणारी वारली चित्रशैली !           आज ५ जून, जागतिक पर्यावरण दिन आहे. आदिवासी वारली चित्रशैली पर्यावरणाशी समतोल साधते. निसर्गाच्या लयतत्त्वाशी इमान  राखते. आकारांच्या सुलभीकरणामुळे ती जगभरात लोकप्रिय ठरली आहे. या वारली चित्रसृष्टीने सह्याद्रीचा पायथा समृद्ध केला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात एकरूप झालेल्या आदिवासींच्या जीवनशैलीत पर्यावरण जतन, रक्षण आणि संवर्धन समाविष्ट आहेच. सभोवतालच्या निसर्ग - जीवसृष्टीसोबत परस्परांना पूरक असे एकात्मिक जीवन ते जगतात. त्याचा कोणताही गाजावाजा न करता ते पर्यावरण दिन दररोजच आपल्या कृतीतून साजरा करीत असतात. वारली कलाकार पर्यावरण रक्षण, संवर्धनाचा कलेद्वारे संदेश देतात.         बारा कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्रात एक कोटींपेक्षा अधिक आदिवासी बांधव आहेत. त्यांच्या चालीरीती, संस्कृतीला राज्याच्या सांस्कृतिक नकाशावर महत्त्वाचे स्थान आहे. आधुनिक काळात निसर्गाचा तोल सांभाळून आदिवासी समाज कलाक्षेत्रात लक्षणीय योगदान देतो आहे. आदिवासी वारली चित्र रेखाटनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आजूबाजूला असणारा निसर्ग, पर्यावरण नितळपणे उमटते. अनुभू

एकल वापरातले प्लास्टीक (एसयूपी) बंद करण्यासाठी केंद्राचे राज्यांना पत्र,,,,,, गृहनिर्माण आणि शहरी व्‍यवहार मंत्रालयाच्‍यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "स्वच्छ आणि हरित" मोहीम सुरू !

इमेज
एकल वापरातले प्लास्टीक (एसयूपी) बंद करण्यासाठी केंद्राचे राज्यांना पत्र,,,,,,             गृहनिर्माण आणि शहरी व्‍यवहार मंत्रालयाच्‍यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "स्वच्छ आणि हरित" मोहीम सुरू             ५ जून, या - जागतिक पर्यावरण दिनी – राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्‍यावतीने देशभरामध्‍ये "स्वच्छ आणि हरित" मोहीम सुरू करण्‍यात येणार आहे.  देशाला एकल वापराच्या प्लास्टिक (एसयूपी) मुक्त करण्यासाठी, तसेच पर्यावरण सुधारण्यास हातभार लावण्यासाठी  हे आंदोलन सुरू करण्‍यात  येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  २९ मे २०२२ रोजी ‘मन की बात’ मधून देशवासियांबरोबर संवाद साधताना ‘जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागरिकांना एकत्र येऊन स्वच्छता आणि वृक्ष लागवडीसाठी काही प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे.             जागतिक पर्यावरण दिन आणि ३० जून २०२२ पर्यंत एकल वापराच्‍या प्लास्टिकवर बंदी घालण्याची भारताची वचनबद्धता लक्षात घेवून , गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सर्व  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या आदेशांची पूर्तता करण्यासाठी विविध क्रिया

भारतीय संख्याशास्त्रज्ञ : डॉ. के.सी. श्रीधरन पिल्लाई !

इमेज
डॉ. के.सी. श्रीधरन पिल्लाई हे अमेरिकेत कार्य करणारे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते.  संख्याशास्त्रामधील  बहुचलीय विश्लेषण (मल्टीव्हेरियेंट अनालिसिस ) आणि संभाव्यता वितरणे  (प्रोबाबिलीटी  डिस्ट्रीब्युशनस)  या क्षेत्रातील त्यांचे संशोधन सुप्रसिद्ध आहे. ५ जून हा त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्तने त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय ! भारतीय संख्याशास्त्रज्ञ : डॉ. के.सी. श्रीधरन पिल्लाई  !              अमेरिकेत संख्याशास्त्राचे अध्यापन तसेच संशोधन कार्य करणारे भारतीय संख्याशास्त्रज्ञ डॉ. के.सी. श्रीधरन पिल्लाई यांचा जन्म २४  फेब्रुवारी १९२०  रोजी केरळमध्ये झाला. त्यांनी बहुचलीय संख्याशास्त्रीय विश्लेषण (मल्टीव्हेरियेट स्टॅटिस्टिकल अनालिसिस) यावर विशेष संशोधन, १९४५ मध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली.  त्यानंतर  त्यांची केरळ विद्यापीठात व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली आणि तेथे ते  १९५१ पर्यंत  अमेरिकेला जाईपर्यंत सहा वर्षे अध्यापन कार्य करत राहिले. १९५१ साली ते प्रिन्स्टन विद्यापीठात संशोधन अभ्यासासाठी गेले. तेथे एक वर्ष अभ्यास केल्यानंतर ते नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठात गेले आणि  तेथे त्यांनी संख्याशास्त

