जागतिक पर्यावरणदिनी मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्या वतीने वाडीव-हे पोलिस ठाणे प्रांगणात वृक्षारोपण !


जागतिक पर्यावरणदिनी वाडीव-हे पोलिस स्टेशन प्रांगणात वृक्षारोपण !

     नासिक (वाडीव-हे) ::- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्या वतीने वाडीव-हे पोलिस स्टेशनच्या प्रांगणात विविध औषधि वनस्पती असलेल्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

     मराठी पत्रकार साहित्य सांस्कृतिक संस्थेच्या माध्यमातून आणि वाडीव-हे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाडीव-हे पोलिस स्टेशन आवारात औषधि वनस्पतीची रोपण केले.

आणि ग्लोबल वार्मिंग च्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करावी जेणेकरून भविष्यात ग्लोबल वार्मिंगची दाहकता कमी होईल.त्यासाठी प्रत्येकाने एक झाड़ लावून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र पाटिल, उपाध्यक्ष सुभाष सबनीस, संस्थेचे खजिंनदार नरेंद्र सूर्यवंशी, सचिव प्रकाश उखाडे, विश्वस्त जेष्ठ साहित्यिक पुंजाजी मालुंजकर, संजय देवधर, राजीव शहा, हिरामण शिंदे, वाडीव-हे पोलिस स्टेशनचे प्रवीण काकड़, नीलेश मराठे, प्रवीण मोरे, भगवान कडाळे, शरद मालुंजकर आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !