श्री राधिका फाऊंडेशने १००० बांबूचे झाडे लावत साजरा केला जागतिक पर्यावरण दिवस !

श्री राधिका फाऊंडेशने १००० बांबूचे झाडे लावत साजरा केला जागतिक पर्यावरण दिवस !

🌳 हरित नाशिक 🌳
🌳 सुंदर नाशिक 🌳

     नासिक::- हरित नाशिक- सुंदर नाशिक संकल्पना राबविण्यासाठी ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत
"आपली संवर्धन संस्था", "श्री राधिका फौडेशन बहुद्देशीय संस्था", व दैनिक गांवकरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व संवर्धन मोहिमेचे आयोजन "देवराई" नाशिक येथे केले होते.

या प्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमात १००० बांबूची झाडे लावून सहभाग नोंदवत श्रमदान करीत, वृक्षारोपण केले. कार्यक्रमाचे आयोजन शेखर गायकवाड यांनी केले होते. यावेळी राधिका फाउंडेशन च्या सर्व सदस्यांनी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला होता असे चेतनाताई सेवक यांनी सांगितले.

      वृक्षारोपणासाठी आलेल्यांना राधिका फौंडेशन कडून प्रमाणपत्र देण्यात आले. राधिका फौंडेशनच्या संस्थापिका चेतना ताई,  सदस्य सौ. गवांदे यांनी रक्तदान शिबीरात भाग घेऊन रक्तदान करीत सामाजिक भान जपले. अध्यक्षा कल्पना सोनार, सचिव जावेद शेख, अनिल नहार निकिता जोशी, संजय देशमुख, प्राची राव, अंतोष धात्रक, तनविर राजे, खुशबू सेवक, व इतर सदस्य उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निवडणूक लढवायची तर आधी शपथ घ्यावी लागते !

विनामूल्य मैफल ! अफलातून म्युझिक लव्हर्सतर्फे सोमवारी सूरसम्राज्ञी लता मैफल !

इशरे नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीने केले पदग्रहण !