काॅंग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष यांनी दिला एका पदाचा राजीनामा !

इमेज
        शिर्डी::- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली उदयपूर येथील शिबिरातील आवाहनानुसार "एक व्यक्ती एक पद" या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद आहेर यांनी आपल्या शहर अध्यक्ष या पदाचा शिर्डी येथील दोन दिवसीय नव-संकल्प शिबिरात महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे नाशिक शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

प्रेम उठाव संमेलन ! दुःखाचा समुद्र, डोळ्यात दाटल्यावर, टपटपतात, टपोरे थेंब, कविता होऊन, कागदावर,,,,,,,,, - नवनाथ रणखांबे

इमेज
दुःखाचा समुद्र, डोळ्यात दाटल्यावर,  टपटपतात, टपोरे थेंब, कविता होऊन, कागदावर,,,,,,,,-  नवनाथ रणखांबे          कल्याण (प्रतिनिधी)::-दुःख पाहून.  दुःख सोसून  कलावंत अस्वस्थ होत असतो. कलावंत हा दुःखाच्या वेदना सोसून निर्माण होतो. वेदनेच्या कळा सहन करून कलावंत आपली कला  -  साहित्य निर्माण करतो.  दुःखाचा समुद्र डोळ्यात दाटल्यावर  टपटपतात टपोरे थेंब कविता होऊन कागदावर ! कविता अशी निर्माण होते.   प्रेम उठाव   कविसंमेलनाचा विषय  प्रेमावरील कविता हाच आहे. मुळात प्रेम म्हणजे  तिच्या आणि त्याच्या प्रेमाच्या  कविता नसून प्रेमाचे विविध पदर आहेत.  त्यात दुःख , अबोला ,विरह मिलन इ. येते.  त्यात तो आणि ती यांचे प्रेम  , कौटुंबिक  प्रेम, समाजाप्रती प्रेम, देशाप्रती प्रेम,  महामानवा विषयी प्रेम असे प्रेम विविध प्रकारचे आहे. त्याला विविध पदर आहेत. हृदय आणि जग प्रेमानेच जिंकता येते. त्यामुळे प्रेम उठाव हे कवी संमेलन एक अनोखे असे वेगळे कवी संमेलन म्हणून यादगारच राहणार आहे.  या कविसंमेलनात  सर्व कवींनी  प्रेमा वरील कवितेच्या सादरीकरणाने प्रेमाचा पाऊस पाडला आहे.    असे प्रतिपादन साहित्यिक नवनाथ रणखांबे लिखित

काॅग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली !

इमेज
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसच्या अंतर्गत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणुकी बाबत चर्चा व सविस्तर माहिती देऊन मतदार याद्याचं सादरीकरण करून ब्लॉक अध्यक्षांकडे देण्यात आल्या. त्यावेळी शरद आहेर यांनी निवडणूक कशा प्रकारे होणार याबाबत सविस्तर विवेचन केले, निवडणुकीत उभं राहण्यासाठी सभासद हा सक्रिय सभासद असला पाहिजे असे सांगितले.  शिर्डी येथे १ व २ जून ला शिबीर संपन्न होणार आहे त्यात निवडक पदाधिकारी जाणार आहेत,  तसेच ११ जून ते १४ जून या कालावधीत शहर स्तरावरील एक दिवसीय शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.                       याप्रसंगी माजीमंत्री डॉ.शोभाताई बच्छाव , गटनेते शाहू खैरे, नगरसेविका वत्सलाताई खैरे, माजी नगरसेवक राजेंद्र बागुल,  केशव अण्णा पाटील, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय राऊत, अनुजाती विभागाचे प्रदेश सचिव सुरेश मारू, अल्पसं